एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ (42) : कॅज्युअल सेक्सची पहिली गोष्ट
बदलत्या काळानुसार नातेसंबंधाच्या तऱ्हा बदलत जाणार, लोक नवनवे प्रयोग करत राहणार. त्यावर कुणी आक्षेप घेवो, न घेवो; योग्य – अयोग्य ठरवो, नैतिक – अनैतिक म्हणो... माणसं आपल्या सोयी बघत जगत – वागत राहणार, इतकीच वस्तुस्थिती शिल्लक राहते. बदलत्या काळाकडे तटस्थ कुतूहलाने बघायचं,

‘कॅज्युअल’ हा शब्द पहिल्यांदा आणि नंतर बरेचदा ऐकला तो प्रामुख्याने रजेबद्दल. ‘कॅज्युअल लिव्ह’ हे नोकरदारांसाठी एक भारी प्रकरण असायचं. मग मिंग्लिश बोलणाऱ्या लोकांमध्ये ‘एखादी गोष्ट कॅज्युअली घेणे’ हेही खूपदा ऐकलं. आता ‘कॅज्युअल सेक्स’ हा शब्द ऐकला, तेव्हा मात्र आधी डिक्शनरी उघडून ‘नेमक्या अर्थच्छटा’ काय आहेत, ते पाहूया म्हटलं. casual या शब्दाचे अर्थ कोशानुसार असे आहेत :
१. relaxed and unconcerned. ( relaxed, friendly, natural, informal, unceremonious, unpretentious, easy-going, free and easy, uninhibited, open; informal laid-back.)
२. not regular or permanent, in particular. ( temporary, part-time, impermanent, freelance ).
आता हे सर्व अर्थ लैंगिक संबंधांशी जोडून पाहिले, तर पारंपरिक पद्धतीने विचार करणाऱ्या लोकांचे अनेक भावनिक व वैचारिक गोंधळ उडू शकतात. अगदी आधुनिक म्हणवणाऱ्या लोकांचे विचार देखील हळूहळू, नकळत परंपरेत कसे सामील होताना दिसतात, याचीही एक मजेशीर झलक पाहण्यास मिळू शकते.
एका नव्या चित्रपट अभिनेत्याने हा शब्दप्रयोग एका मुलाखतीत वापरला. त्याला ‘नातेसंबंधां’बाबत प्रश्न विचारला असता, “सध्या माझी कुणी गर्लफ्रेंड नाहीये,” असं साधारण उत्तर त्याने दिलं. त्यावर मुलाखतकाराने अगदी सहजपणे विचारलं की, “मग सेक्सचं काय करतोस?” तेव्हा त्याने तितक्याच नि:संकोच सहजपणे उत्तर दिलं, “कॅज्युअल सेक्स करतो.” या उत्तराने प्रश्नकर्त्याचं समाधान झालेलं दिसलं, कारण तो अधिक छेडछाड न करता दुसऱ्या वेगळ्या प्रश्नाकडे वळला. ‘शरीरसंबंध’ हा शब्दप्रयोग लग्नपत्रिकेत सहजी वापरला जाणारा काळ एका वेगळ्या संदर्भात पुन्हा अवतरलेला दिसतो आहे, असं जाणवून मला गंमत वाटली. माझ्या आईवडलांच्या पिढीतच हा शब्दप्रयोग वापरणं बंद झालेलं होतं आणि ‘प्लेटोनिक लव्ह’ मोठं चर्चेत होतं. अशरीर प्रेमाच्या रोमँटिक कथांना भारी महत्त्व आलेलं होतं.
त्या पिढीच्या प्रभावात असलेल्या माझ्या काही मैत्रिणीना तर लग्न हवं होतं, मुलं हवी होती, पण ‘लैंगिक संबंध’ ही त्यासाठी मोजावी लागणारी ‘गलिच्छ किंमत’ आहे, असंही त्यांना ठामपणे वाटत होतं. प्रेमाखातर दुसऱ्या कुणाशीही लग्न न करता अथवा लैंगिक संबंध न ठेवता आजन्म अविवाहित राहिलेली माणसं ही अत्यंत आदर्श मानण्याचा भाबडेपणा समाजात होता. चोरूनलपून लफडी करणाऱ्या जोडप्यांमध्ये लैंगिक संबंधांचं इतकं अगाध अज्ञान होतं की, ‘चुंबन घेतल्याने मुलं होतात का’ असा प्रश्न तेव्हापासून ते थेट ‘हम दिल दे चुके सनम’च्या नायिकेला १९?? सालातही पडलेला होता. लग्न ठरलेल्या वा प्रेम करून लग्न करण्याचं ठरवलेल्या जोडप्यांमध्ये ‘लग्नाआधी – एकमेकांशीच हां – लैंगिक संबंध असावेत की नसावेत’ हा मुद्दा तत्कालीन कथा, नाटकं वगैरेंचा विषय बनलेला होता. ‘लग्न करायचं आहे आणि नंतर सेक्सही करायचा आहेच, तर मधला काळ वाया का घालवा?’ असं एका पक्षाचं ‘वास्तववादी’ मत होतं; तर दुसऱ्या नैतिकतावादी पक्षाला मात्र ‘इतकाही संयम ठेवता येत नसेल, तर संसाराचं अवजड शकट पुढे कसं चालवणार हे आततायी लोक?’ असं प्रामाणिकपणे वाटत होतं.
चर्चा करण्याच्या भानगडीत न पडता हवं ते करून मोकळे होणारे वर्ग असतातच. त्यातून बेकायदेशीर – कायदेशीर गर्भपात, कुमारीमाता, मुलींची दूरच्या नातलगांकडे पाठवून बाळंतपण करून मूल अनाथाश्रमाला देऊन दुसरीकडे परस्पर गुपचूप लग्न करून दिलं जाणं, लग्नाआधी प्रियकराशी लैंगिक संबंध आलेल्या मुलींना आयुष्यभर आपण पापकृत्य केलं – नवऱ्याला फसवलं अशी ओशाळवाणी भावना राहणं असे कैक प्रकार दुसऱ्या बाजूला घडत होतेच. कोणत्याच जातीधर्मांची लोकं त्याला अपवाद नव्हती. विनयभंग, शारीरिक चाळे, बलात्कार हे घरांमधूनही सर्रास होत होते. एकुणात लैंगिक संबंधांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी निकोप राहिलेली नव्हती.
या नंतरचा टप्पा थोडा पुढे सरकला, पण फार नाही. लग्नाआधीच्या, लग्नाशिवायच्या आणि लग्नबाह्य लैंगिक संबंधांचं प्रमाण वाढत गेलं. त्यातला गिल्ट वेगाने घटत गेला. ‘दोन व्यक्तींची मर्जी’ असं म्हणून दुर्लक्षही केलं जाऊ लागलं. तरीही इतर कुठलंही राजकारण असेल, तर त्यात मात्र हे ‘नैतिक-अनैतिक’ वर्तनाचे मुद्दे आवर्जून उपस्थित केले जात राहिलेच. प्रेम असेल तर लैंगिक संबंध असायला हरकत नाही, या मुद्द्यावरून पुढे सरकून ‘निव्वळ आकर्षण असलं तरीही लैंगिक संबंध असायला हरकत नाही’ इथवर विचार माझी पिढी करू लागली. ‘संवाद नसेल, तर लैंगिक संबंध निरस, यांत्रिक बनतील, त्यामुळे लैंगिक संबंधांसाठी आपसात संवाद असणं महत्त्वाचं’ असं एक माझं मत मी दहा-बारा वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका कादंबरीत पात्राच्या तोंडून वदवलं होतं. आजच्या ‘कॅज्युअल सेक्स’ला हरकत नाही, असं मानणाऱ्या पिढीला ते हास्यास्पद वाटू शकतं. कारण त्यांच्या दृष्टीने ‘तात्पुरती गरज भागवणे’ हे महत्त्वाचे बनले आहे. आणि ती गरज अनेक व्यक्ती भागवणार हेही गृहीत आहे. दुसरा एक अभिनेता त्यामुळेच तर आपले ज्या स्त्रियांशी लैंगिक संबंध आले, त्यांचा ‘३५० राउंड फिगर समजा’ असं सहज म्हणत आकडा सांगून टाकतो.
लग्नाचं वय वाढत गेलेलं दिसतंय आणि वयात येण्याचं वय कमी होत चाललं आहे. काही जणांना लग्नाची जबाबदारी आयुष्यात कधीच नकोय; काहींना लग्न वा लिव्ह इनचा पर्याय चालेल पण मुलं अजिबातच नकोहेत. काहीचं अर्धं आयुष्य घर सोडून प्रवासात आणि कामकाजात जातं. मग यांनी इतका काळ लैंगिक सुख अनुभवायचंच नाही का? आपल्या गरजांचं दमन करून विकृती वाढवत न्यायची का? ताण वाढवत न्यायचे का? शेकडो तऱ्हांनी माणसं लैंगिक सुखापासून वंचित असतात. यात स्त्री-पुरुष सगळेच आले. वेश्यांकडे जाण्याचा पर्याय पुरुष पूर्वापार वापरत आले आहेत, आता निदान महानगरं आणि मोठ्या शहरांमधल्या स्त्रियांनाही हा पर्याय उपलब्ध आहे. मात्र ‘आर्थिक देवाणघेवाण’ वा ‘विक्रीखरेदी’ न करता, थोड्या का होईना परिचित असलेल्या सज्ञान स्त्री-पुरुषांनी ‘कॅज्युअल सेक्स’ करण्यात काय वावगं आहे? – असा प्रश्न ही पिढी विचारते. त्यांना भावनिक गुंतागुंत, बाकी अपेक्षा आणि अपेक्षाभंग वगैरेही नकोय. जोखीम माहीत करून घेऊन, उचित साधनं वापरून, एकमेकांच्या अनुमतीने ते तात्पुरते लैंगिक संबंध ठेवत असतील तर हरकत काहीच नाही. मात्र भावनिक गुंतागुंती होणारच नाहीत, शारीरिक त्रास / दुखणी होणारच नाहीत, हिंसा-फसवणूक वाट्याला येणारच नाही, आर्थिक वा इतर व्यावहारिक फायद्यांच्या ( एखादं काम मिळवून देणं, प्रमोशन, पुरस्कार, पद इत्यादी मिळवून देणं वगैरे ) गरजा अशा संबंधात छुप्या ठेवलेल्या असणारच नाहीत याची काय खात्री? कारण मैत्रीत, प्रेमात, लग्नात देखील असे असंख्य घोळ होत असतातच.
बदलत्या काळानुसार नातेसंबंधाच्या तऱ्हा बदलत जाणार, लोक नवनवे प्रयोग करत राहणार. त्यावर कुणी आक्षेप घेवो, न घेवो; योग्य – अयोग्य ठरवो, नैतिक – अनैतिक म्हणो... माणसं आपल्या सोयी बघत जगत – वागत राहणार, इतकीच वस्तुस्थिती शिल्लक राहते. बदलत्या काळाकडे तटस्थ कुतूहलाने बघायचं, इतकंच आधीच्या पिढ्यांमधली माणसं प्रत्येक काळात करू शकतात. प्रेमाची पहिली गोष्ट, लग्नाची पहिली गोष्ट, तसं आता कॅज्युअल सेक्सची पहिली गोष्ट देखील स्क्रीनवर बघायला मिळेलच काही वर्षांत.
संबंधित ब्लॉग :
चालू वर्तमानकाळ (४१) : वय स्वीकारण्यातली सहजता
चालू वर्तमानकाळ : मनातल्या मनात मी
चालू वर्तमानकाळ (39) : लेदर करन्सीच्या पायघड्या
चालू वर्तमानकाळ : 38. आमचं काड्यामुड्यांचं घर रं या सरकारा...
चालू वर्तमानकाळ : 37. वंचितांच्या यशाची शिखरं चालू वर्तमानकाळ : 36. अजून कशा- कशासाठी कोर्टात जायचं? चालू वर्तमानकाळ 35. त्या पळाल्या कशासाठी? चालू वर्तमानकाळ 34. बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे चालू वर्तमानकाळ : 33. अभ्यासकाचे जाणे! चालू वर्तमानकाळ : 32 आमचा काय संबंध! चालू वर्तमानकाळ : (31) आमचा काय संबंध! चालू वर्तमानकाळ (31) : शेवटचा दिस गोड व्हावा चालू वर्तमानकाळ (30) : बाई, आई, स्तनपान, चर्चा... वगैरे चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली! चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्स चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा? चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत? चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो… चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही… चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये! चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’ चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
View More























