एक्स्प्लोर
घुमक्कडी : 46. चिमूटभर मिठाच्या समुद्राएवढ्या गोष्टी!

स्वयंपाक करताना वा जेवताना मीठ खाली सांडलं, तर मृत्यूनंतर स्वर्गात / नरकात कुठेही गेलात तरी शिक्षा म्हणून त्या मिठाचा एकेक कण पापणीने उचलावा लागतो... अशीही एक कथा आम्ही लहानपणी ऐकलेली होती. त्या धास्तीने कुणी कधी कणभर मीठ देखील वाया घालवायचं नाही. आम्ही समुद्र तोवर पाहिलेला नव्हता आणि रोजच्या जेवणातलं पांढरं मीठ व उपासाच्या पदार्थांमधलं काळं मीठ कुठे पिकतं वगैरे कल्पनाच नव्हती.
समुद्रात मीठ पिकवणारं जादूचं जातं पडून ते अजूनही दळत असल्याने पाणी खारं असल्याची कथा भारत आणि जर्मनीसह डेन्मार्कमध्येही सापडली. गोष्टीचा नायक हॅन्स नावाचा आजीने सांभाळलेला अनाथ मुलगा आहे. त्या बेटावर तो आणि आजी दोघंच राहत असतात. मरताना आजीने त्याला कॉफी दळायचं असतं तसं एक जातं दिलं आणि ते जादूचं असून हवं ते अन्न देईल असं सांगितलं. सुरू करण्याचा मंत्र होता, ‘घरातल्या जात्या, दळून दे’ आणि थांबवायचा मंत्र होता, ‘घरातल्या जात्या, दळायचं थांब.’ आजी मरून गेल्यावर हॅन्स बेटावर एकटाच राहिला. जात्याकडून अन्न तर मिळायचं, पण बोला-चालायला तिथं दुसरं कुणीच नव्हतं. मग तो एकटाच बेटाच्या दुसऱ्या टोकापर्यंत चालत गेला, तिथं त्याला समुद्रात बरीच जहाजं दिसली. जहाजाने फिरावं आणि सगळं जग बघावं, असं त्याच्या मनात आलं. त्यानं एखाद्या जहाजावर काही काम मिळेल का, याची चौकशी केली आणि वरकामासाठी एखादा बारका पोरगा एका कप्तानाला हवाच होता, त्यानं हॅन्सला नोकरी दिली. पण एकदा का जहाजाने प्रवास सुरू केला की, हॅन्सचा छळ सुरू झाला. त्यानं जुमानलं नाही, तेव्हा त्याला उपाशीपोटी कोंडून ठेवण्यात आलं. पण जात्यामुळे त्याला अन्न मिळत होतंच. अखेर कप्तानाला त्याचं गुपित समजलं. त्यानं जातं विकत घेण्यासाठी हॅन्सला भरपूर किंमत देऊ केली. पण त्यानं नकार दिला. त्यांनी हॅन्सला उचलून पाण्यात फेकून दिलं, तेव्हा नेमकं त्यानं जात्याकडे मीठ मागितलं होतं. जातं बंद करण्याचा मंत्र कप्तानाला माहीत नव्हता. जहाज मिठानं भरून गेलं आणि दुष्ट माणसांना जलसमाधी मिळाली.
आईसलँडच्या लोककथेत जातं हिरावून घेणारा एक समुद्रीराजा आहे. इथल्या जात्याला ग्रॉटी असं नाव आहे. ते फॉडी नावाच्या दयाळू राजाला त्याच्या एका चाहत्या नागरिकाने भेट म्हणून दिलं होतं. ते दिसायला लहान असलं तरी चालवायला प्रचंड अवजड होतं. राजानं आपल्या नोकरांना ते दळून काही चांगल्या गोष्टी मागायला सांगितलं. त्यांनी आधी सगळ्यांसाठी थोडं सोनं मागितलं. मग राज्यासाठी शांतता मागितली. मग राजाला शांत व सुखाची झोप लागावी म्हणून कोकिळाहून मधुर गीत गाणारी गीतं मागितली. ते ती गीतं गाऊ लागले आणि त्यामुळे राजाला खूप काळाने शांत झोप लागली. समुद्रीराजा मिसिंगर हे सगळं गुपचूप पाहत होता. फॉडीची लोकप्रियता पाहून त्याचा जळफळाट झाला. फॉडीला झोप लागल्याचा फायदा घेऊन त्यानं हल्ला केला आणि जादुई जातं फॉडीच्या नोकरांसह कब्जात घेऊन जहाजावर गेला. जहाज समुद्रात खूप दूर आलं तेव्हा त्यानं फॉडीच्या नोकरांना आज्ञा दिली की, “माझ्यासाठी उत्तमोत्तम मिठाया बनवा!”
त्यानुसार त्याला फॉडीच्या नोकरांनी भरपूर मिठाया बनवून दिल्या. समुद्रीराजाचं तोंड मिठाया खाऊन गोडमिट्ट झालं. मग नोकर म्हणाले, “थांबा, तुम्हाला काहीतरी चांगलं खारं बनवून देतो.”
