एक्स्प्लोर

हृदयविकाराचा धक्का बसतो तेव्हा फार दुखतं का हो?

रानात भाकर घेऊन बोलवणार म्हणून एवढं रागावतात का गं कुणी? ऑ? तू भाकर घेऊन रानात नको येऊ गं, तसा मीही राहात नाही गावाकडं. तू नुसतं राहायला हवं होतं मी असेपर्यंत तरी.

ठिगळाची खाकी चड्डी, विविध रंगांच्या बटणांचा पांढरा शर्ट आणि टोकं चुरगळलेली जवळपास गोल झालेली टोपी सांभाळत शाळेतून घरी येताना पोरं म्हणाली “आज पाटलाच्या वाड्यासमोर व्हिडीववर चांदणी पिच्चर हाय” ‘आविष्यातला पयला पिच्चर’ बघणार होतो. घराच्या दारातनंच महाबीज बियाण्याच्या पिशवीचं बनवलेलं दफ्तर फेकून पाटलाच्या वाड्यासमोर गेलो. तिथं कुणीच नव्हतं. गोळीपेंडीचं घमेलं घेऊन परड्यात गेलो. गायी-बैलांना पेंड घातली. परत घरी येताना मुद्दाम पाटल्याच्या वाड्याम्होरनं चक्कर मारली. एक लोखंडी बॅरल ठेवला होता. त्यावर पोतं श्रीदेवीच्या स्वागताला..! कोण श्रीदेवी माहित नव्हतं, पोरं म्हणत होती म्हणून कळलं होतं श्रीदेवी नावाच्या हिरॉईनचा पिच्चर. ज्वारीची भाकरी-काळ्या घेवड्याचं कालवण खाऊन चड्डीला हात पुसत पाटलाच्या वाड्यासमोर पयल्या रांगेत फतकाल मांडलं. व्हिडीववाल्याचं कायतरी चाललं होतं. लाल-पांढऱ्या-पिवळ्या-काळ्या आणि कसल्याकसल्या रंगाच्या पट्ट्या होत्या टीव्हीवर. बाप्ये जमू लागले, पोरं तर आधीच येऊन बसली होती. घरातली भांड्याकुंड्यांची काम उरकून बाया जमू लागल्या. पिच्चर सुरु झाला... मध्यरात्री कधीतरी झोप लागली तिथंच. चांदणीSSS ओ मेरी चांदणीSSS अर्धमेल्या झोपेत गाणं डोक्यात घोळत होतं. झोप लागण्याआधी पाहिलेली श्रीदेवी मनात होतीच... तेव्हाच ठरलेलं, लग्न करायचं तर हिच्याशीच. मी रानात जाईन, ती डोक्यावर भाकर घेऊन येईल. अजून बरंच काय काय ठरवलं होतं. एक-दोन-चार-सहा-दहा वर्ष सरत होती. मी वयाने मोठा होत गेलो. श्रीदेवी तेवढीच राहात होती. तिनं तसंच राहावं वाटायचं मी मोठा होईपर्यंत. मग कळलं तिचं बोनी कपूर नामक इसमाशी लग्न झालं. हर किसी को नही मिलता, यहा प्यार जिंदगी मे... तेव्हा फार दु:ख झालं होतं, पण म्हटलं जाऊद्या, लग्न करूद्यात बोनी का फिनी कपूरशी. पिच्चरात अन् स्वप्नात दिसणारी श्रीदेवी काय त्यो बोनी-फिनी कपूर न्हेत न्हाय. श्रीदेवी अशी वर्षा-दोन वर्षातनं भेटायची पिच्चरातनं मला आणि मी तिला. बोनी कपूरशी लग्न केलं हे सोडलं तर बाईनं कधीच दु:ख नाही दिलं. मनात, कानांत आणि डोळ्यांत नेहमी साठत गेली आणि अचानक आज धक्का. हृदयविकाराने गेली बिचारी. रानात भाकर घेऊन बोलवणार म्हणून एवढं रागावतात का गं कुणी? ऑ? तू भाकर घेऊन रानात नको येऊ गं, तसा मीही राहात नाही गावाकडं. तू नुसतं राहायला हवं होतं मी असेपर्यंत तरी. नीट जा, पोहोचल्यावर फोन कर, बॅलन्स कमी असला तर मिस कॉल दे. मी करेन. हुश्श्श... हृदयविकाराचा धक्का बसतो तेव्हा फार दुखतं का हो?

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget