एक्स्प्लोर

BLOG | विघ्नहर्ता अडचणीत..

कोरोनाची साथ नियंत्रित करताना लावलेल्या टाळेबंदीमुळे व्यापार, शेती यावर विपरीत परिणाम झालेलाच आहे. पण या वर्षी विघ्नहर्ता गणपतीला देखील या विघ्नाने अडचणीत आणले आहे.

भारतीय बाजार आणि भारतीयांचे सण यांचा जवळचा सबंध आहे. कारण सण समारंभाच्या अनुषंगाने बाजारात खरेदी ठरलेली असते. यावर्षी गुढी पडावा, अक्षय तृतीय, वैशाखी, बुद्ध जयंती, रमजान ईद, वाट पौर्णिमा, पंचमी ,रक्षाबंधन आदी सणांचा बाजार तसा भरलाच नाही. अजूनही महाराष्ट्रात कोरोनाचा कहर चालू आहे. शासनाने जिल्हा बंदी उठवली असली तरी कोरोनाची छाया विघ्नहर्ता गणपपतीच्या सणावर पडली असून गणपती बनविणाऱ्या व्यावसायिकांची मात्र यावेळी कठीण स्थिती झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रीय संस्कृतीचा प्रमुख गौरव चिन्ह असल्यामुळे महाराष्ट्राबाहेर देखील जीथे महाराष्ट्रीय लोक राहतात, तीथे म्हणजे तेलंगणातील हैद्राबाद, कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा, विजापूर या भागात देखील हा उत्सव साजरा होतो. म्हणूनच या भागातील गणेशभक्त महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मराठवाड्यात गणपती खरेदीसाठी येतात. उस्मानाबाद शहरातील गणेश मूर्ती बनवणाऱ्या व्यावसायिकांनी गेल्या काही वर्षांपासून आपल्या गणेश मूर्तींनी तेलंगणातील हैद्राबाद, कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा, या भागातील लोकांना आकर्षित केले आहे. दरवर्षी सर्व मिळून कोटीची उलाढाल होणारा हा व्यवसाय यावर्षी मात्र अडचणीत आलेला आहे. उस्मानाबाद शहरातील पारंपारिक कुंभार काम करणाऱ्या समाजाने अंदाजे वीस वर्षांपूर्वी आपला पारंपारिक गाडगी, मडकी बनविण्याच्या बरोबर गणपती बनवायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता त्याचे मोठ्या उद्योगात रुपांतर झाले. उस्मानाबादच्या रामलिंग कुंभार यांच्या महादू, गोरोबा ,अंबादास आणि लक्षमण यांनी गणपती बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. त्याचबरोबर गावातील डोंगे आणि भांगे या कुटुंबाने देखील गणपती निर्मिती चालू केली. हे सर्व निर्माते सांजा रोड भागातच राहत असल्यामुळे गणेश चतुर्थीला सांजा रोड चा परिसर गजबजून जातो. पण यावर्षी ही गजबज अजिबात दिसून येत नाही. गणपती बनविण्यासाठी लागणारी प्लास्टर पावडर बिकानेर येथील पद्मावती प्लास्टर इंडस्ट्रीज कडून मागवली जाते. एक बॅग 25 किलो वजनाची असते आणि तीची किंमत 180 रु असते. एका गाडीत 500 बॅग असतात. दरवर्षी 2 गाड्या म्हणजेच 1000 बॅग मागवल्या जात. मात्र, लॉकडाऊनमुळे यावर्षी केवळ 500 बॅग मागवल्या गेल्या. दरवर्षी गणपती विसर्जन झाले की, केवळ दोन-तीन महिने हे काम बंद असते अन्यथा वर्षभर हे लोक गणपती बनवत असतात. वर्षभर काम आणि विक्रीचा दिवस वर्षात एकच, अशी हातघाई असते. मग विक्री न झालेल्या गणपतीत पैसे गुंतून पडतात. मागील वर्षी महापुर आणि यावर्षी कोरोना! त्यामुळे जे काही राहतील ते गणपती पुढे वर्षभर म्हणजे आता दोन वर्ष सांभाळावे लागणार आहेत. गणपती बनविण्यासाठी एक साचा आणि त्याचबरोबर एक विशिष्ट प्रकारचा रबरी साचा लागतो. हे साहित्य सोलापूर, पेन, पुणे या भागातून मागवले जाते. गणपती बनविण्यासाठी दरवर्षी नवीन साचा आणि नवीन रबर लागते. ज्यामध्ये प्लास्टर पावडर पाण्यात मिसळून ओतली जाते. साधारण पणे एका तासात एक गणपती तयार होतो. साच्यातून गणपती काढणे त्यास वाळवणे आणि त्यानंतर त्यास हात बसवणे आणि नंतर फिनिशिंग देणे महत्वाचे असते. पुन्हा पॉलिश पेपरने घासून मुर्ती सुबक करणे असे काम असते. एकदा फिनिशिंग पूर्ण झाले की मग त्यास रंग देण्याची प्रक्रिया सुरु होते. कलर हे दहा बारा प्रकारचे असतात. त्यात चमकी कलर, वॉटर कलर, पावडर कलर असे विविध प्रकार आहेत. सर्व प्रथम स्प्रे मशीनच्या साह्याने संपूर्ण गणपती रंगवून मग डोळे, कान, अलंकार इत्यादी रंगवले जातात. एकावेळी दोन तीन साच्यातून गणपती बनविण्याची प्रक्रिया सुरु असल्यामुळे दिवसाकाठी 30 ते 35 गणपती बनवले जातात. गणपतीच्या आकारावरून त्यास नंबर दिले जातात. झिरो नंबरचा गणपती म्हणजे तीन इंची गणपती! एक नंबर म्हणजे 5 इंची! 10 नंबर म्हणजे 1 फुट तर 20 नंबर म्हणजे 2 फुट अशी याची परिमाणे आहेत. उस्मानाबाद येथील हे कुंभार कुटुंब 3 इंची गणेश मूर्तीपासून 8 फुट उंचीच्या गणेश मूर्ती बनवते. मागील वर्षी 1 फुटी गणेश मूर्तीचा भाव अंदाजे 200 रुपये होता तो यावर्षी 150 पर्यंत असेल, तर दोन फुटी रूपये 500 चा गणपती यावर्षी 300 पर्यंत विक्री होवू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गणपती बनवणे कष्टाचे काम असते. वर्षभराची मेहनत असते आणि विक्रीचा दिवस एकाच असतो. मग माल विकला गेला नाही की मग पैसे गुंतून पडतात. गणपतीत निव्वळ पैसे गुंतून पडतात असे नव्हे तर मेहनत देखील वाढते. वर्षभरात रंग उडतो, मूर्ती निस्तेज होतात. मग पुन्हा फिनिशिंग करून पुन्हा रंगकाम करावे लागते. गंगाबाई लक्षमण कुंभार आणि त्यांची बालाजी आणि गोपाल ही दोन मुले, सतत या व्यवसायात गुंतलेले असतात. दरवर्षी दिवाळी नंतर काही महिन्यांनी गणपती बनविण्याचे कार्य सुरु होते. तेव्हाच प्लास्टर मागवले जाते. मात्र, यावर्षी मार्च महिन्यातील लॉकडाऊन लक्षात घेता एकच गाडी प्लास्टर मागवले गेले. त्यामुळे मार्च ते जुलै असे कांही कामच नव्हते. यावर्षी जर विक्री झाली नाही तर मागील वर्षीचे काही आणि यावर्षी विकले गेले नसलेले असे दोन वर्षाचे गणपती सांभाळावे लागणार आणि पुन्हा त्यावर मेहनत करावी लागणार. गणपती बरोबरच हे कुंभार कुटुंबिय श्री. महालक्ष्मीचे म्हणजे गौरीचे मुखवटे, नवरात्रासाठी लागणाऱ्या देवीच्या प्रतिमा, शिवजयंती, बसव जयंती, आंबेडकर जयंती यासाठी लहान मुर्ती, बसवणी पौर्णिमेच्या मुर्ती, पोळ्याची बैल जोडी या सोबत लक्ष्मीचे हात आणि मखर देखील बनविण्याचे काम करतात. शिवाय यारोबर माठ, फुलझाडांच्या कुंड्या याची निर्मिती देखील चालू असते. गणेश विघ्नहर्ता देवता म्हणून प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या काळात आता विघ्नहर्त्यावरच संकट आले आहे, असे म्हणावे की नाही माहीत नाही. पण हे विघ्न या विनायकाने लवकरात दुर करावे, अशी आशा सर्व गणेश भक्त भारतीयांच्या मनात आपसुकच निर्माण झाली आहे.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget