शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! फुला-फळांची लागवड करा, सरकारकडून लाखो रुपयांचं अनुदान मिळवा
बिहार सरकारनं (Bihar Govt) शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरु केलीय. या योजनेच्या माध्यमातून सरकार फुला-फळांच्या लागवडीसाठी (cultivation of flowers and fruits) लाखो रुपयांचे अनुदान देत आहे.
Agriculture News : केंद्र सरकारसह (central govt) विविध राज्यातील सरकारे शेतकऱ्यांसाठी (Farmers) अनेक योजना सुरु करत आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिहार सरकारनं (Bihar Govt) अशीच एक योजना सुरु केलीय. या योजनेच्या माध्यमातून सरकार फुला-फळांच्या लागवडीसाठी (cultivation of flowers and fruits) लाखो रुपयांचे अनुदान देत आहे.
शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी निर्णय
बिहार सरकारनं फुले आणि फळांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी सरकारनं फलोत्पादन समूह विकास योजना (Horticultural Cluster Development Scheme) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना फुले आणि फळांच्या लागवडीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान देत आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलंय.
या फळांसाठी मिळणार अनुदान
फुले आणि फळांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं एकरी 1 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. फलोत्पादन समूह विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळणार आहे. दरम्यान, बिहार सरकारच्या कृषी विभागानं यासंदर्भातील सर्व माहिती दिलीय. या माहितीनुसार, पपई, पेरु, वेल, झेंडू, फूल, आवळा, ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॅाबेरी, लेमन ग्रास, विविध प्रकारची फळे आणि फुले यांच्या लागवडीसाठी बिहार सरकार अनुदान देत आहे. फलोत्पादन समूह विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी एकत्र येऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी https://horticulture.bihar ही अधिकृत वेबसाइट देण्यात आलीय. या साईटवर फलोत्पादन समूह विकास योजनेच्या संदर्भातील सर्व माहिती देण्यात आलीय.
महत्वाच्या बातम्या: