एक्स्प्लोर

IPL 2025 RR vs LSG: लखनौच्या आवेशात राजस्थान अयशस्वी

IPL 2025 RR vs LSG: १६ एप्रिल रोजी दिल्ली इथे झालेल्या दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात शेवटच्या षटकात ९ धावा हव्या होत्या ..गोलंदाज होता स्टार्क...आणि फलंदाज होते हेटमायर आणि ध्रुव  जुरेल..सामना राजस्थान हरला..
काल जयपूर इथे शेवटच्या षटकात राजस्थान संघाला जिंकायला हव्या होत्या ९ धावा पुन्हा एकदा फलंदाज होते हेटमायर आणि ध्रुव ज्यूरेल गोलंदाज होता आवेश खान...पुन्हा एकदा राजस्थान संघ हरला...याला जबाबदार कोण? संपूर्ण सामन्यात उत्तम खेळणारा फिनिशिंग टच देऊ न शकलेला यशस्वी की आवेश च्या गोलंदाजीवर सरळ फटका न खेळता लॅप शॉर्ट खेळणारा कर्णधार रियान? शेवटच्या ३ षटकात २५ धावा हव्या असताना १८ व्या षटकात आवेशाच्या पहिल्या चेंडूवर सेट झालेला यशस्वी त्रिफळाचित होतो आणि त्या षटकात ५ धावा आल्या असताना शेवटच्या चेंडूवर रियान आत्मघातकी फटका मारून आपल्या संघाला अडचणीत आणतो..

शेवटच्या २ षटकात २० धावा हव्या असताना प्रिन्स यादव १९ व्या षटकात ११ धावा देतो आणि सामना शेवटच्या षटकात नेतो...समोर हेटमायर  असताना तो यॉर्कर या अस्त्रावर ठाम राहून गोलंदाजी करतो..ज्या चेंडूवर  हेटमयार बाद होतो तो ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याचा हवेतील फ्लिक दबावाखाली शार्दुल उत्तम रित्या टिपतो..आवेश ने टाकलेले १९ वे षटक आणि २० वे षटक ..या दोन्ही षटकात त्याने अचूक यॉर्कर टाकले..याचे श्रेय त्याला द्यावे लागेल..
कर्णधार ऋषभ पंत चे सुद्धा कौतुक करावे लागेल ..यशस्वी आणि रियान खेळत असताना सामना १७ व्या षटक पर्यंत सामना राजस्थान संघाचा असतो..पण पंत हार मानत नाही ...आपले क्षेत्ररक्षक नेमक्या ठिकाणी ठेवून तो चौकार रोखून धरतो आणि राजस्थान संघावर दबाव वाढवितो..आवेश वर त्याने दाखविलेला विश्वास तो सार्थ ठरवितो...

१८१ धावांचे आव्हान घेऊन उतरलेला राजस्थान संघाकडून आज वैभव सूर्यवंशी इतिहास घडवितो..१४ वर्षाचा वैभव आज क्रिकेट जगतातील मोठ्या प्लॅटफॉर्म वर आपल्या खेळाची सुरुवात षटकार मारून मोठ्या थाटात करतो..त्याच्याकडे धाडस आहे...गुणवत्ता आहे...वय आहे...या हिऱ्याला जर पैलू पाडले तर तो भारतीय क्रिकेटची खूप सेवा करू शकेल...पण आय पी एल नावाची मेनका भल्या भल्या विश्वमित्रांची तपश्चर्या भंग करते...त्याने स्वतःचा विश्वामित्र होऊ न देणे हे त्याच्या हातात आहे...यशस्वी आणि त्याने ८५ धावांची सलामी दिली. पंत ने त्याला खूप चपळाईने यष्टीचीत केले.. त्यांनंतर राजस्थान कडून रियान पराग आणि यशस्वी यांचकडून ६२ धावांची भागीदारी केली..यशस्वी ने आज पुन्हा एकदा ४ षटकाराच्या मदतीने ७४ धावा केल्या..लखनौ संघाकडून मकरम आणि बदोनि यांनी आपापले अर्धशतक पूर्ण केले... बदोनि जस जसा मोठा होत आहे तस तशी त्याची खेळाबद्दलची समज. ..फटक्यांची निवड ...या दोन्ही गोष्टीत तो अधिक परिपक्व होत चालला आहे... लखनौ संघाची धावसंख्या १८० पर्यंत नेण्यात समद च्या दहा चेंडूतील 30 धावांचा वाटा होता..आज सुद्धा हा सामना गोलंदाजांनी जिंकून दिला..शेवटच्या २ षटकातील आवेश ने आवेशात टाकलेले यॉर्कर लखनौ संघाच्या संघ मालकांच्या चेहऱ्यावर हसू आणून गेले.. आज आवेश ने आणले ऋषभ कधी आणेल हाच काय तो प्रश्न...

संबंधित लेख:

IPL 2025 RCB vs PBKS: बंगळुरुचा आत्मघात; पंजाबचा थाट

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
Embed widget