एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विराट कोहली... फिटनेस... आणि बीप टेस्ट
बीप टेस्ट किंवा यो-यो टेस्ट या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या टेस्टमध्येही विराटनं सर्वाधिक स्कोर केलाय.
आजच्या क्रिकेटमध्ये पूर्वीच्या क्रिकेटच्या तुलनेत अनेक बदल झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी, वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी या तिन्ही फॉरमॅट मध्ये खेळताना खेळाडूंचा कस लागतो. याशिवाय देशांतर्गत तसेच ट्वेंटी ट्वेंटी लीग स्पर्धांमुळे क्रिकेटचं वेळापत्रक भरगच्च झालं आहे. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटरसमोर आज फिट राहणं हे आव्हान आहे.
...तर विराटसोबत खेळण्याची चाहत्यांना संधी
भारतीय क्रिकेटमध्ये पहायला गेलं तर फिट खेळाडूंच्या यादीत नंबर वन आहे तो कर्णधार विराट कोहलीचा. फिटनेसच्या बाबतीत विराट कोहलीनं घेतलेली मेहनत मैदानावरचा त्याचा खेळ पाहूनच लक्षात येते. सकस, पोषक आहार आणि व्यायामाला दिलेलं प्राधान्य यामुळे विराट भारतीय संघातला सर्वात फिट खेळाडू समजला जातो. विराटच्या आजवरच्या कारकीर्दीत दुखापतीमुळे एकदाही मालिकेतून बाहेर होण्याची वेळ अजूनपर्यंत तरी आली नाहीये. खेळाडूंचा फिटनेस तपासण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय वेळोवेळी एक टेस्ट घेते. बीप टेस्ट किंवा यो-यो टेस्ट या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या टेस्टमध्येही विराटनं सर्वाधिक स्कोर केलाय. विराटनं या टेस्टमध्ये 21 गुणांची कमाई केली आहे. विराटनंतर भारतीय संघातील रविंद्र जाडेजा आणि मनिष पांडे या दोघांनाच हा आकडा गाठता आलाय. बीसीसीआयच्या निकषाप्रमाणे बीप टेस्टमध्ये 19.5 पेक्षा जास्त गुण मिळालेल्या खेळाडूलाच फिट समजलं जातं.बर्थडे स्पेशल : भारतीय क्रिकेटचा बिग ‘व्ही’
बीसीसीआय़ आणि भारतीय संघव्यवस्थापनाची नजर सध्या 2019 च्या विश्वचषकावर आहे. त्यामुळे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समिती सदस्य एमएसके प्रसाद यांनी फिटनेसच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एकेकाळी भारतीय क्रिकेट गाजवणारे युवराज सिंग, सुरेश रैना हे महारथी याच कारणामुळे आज संघाबाहेर आहेत. श्रीलंका दौऱ्यापूर्वी घेण्यात आलेल्या बीप टेस्टमध्ये युवराजला केवळ 16 गुणांची कमाई करता आली. तर रैनाची कामगिरीही जेमतेमच होती.बर्थ डे स्पेशल : गेल्या एका वर्षात कोहलीची ‘विराट’ कामगिरी
काय आहे बीप टेस्ट...? फुटबॉल, रग्बी यांसारख्या खेळांबरोबरच क्रिकेटमध्येही खेळाडूंची तंदुरूस्ती आणि स्टॅमिना पारखण्य़ासाठी बीप टेस्ट घेतली जाते. याच कारणामुळे क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांनी ही टेस्ट अनिवार्य केली आहे. या टेस्टमध्ये 20 मीटर्सच्या अंतरावर दोन कोन्स ठेवले जातात. या दोन कोनमधील अंतर एक बीप वाजल्यानंतर दुसरी बीप वाजायच्या आत पार करून पुन्हा मूळ ठिकाणी यायचं असतं. ठराविक कालावधीनंतर दोन बीप मधील वेग वाढत जातो. त्यामुळे खेळाडूलाही त्याच वेगानं हे अंतर पार करावं लागतं. ही सर्व प्रक्रिया एका संगणक प्रणालीद्वारे हाताळली जाते. आणि त्यातून येणाऱ्या आकडेवारीतून खेळाडूंचा फिटनेस तपासला जातो. या बीप टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू अव्वल मानले जातात. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा या टेस्टमध्ये सरासरी स्कोर 21 एवढा आहे.विराट @29 : ड्रेसिंग रुममध्ये विराटच्या बर्थ डेचं सेलिब्रेशन
याआधी पारंपरिक पद्धतीनं घेतल्या जाणाऱ्या बीप टेस्टला खास महत्व दिलं जात नव्हतं. 90 च्या दशकात तर मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जाडेजा वगळता इतर खेळाडूंची या टेस्टमधील सरासरी आकडेवारी जेमतेम 16.5 एवढीच होती. मात्र विराट कोहलीनं कर्णधारपदाची धुरा हातात घेतल्यानंतर या गोष्टींवर विशेष लक्ष्य दिलं जातय. बीसीसीआयनेही मिशन 2019 साठी बीप टेस्टला विशेष महत्व दिलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात फिटनेसच्या बाबतीतला हा निकष भारतीय क्रिकेटच्या दृष्टीनं किती फायदेशीर ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पाहा व्हिडिओ :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement