एक्स्प्लोर
Advertisement
रस्त्यावरचं खाणं पुण्यातलं - थोडा भूतकाळ, थोडं वर्तमान - भाग 1
हॉटेल व्यवसाया पेक्षाही 'रस्त्यावरचे खाणे ' किंवा आजच्या भाषेत 'स्ट्रीट फूड' व्ला जास्ती मोठी आणि ऐतिहासिक परंपरा आहे,विषेशतः मराठेशाहीच्या इतिहासात ! ”वाचून आश्चर्य वाटतंय ? पण जरासा विचार केलात तर पटेल.
मी कोणी इतिहासकार नसलो तरी एक गोष्ट खात्रीने सांगतो;"हॉटेल व्यवसायापेक्षाही 'रस्त्यावरचे खाणे ' किंवा आजच्या भाषेत 'स्ट्रीट फूड' व्ला जास्ती मोठी आणि ऐतिहासिक परंपरा आहे, विषेशतः मराठेशाहीच्या इतिहासात! ”वाचून आश्चर्य वाटतंय ? पण जरासा विचार केलात तर पटेल.
लहानपणापासून अनेक ऐतिहासिक पुस्तकांत उल्लेख वाचत आलोय,महाराजांच्या काळात मावळे हातावर मिळतील त्या भाकऱ्या/दशम्या,मिरच्यांचा ठेचा आणि त्यासोबत हाताने फोडलेला कांदा खात असत.पहिले बाजीराव मोहिमेवर असताना वाटेवरच्या शेतातील जोंधळ्याचे (ज्वारी) दाणे,घोड्यावरनं जाताजाताच हाताने रगडून खात,Inter-state Travel करत असत.ह्या 'वाटेवरच्या खाण्याला' त्या काळातली स्ट्रीट फूड्स च म्हणायला पाहिजेत ना ! त्या झटपट खाण्यामुळेच तर ही मंडळीं शत्रूच्या आधीच इच्छित स्थळी पोहचून आपली ' फिल्डिंग ' लावत असतील.
इथे Management च्या परिभाषेत सांगायचं तर,"Those who reach first at their workplace, always get advantage in any Competition”.
हे करायला मदत व्हायची ती, जेवणासाठी युद्धाचा वेळ न दवडता,'स्ट्रीट फूड 'चा आधार घेतल्याने. पण कालौघात रस्त्यावरचे खाणे हा प्रकार काही काळ फक्त घरून बांधून आणलेले खाणे ह्या पुरताच मर्यादित राहिला.
स्वातंत्र्यपूर्वकालीन पुण्यात, 19 व्या शतकात जिथे हॉटेलंच रुढार्थाने फारशी प्रचलित नव्हती तिथे "रस्त्यावरचे खाणे"ह्या गोष्टीला तर समाजमान्यता मिळायला अवकाशच होता. निदान जुन्या पुण्या संदर्भातल्या पुस्तकांत त्याचा उल्लेख कुठे वाचलेला आठवत नाही.
साधारण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापासून, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर ह्या पूर्वसुरींनी आणि त्यानंतर महर्षी कर्वे ह्यांच्यासारख्या प्रभुतींनी पुण्याला शैक्षणिक चळवळींचे माहेरघर बनवलं. एकेक करत अनेक चांगल्या शैक्षणिक संस्था पुण्यात उभ्या राहिल्याचा परिणाम म्हणून पुण्यात बाहेरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच गेली ती आजतागायत.
चांगले हवामान, सरकारी तसेच किर्लोस्कर, टाटा ह्यांच्यासारख्या द्रष्ट्या उद्योजकांनी निर्माण केलेल्या पगारी नोकरी, व्यवसायाच्या उत्तम संधी आणि आयुष्य चांगलं जगायला लागणाऱ्या सगळ्या सुविधा, फारशी धकाधकी न करता इथे मिळत असल्याने उभ्या महाराष्ट्रामधून पुण्यात येणाऱ्या नोकरदार लोकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत गेली.
ह्या सगळ्यांना ‘खाण्या’साठी पुण्यातल्या पेठेत अनेक गरजू लोकांनी, उद्योजकांनी खानावळी सुरु केल्या. रामभाऊ,गणपतराव अश्या भारदस्त नावाचे खानावळ चालक 'मेब्रांनां’’ ' दोन वेळेचे भोजन आग्रहाने वाढत. जेमतेम दोन वेळ जेवणाची ऐपत असलेले ‘मेंब्रं’ ही, दिवेकरांचे न ऐकता, डॉक्टर दिक्षीतांनी सल्ला दिल्यासारखे दोन वेळ जेवून निमूट जगत असंत.
मला वाटतं रोजंदारीवर जगण्याच्या ह्या भानगडीत, रस्त्यावरच्या खाण्याकडे मधला काही काळ कोणाचे फारसे लक्ष गेले नसावे.
माझ्या माहितीप्रमाणे ‘रस्त्यावरच्या खाण्याची’ सुरुवात झाली ती, 19 व्या शतकात दुसऱ्या दशकाच्या सुमारास.बेलबागेतल्या शंकराच्या किंवा बुधवारातल्या दत्त मंदिर परिसरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांकरता राजगिऱ्याच्या, ज्वारीच्या लाह्या, बत्तासे आणि दत्ताच्या प्रसादाच्या फुटाण्यांपासून.तत्कालीन बाहुलीच्या हौदाजवळ ह्याचा उगम झाला असं समजायला वाव आहे
थोडक्यात पुण्यातल्या स्ट्रीट फुडची सुरुवात तत्कालीन पुण्याच्या स्वभावाला अनुसरून 'अध्यात्मिक' च म्हणायला पाहिजे.
दत्तमंदिराच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच त्यात आधी महाबळेश्वरी चणे आणि लवकरच शेंगदाण्यांची भर पडली.पुरचुंडीतून लवकरच ते द्रोणासदृश्य कागदी कोनात मिळायला लागले आणि तिथून रस्त्यावरच्या ह्या आद्य खाण्याचे 'मार्केट'वाढतच गेले.
फक्त पेठ भागापुरत्याच मर्यादित असलेल्या त्याकाळच्या पुण्याच्या मंडईत,नैमित्तिक कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अर्थातच सर्वाधिक.सहाजिकच कोळश्यावर भाजलेल्या चणे,फुटाणे ,शेंगदाणे ह्यांच्या कोळश्यावर चालणाऱ्या भट्ट्या मंडईत ठिकठिकाणी सुरु झाल्या,त्या आजतागायत.आजही ह्या परिसरात हा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो.गिरे,परदेशी अशी अनेक मंडळी आपापले व्यापार गेले अनेक वर्ष करतायत.
ह्या व्यवसायाची व्याप्ती पुढल्या काळात वाढवली ती 'गुडदाणी'ने.गुडदाणी हा प्रकार वास्तविक महाराष्ट्रातला नाही
महाराष्ट्रात खरी पद्धत घरी आलेल्या पाहुण्यांना गुळ- शेंगदाणे द्यायची.(राजगिरा वडी हा मुळ मराठी पदार्थ.) गुडदाणी मुळात उत्तर भारतातून आलेला पदार्थ !
गुळ,शेंगदाणे,राजगिऱ्या च्या लाह्या घातलेली गुडदाणी पुणेकर लोकांच्या पसंतीला लगेचच उतरली.पुलंच्या खाद्यजीवन विषयक लेखात ह्या पदार्थांचा उल्लेख वाचलेला आठवत असेलच !
ह्या व्यवसायातल्या कै.शंकरराव ढेंबे ह्यांनी मिनर्व्हा टॉकीज जवळ गुडदाणी घेऊन 'खुमच्या' वर (टेबल) ती विकायला सुरु केली.काही वर्षात पालिकेकडून हातगाडीचे लायसन्स मिळवून ‘महाराष्ट्र गुडदाणी’ नावाने 1949 मधे टिळक पुतळ्याजवळ भागीदारीत व्यवसायाची सुरुवात केली.आचार्य अत्र्यांच्या "कऱ्हेचे पाणी" ह्या आत्मचरित्रातदेखील श्री.शंकरराव ढेंबे ह्यांच्या ‘महाराष्ट्र गुडदाणी’ चा उल्लेख आहे. घरातल्या मुलांनी आता हा व्यवसाय वेगळ्या नावाने थेट दुकानांपर्यंत पोचवलाय. पण महाराष्ट्र गुडदाणीची तीच जुनी गाडी व्यवसायाकरता आजही त्याच जागी असते.
आता हिवाळ्यात गुडदाणीचा इंदौरी अवतार ‘ गजक’ पुण्यात सर्रास मिळायला लागलाय पण अजून त्याचे ‘ठेले’ इथे सुरु झालेले नाहीत.
हळूहळू चुरमुरे,शेव,फरसाण ह्यांच्या अनेक भट्ट्या,गाड्या आणि कालांतराने त्यांचीच झालेली दुकानं मंडईत सुरु झाली.आजही ही दुकानं रिटेलचा मोठा व्यवसाय करतात.फक्त ह्या दुकानांना ‘भडभुंजा' म्हणायची पुण्यातली जुनी पद्धत आजकाल लोप पावत चालल्ये.
आजकाल ‘फ्रूट प्लेट’ विकणारी ( सर्व्ह करणारी ) अनेक हॉटेल्स दिसतात. पण फ्रूट प्लेट् ह्या कल्पक प्रकाराचा पुण्यातला उगमही मंडईतूनच झाला असं म्हणायला ऐकीव का होईना पण आधार आहे.
मंडईच्या फळ बाजारात शिल्लक राहिलेली फळं संध्याकाळी पडेल किमतीत विकत घेऊन,दुसऱ्या दिवशी हातगाडीवर एकीकडे भरपूर धूप जाळत वातावरण निर्मिती करुन ( धूपाच्या वासामुळे खराब फळांचा वास ग्राहकांना लवकर जाणवत नाही ही चापलुस्की ह्यापुढे लक्षात ठेवा ) त्याचीच ‘फ्रूट प्लेट’ सजवून विकून चौपट नफा कमवत केलेली ही खरोखरीच कल्पक “आयडियाची कल्पना”.
खरतर “मंडई परिसरातील फुड ”, हा एक आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय आहे .त्यावर स्वतंत्र ब्लॉग लिहावा लागेल त्यामुळे त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
पुढच्या भागांत पुण्यातल्या बदलत गेलेल्या “स्ट्रीट फुड ट्रेंड “ बद्दल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement