एक्स्प्लोर

Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला

Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. याप्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) वाल्मिक कराड याच्यावर संघटित गुन्हेगारीसाठी असलेल्या मकोका कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना घरात आसरा देणाऱ्या लोकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तपास सुरु असल्याचे वक्तव्य बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बजरंग सोनावणे यांनी संतोष देशमुख प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे सांगितले. संतोष देशमुख यांचे अपहरण करताना स्विफ्ट गाडी कोणाची होती? मारेकऱ्यांना राहायला कोणी घरं दिली?, या सगळ्या गोष्टी तपासात स्पष्ट होतील. खंडणीमधील जे आरोपी होते ते कोणाच्या घरात होते, त्यांना कोणी गाड्या पुरवल्या हे सगळं समोर येईल. परळी बाहेरचा विषय खूप मोठा आहे. केजमध्ये गुंडांची प्रवृत्ती झालीय. इतर आरोपींनासुद्धा मकोका लावला पाहिजे ही आमची मागणी आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवायला हवे. अॅडव्होकेट उज्वल निकम जर होकार देत नसतील तर सतीश मानेशिंदे या वकील महोदयांना हे प्रकरण द्या, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले.

बीडमध्ये जमावबंदी असतानाही परळीत आंदोलन कसे झाले? बजरंग बाप्पांचा सवाल

सुरेश धस काय म्हणतात ते मला माहिती नाही. कालपासून बीडमध्ये जमावबंदी चे आदेश लागू आहेत. हे असताना आंदोलन कसं झालं? गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परळी बंद करण्याचा निर्णय घेतला. मी 100 टक्के  अमित शाह यांची भेट घेतली होती. मी त्यांना सगळे वृत्तान्त देणार आहे. 
वहिनी (वाल्मीक कराड) यांच्याबद्दल मी फारसे बोलणार नाही. मी जर वाल्मिक कराड यांना धमकी दिली तर मग एवढे दिवस का लागले बोलायला? गुंडाराज होतं, आमच्या लोकांना मारायचा प्लॅन होतो अशा गुंडांना आम्ही कशी धमकी देणार?, असा सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला.

गुन्हेगाराला कुठलीही जात नसते. काही मूठभर समाजकंटक आहेत, ज्यांना जातीय रंग द्यायचा आहे. अजितदादांनी बीडमध्ये पक्षाची कारवाई करताना थोडा उशीर केला का काय असं वाटतंय. संतोष देशमुख हत्येच्या संदर्भात जे जे आहेत जे कोणी सामील असेल या सर्वांना फाशी झाली पाहिजे. मी मागितला तर धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत का? तो सरकारचा प्रश्न आहे ते बघतील. केज प्रकरणात 50 आरोपी येतील, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले.

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला
Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात तेजी, चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? मुंबईसह विविध शहरातील सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरात पुन्हा वाढ, चांदीच्या दरात घसरण, मुंबईसह देशातील विविध शहरातील दर एका क्लिकवर
‘Succession’ Mansion Destroyed : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Video : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Manjali Karad: ‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणारDhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुखNagpur Crime News : चिंताजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात तेजी, चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? मुंबईसह विविध शहरातील सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरात पुन्हा वाढ, चांदीच्या दरात घसरण, मुंबईसह देशातील विविध शहरातील दर एका क्लिकवर
‘Succession’ Mansion Destroyed : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Video : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Manjali Karad: ‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
Beed Crime: संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, 'ती' स्विफ्ट कार कोणाची? तपासात सगळं बाहेर येणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशेब होणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Embed widget