एक्स्प्लोर

खान्देशात 15 पैकी 8 नगराध्यक्ष भाजपचे !

खान्देशात जळगाव जिल्ह्यातील 12 पैकी 6, धुळे जिल्ह्यात 2 पैकी 1 आणि नंदुरबार जिल्ह्यात 1 पैकी 1 अशा 8 नगर पालिकांमध्ये भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपच्या तीन मंत्री म्हणजे एक केंद्रीय आणि राज्यातील दोन कॅबिनेट, दोन माजी मंत्री आणि इतर आमदारांनी आपल्या मतदार संघातील पालिकांमध्ये पक्षाची आणि स्वतःची प्रतिष्ठा कायम राखली आहे. यावेळी नगराध्यक्षपदासाठी पहिल्यांदा सार्वत्रिक मतदान झाल्यामुळे शहरी भागातील मतदारांवर भाजपची पकड आजही कायम असल्याचे दिसले. ही बाब विद्यमान आमदारांना दिलासा देणारी नक्कीच आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक उत्कंठापूर्ण लढत भुसावळ पालिकेत होती. तेथे माजी आमदार संतोष चौधरी यांची जनाधार आघाडी, शिवसेना आणि आमदार सावकारे नेतृत्वातील भाजप यांच्यात लढत होती. मनोज बियाणी यांनी शिवसेनेतून भाजपत प्रवेश केल्यामुळे चौधरी विरोधात सावकारे, बियाणी यांच्यात डावपेच खेळले गेले. येथे भाजपचे रमण भोळे हे चुरशीच्या लढतीत विजयी झाले. नगरसेवकांच्या एकूण 48 पैकी भाजपला 25, जनाधार आघाडीला 19 जागा मिळाल्या. शिवसेनेला केवळ 1 जागा मिळाली. 3 अपक्ष निवडून आले. ही पालिका पूर्णतः भाजपच्या ताब्यात आली. येथे आमदार सावकारे यांनी प्रभाव सिद्ध केला. दुसरा चुरशीचा आणि परिवर्तन करणारा निकाल चाळीसगाव पालिकेत लागला. भाजपचे आमदार उन्मेश पाटील यांनी प्रस्थापित देशमुख घराण्याच्या सत्तेची परंपरा संपुष्टात आणली. भाजपचे जुने निष्ठावंत विश्वास चव्हाण यांच्या पत्नी सौ. आशालता या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. नगरसेवकांच्या एकूण 34 जागांपैकी भाजपला 13 जागा मिळाल्या. विरोधातील राजीव देशमुख यांच्या शहर विकास आघाडीला 17 जागा मिळाल्या. शिवसेनेच्या 2 आणि 3 अपक्षांवर सभागृहातील सत्तेचा लंबक अवलंबून असेल. सावदा येथे भाजपच्या सौ. अनिता येवले या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. त्यांच्याकडे सभागृहातील सत्तेसाठी साधे बहुमत आहे. नगरसेवकांच्या एकूण 17 जागा असून त्यात भाजपचे 9,  राष्ट्रवादीचे ७ आणि 1 अपक्ष आहेत. वरील तीनही पालिका वगळता भाजपचे इतर 3 नगराध्यक्ष हे पालिकांच्या सभागृहात अल्पमतात आहेत. त्यामुळे तीनही ठिकाणी सत्तेसाठी सभागृहात इतरांचा टेकू घ्यावा लागेल. एरंडोल येथे नगराध्यक्ष म्हणून रमेश परदेशी निवडून आले. तेथे नगरसेवकांच्या एकूण जागा 20 आहेत. त्यात भाजपचे केवळ 4 असून राष्ट्रवादीचे 5 आणि शिवसेनेचे 5 आहेत. काँग्रेससह अपक्ष प्रत्येकी 1 आहेत. पारोळ्यात चुरशीच्या लढतीत भाजपचे करण पवार विजयी झाले. पवार हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे आहेत. येथे नगरसेवकांच्या एकूण 21 जागांपैकी केवळ 7 सदस्य भाजपचे आहेत. 7 सदस्य शहर विकास आघाडीचे आहेत. शिवसेनेचे 5 आणि अपक्ष 2 आहेत. फैजपूर येथेही भाजपचे नगराध्यक्ष अल्पमतात आहेत. नगराध्यक्षपदी सौ. महानंदा होले या विजयी झाल्या. मात्र नगरसेवकांच्या एकूण 17 जागांपैकी भाजपला केवळ 5 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला 4, शिवसेनेला 1, काँग्रेसला 3 आणि अपक्षांना 4 जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या यशात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा समान वाटा आहे. खडसे यांच्या खासदार सुनबाई श्रीमती रक्षा यांच्या रावेर मतदार संघातील भुसावळ, सावदा आणि फैजपूर येथे भाजपला नगराध्यक्षपदे जिंकता आली. खडसेंच्या कन्या तथा जिल्हा बँक अध्यक्ष सौ. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. याच मतदार संघातील बोदवड येथे नगर पंचायत आहे. तेथेही निवडणूक झाली. मात्र, भाजपला साधे बहुमतही मिळाले नाही. नगरसेवकांच्या एकूण 17 जागांमध्ये पक्षीय बलाबल भाजप 7, शहर विकास आघाडी 7, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 2 आणि शिवसेना 1 असे आहे. नगर पंचायतच्या नगराध्यक्षांची निवड नगरसेवकातून होईल. खडसे यांच्या डावपेचांमुळे नगराध्यक्षपद भाजपलाच मिळेल.  मंत्री महाजन यांनी खासदार ए. टी. पाटील यांच्या मतदारसंघात सर्व प्रकारचे लक्ष घातले. त्यांनी संभाव्य विजेत्यांना हव्या त्या गोष्टी दिल्या. जिल्ह्यात शिवसेनेला 3 नगराध्यक्षपदे मिळाली. यात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदार संघातील धरणगावात चुरशीच्या लढतीत नगराध्यक्षपदासह बहुमतही प्राप्त केले. नगराध्यक्षपदी सलीम पटेल हे विजयी झाले. नगरसेवकांच्या एकूण 20 जागांपैकी 14 जागा शिवसनेने जिंकल्या. भाजपला 6 जागा मिळाल्या. माजी मंत्री खडसे यांनी मंत्री पाटील यांना आव्हान देण्यासाठी धरणगावात भाजपचे स्वतंत्र पॅनेल दिले होते. पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांनी आपला प्रभाव कायम राखला. तेथे शिवसेनेचे विरोधक एकत्र आले तरी आमदार पाटील यांनी नगराध्यक्षपदी संजय गोहील यांना निवडून आणत बहुमतही कायम ठेवले. नगरसेवकांच्या एकूण 26 जागांमध्ये शिवसेनेला 11, राष्ट्रवादीला 7, जनाधार आघाडीला 8 जागा मिळाल्या. यावल येथे शिवसेनेने भाजप सोबत युती केली होती. तेथे सौ. सुरेखा कोळी या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. नगरसेवकांच्या एकूण 20 जागांमध्ये युतीला केवळ 7 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच युती सुद्धा सभागृहात अल्पमतात आहे. काँग्रेसला 8, राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली असून 4 अपक्ष आहेत. शिवसेनेचे तिसरे आमदार चंद्रकांत सोनवणे हे पालिका निवडणुकीत फारसे यश मिळवू शकले नाहीत. त्यांच्या मतदार संघात चोपडा शहर आहे. चोपडा येथे नगराध्यक्षपदी शिवसेनेचा पराभव झाला. जळगाव जिल्ह्यात पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सफाया झाला. या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे कुठेही पॅनेल दिले नाही. स्थानिक नेत्यांनी युती किंवा आघाड्यांमध्ये घुसणे पसंत केले. त्यानुसार रावेर, अमळनेर आणि चोपड्यात आघाड्यांचे नगराध्यक्ष निवडले गेले. रावेरमध्ये जनक्रांती आघाडीचे दारा महंमद हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र सभागृहात त्यांची आघाडी अल्पमतात आहे. नगरसेवकांच्या एकूण 17 जागा असून जनक्रांती आघाडीचे 5, शिवसेनेचा 1 नगरसेवक आहे. येथे सत्तेचा  लंबक अपक्षांच्या हाती  असून  11 अपक्ष निवडून आले आहेत. अंमळनेरमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. अंमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी हे मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील म्हणजे बाहेरचे आहेत. त्यांच्या आमदार आघाडीकडून पत्नी सौ. अनिता चौधरी रिंगणात होत्या. त्यांना पराभूत करण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष अनिल पाटील, काँग्रेस नेत्या ॲड. ललिता पाटील आदी एकत्र आले. त्यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून साहेबराव पाटील यांच्या पत्नी सौ. पुष्पलता पाटील यांना रिंगणात उतरवले. मतदानाच्या दिवशी आमदार चौधरी आणि पाटील त्रयींच्या समर्थकात राडा झाला. अखेर शहर विकास आघाडीच्या सौ. पुष्पलता या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या. या विजयाकडे मराठा एकत्रिकरणातून साध्य झालेला विजयाचा फॉर्म्युला म्हणून पाहिले जात आहे. शहर विकास आघाडीला बहुमतही मिळाले. नगरसेवकांच्या एकूण 33 जागांमध्ये शहर विकास आघाडीला 16, आमदार  चौधरी आघाडीला 10, शिवसेनेला 4 आणि अपक्षांना 3 जागा मिळाल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी येथे भाजपचे स्वतंत्र पॅनेल दिले होते. ते तेथे केवळ 1 नगरसेवक निवडून आणू शकले. चोपड्यात शिवसेना आमदार सोनवणे यांना विरोध करण्यासाठी तेथील सर्व पक्षीय स्थानिक नेते एकत्र आले होते. आमदार सोनवणे हेही चोपडा मतदार संघात तसे उपरेच समजले जातात. ते जळगावला स्थायिक झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात इतर सर्व पक्ष शहर विकास आघाडीत एकत्र झाले. आघाडीच्या सौ. मनिषा चौधरी या नगराध्यपदी निवडून आल्या. नगरसेवकांच्या एकूण 29 जागांमध्ये शहर विकास आघाडीला बहुमत म्हणजे 16 जागाही मिळाल्या. शिवसेनेला 8 आणि अपक्षांना 5 जागा मिळाल्या. येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील हेही पक्षाचे स्वतंत्र पॅनेल देवू शकले नाहीत. धुळे जिल्ह्यात दोंडाईचा आणि शिरपूर पालिकांच्या निवडणुका झाल्या. दोन्ही निकाल लक्षवेधी राहिले. दोंडाईचा पालिकेत राज्याचे पर्यटन विकासमंत्री तथा भाजपचे नेते जयकुमार रावल यांनी नगराध्यक्ष पदासह बहुमत मिळवत परिवर्तन घडवून आणले. माजीमंत्री आणि सध्या काँग्रेसवासी डॉ. हेमंत देशमुख यांची पालिकेतील सत्ता मंत्री रावल यांनी संपुष्टात आणली. मंत्री रावल यांच्या मातोश्री सौ. नयनताई कुवर या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. नगरसेवकांच्या एकून 24 पैकी 20 जागा भाजपने जिंकल्या. 1 जागा मनसेला मिळाली. काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. या निवडणुकीपूर्वी देशमुख यांनी मंत्री रावल यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते. आता निवडणूक धुराळा बसल्यानंतर डॉ. देशमुख यांच्यामागे अनेक चौकशांचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. शिरपूर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते आणि आमदार अमरिश पटेल यांनी आपले वर्यस्व कायम राखले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे पाणी जिरवण्याचा शिरपूर पॅटर्न प्रसिद्ध आहे. शिवाय शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात शिरपूरने भरारी घेतली आहे. विकासाच्या बळावरच पटेल कुटुंबिय तेथील आपली सत्ता आबाधित राखून आहेत. यावेळीही तसेच घडले. नगराध्यक्षपदी आमदार पटेल यांच्या पत्नी सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल या विजयी झाल्या. शिवाय नगरसेवकांच्या एकूण 30 पैकी 21 जागाही काँग्रेसने जिंकल्या. भाजपला 5, भाजप पुरस्कृतांना 2 आणि अपक्षांना 2 जागा मिळाल्या. नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव शहादा पालिकेच्या निवडणुकीत माजीमंत्री तथा भाजपचे आमदार डॉ. विजय गावित आणि त्यांच्या खासदार कन्या डॉ. हिना गावित यांनी परिवर्तन घडविले. काँग्रेसच्या ताब्यातील ही पालिका भाजपने जिंकली. भाजपतर्फे मोतीलाल फकिरा पाटील उर्फ मोतीलालतात्या विजयी झाले. नगरसेवकांच्या एकूण 27 जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 11 तर भाजपाला 10, एमआयएमला 4 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळाली.

‘खान्देश खबरबात’मधील याआधीचे ब्लॉग :

खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे

खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?

खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा

खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…

खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!

खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…

खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर

खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Embed widget