राजाला ‘खारं’ असं काही असतं हे माहीतच नव्हतं. त्यानं कधीच मिठाचे पदार्थ चाखले नव्हते. त्यामुळे त्याने होकार देताच नोकरांनी जात्याकडे मीठ मागितलं आणि ते पाण्यात उड्या टाकून आपल्या राज्याकडे पोहत निघाले. मिसिंगरचं जहाज थोड्याच वेळात मिठाने भरून बुडालं आणि समुद्राच्या तळाशी जातं कायम मीठ देतच राहिलं.
( बुडणाऱ्या जहाजाचं पेंटिंग : एडवर्ड मोरान )
पाचवी गोष्ट भारतीय गोष्टीसारखीच दोन गरीब व श्रीमंत असलेल्या भावांची आहे; ती आहे नॉर्वेमधली. ख्रिसमसची आदली रात्र असते. गरीब भावाकडे खायला काहीच नसतं, म्हणून तो श्रीमंत भावाकडे मागायला जातो. तो आल्याचं श्रीमंत भावाला मुळीच आवडत नाही, तरी तो म्हणतो, “मी सांगतो ते केलंस तर मासे, खेकडे, कोंबडीच काय; हा बेकनचा मोठा तुकडादेखील मी तुला देईन.”
गरीब भाऊ होकार देतो. मग श्रीमंत भाऊ सांगतो, “हे मांस घे, चालायला लाग आणि नरकात जा.”
गोंधळलेला गरीब भाऊ चालत निघतो आणि खूप वेळाने एका जागी पोचतो. तिथं त्याला एक म्हातारा भेटतो, तो म्हणतो, “हाच नरक आहे. तू इथं कशाला आलास?” त्यानं आपली कर्मकथा सांगितली. ती ऐकून म्हातारा म्हणाला, “इथं मांस अजिबात मिळत नाही, त्यामुळे सगळी भुतं तुझ्याकडचं मांस घ्यायला येतील आणि कमी पडलं तर तुला खातील. त्यामुळे या जात्यात तो तुकडा घाल आणि मी शिकवतो तसं म्हण. म्हणजे सगळ्यांना भरपूर मांस देऊ शकशील.”
काही वेळातच मांसाच्या वासानं लहान-लहान पक्ष्यांसारखी उडत उडत असंख्य महाकाय व इवलुशी भुतं त्याच्याजवळ आली. तो जात्यामागे लपून त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला मांस तर देईन, पण त्या बदल्यात ख्रिसमसपुरतं का होईना, हे जातं मला हवं. ते तुम्ही मला नेऊ द्या.”
सगळे त्या वासानं इतके हावरे झाले होते की, आपण कशाला होकार देतोय हे त्यांना कळलंही नाही. जेव्हा समजलं, तेव्हा उशीर झाला होता.
जातं कसं वापरायचं हे सांगितल्याबद्दल गरीब भावाने म्हातारबांचे आभार मानले आणि पुन्हा चालत घरी परतला. तेव्हा सगळीकडे मेजवान्या सुरू होत्या, पण त्याच्या घरात अंधार होता. त्यानं जात्याकडे एकेक गोष्ट मागायला सुरुवात केली. घर खाद्यपदार्थ आणि इतर अनेक सुंदर चीजवस्तूंनी भरून गेलं. आपलं सगळं घर त्यानं सोन्यानं मढवलं. एके दिवशी त्याचे सुवर्णकाम केलेले पडदे उडून समुद्राकडे गेले. एका जहाजावरच्या कप्तानाने ते पाहिले. त्यानं सगळी माहिती काढली आणि जातं पळवलं. काहीतरी साधं मागून पाहू म्हणून जात्याकडे आधी मीठ मागितलं...
पुढची गोष्ट आधीच्या चार गोष्टी वाचून तुम्हांला समजली असेलच.
चिमूटभर मिठाच्या समुद्राएवढ्या गोष्टी!
‘घुमक्कडी’मधील याआधीचे ब्लॉग :

घुमक्कडी (45) : समुद्राचं पाणी खारं का झालं?
घुमक्कडी (44) : कोळ्याच्या जाळ्यात पृथ्वी! घुमक्कडी (43) : बिघडलेलं दुरुस्त करणारे जादूगार बैगा घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार घुमक्कडी (41) : समुद्राची निर्मिती आणि सूर्यचंद्राची वाटचाल घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई ! घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे! घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून… घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं… घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट! घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले… घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा घुमक्कडी (27) भई जब लाखो उदला वायरो घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय घुमक्कडी (25): साकाचं बेट घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा! घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे! घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल! घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…! घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील! घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा! घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना घुमक्कडी : (2) सीतेची तहान घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाईView More
Advertisement
Advertisement