
Microsoft Mobile Phones
जगातली सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्मिती करणारी कंपनी अशी ओळख असणारी मायक्रोसॉफ्ट या अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीची स्थापना 1975 साली बिल गेट्स आणि पॉल अॅलन यांनी केली. सॉफ्टवेअर निर्मिती व्यतिरिक्त ही कंपनी 2012 साली लॉंच झालेल्या टॅब्लेटच्या सरफेस लाइन अप आणि एक्सबॉक्स व्हिडिओ गेम कन्सोलच्या उत्पादनासाठीही ओळखली जाते. वॉशिंग्टन स्थित या कंपनीने 2010 साली त्यांचा विंडोज फोन स्मार्टफोन OS लॉंच केला आणि 2014 साली फिनीश कार्पोरेशन नोकीयाची सर्व्हिस डिव्हिजन विकत घेतली. मायक्रोसॉफ्टने 2011 साली विंडोज फोन प्लॅटफॉर्मसह लूमिया श्रेणीतील फोन लॉंच केला. 2017 सालापासून लूमिया श्रेणीची विक्री बंद करण्यात आली. 2016 साली बाजारात आलेला लूमिया 650 हा ड्यूएल सिमचा फोन हा या श्रेणीतील शेवटचा फोन होता. कंपनी या सप्टेंबरमध्ये मायक्रोसॉफ्ट सर्फेस ड्यूओ हा फोल्डेबल स्मार्टफोन बाजारपेठेत आणण्याची योजना आखत आहे. यात 855 SoC सह 6 GB RAM आणि 128 GB व 256 GB अशा दोन स्टोरेज पर्यायांची सुविधा असणार आहे.
TV
Appliances
Accessories

























