एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये दोन निर्णय; धनंजय मुंडेंना दे धक्का, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची नवी कार्यकारिणी जाहीर

कराडला मकोका लागू केला केल्याने प्रकरण अधिकच तापले आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष आणि भाजपचे नेतेही धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Ajit Pawar : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कराडला मकोका लागू केला केल्याने प्रकरण अधिकच तापले आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष आणि भाजपचे नेतेही धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

अजित पवारांनी मोठी कारवाई केली

दरम्यान, अजित पवारांनी पक्षातून मोठी कारवाई करताना बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी विसर्जित केली. पहिल्यांदाच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात थेट कारवाई केल्याचे बोलले जात आहे. बीडमधील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी जिल्ह्यातील पक्षाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती दिली होती. दरम्यान, कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून यामध्ये केज तालुक्यात कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. धनंजय मुंडे यांच्या परळी तालुक्यात वैजनाथ सोळंके, तालुकाध्यक्ष बाजीराव धर्माधीकारी, शहराध्यक्ष आणि गोविंदराव देशमुख, परळी विधानसभा अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीची बीड जिल्ह्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर, केजमध्ये रिक्त

आष्टी : 

काकासाहेब श्रीराम शिंदे - तालुका अध्यक्ष
शेख नाजीम रशीद - शहर अध्यक्ष
डॉ. शिवाजी राऊत - आष्टी विधानसभा अध्यक्ष

पाटोदा :

दिपक दत्तात्रय घुमरे - तालुका अध्यक्ष
गणेश बालासाहेब कवडे - तालुका सहअध्यक्ष

शिरूर :

विश्वास रविंद्र नागरगोजे - तालुका अध्यक्ष
खदीर शेख - शहर अध्यक्ष

बीड :

महादेव विनेश उबाळे - तालुका अध्यक्ष
बाळासाहेब सिताराम गुजर - शहर अध्यक्ष
डॉ. योगेश क्षीरसागर - बीड विधानसभा अध्यक्ष

गेवराई :

भाऊसाहेब कचरू नाटकर - तालुका अध्यक्ष
दिपक आतकरे - शहर अध्यक्ष
पांडूरंग कोळेकर - गेवराई विधानसभा अध्यक्ष

परळी :

वैजनाथ सोळंके - तालुकाध्यक्ष
बाजीराव धर्माधीकारी - शहराध्यक्ष
गोविंदराव देशमुख - परळी विधानसभा अध्यक्ष

वडवणी :

बजरंग दादाराव साबळे - तालुका अध्यक्ष
विठ्ठल भुजबळ - शहर अध्यक्ष

माजलगाव :

जयदत्त नरवडे - तालुका अध्यक्ष
खलील पटेल - शहर अध्यक्ष
विश्वांभर थावरे - माजलगाव विधानसभा अध्यक्ष

केज :

तालुका अध्यक्ष - रिक्त
शहर अध्यक्ष - रिक्त

अंबाजोगाई :

राजेभाऊ बाळासाहेब औताडे - तालुका अध्यक्ष
शहर अध्यक्ष - अलीम शेख
बबनराव लोमटे - केज विधानसभा अध्यक्ष

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आला आहे. खरे तर आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी धनंजय मुंडे यांच्या सल्ल्यानेच नियुक्त होत असत, आता अजित पवार यांनी ही कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Embed widget