IPL 2025 RCB vs PBKS: बंगळुरुचा आत्मघात; पंजाबचा थाट

काल झालेल्या पंजाब विरुद्ध बंगलोर या सामन्यात पंजाब संघाने त्यांच्या लौकिकास साजेसा खेळ करून १० गुणांसहीत आघाडी घेतली...त्यांनी हा सलग दुसरा विजय मिळविला...या आगोदर त्यांनी छोट्या धावसंख्येचा बचाव केला. आणि आज छोटी धावसंख्या यशस्वीरित्या पार केली..
पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून बंगलोर संघास प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले...सॉल्ट ने आर्षर्दीप ला एक सरळ चौकार मारून सुरुवात छान केली..पण नंतर त्याने जो आत्मघाती फटका खेळून आत्मघाताची सुरुवात केली त्याचे अनुकरण बंगलोर संघाच्या प्रत्येक फलंदाजाने केले..अपवाद फक्त टीम डेव्हिड चा...सॉल्ट...विराट.. लिविंगस्टोन...हे लेंथ बॉल वर बाद झाले...खरे तर २०/२० क्रिकेट मधे या चेंडूवर षटकार वसूल करायला हवा...त्याच्यानंतर... जतीन चहल ला स्वीप करताना स्क्वेअर लेग सीमारेषेवर बाद झाला..रजत थोडी समजुतीने फलंदाजी करतोय असे वाटत असताना तो चहल ला चिन्ना स्वामीची छोटी सीमारेषा बघून बाहेर फेकायला गेला आणि बाद झाला...मार्को जॉन्सन च्या एका अप्रतिम बाउन्सर वर कुणाल बाद झाला...या सर्व पडझडीत टीम डेव्हिड हुशारीने खेळत होता...काही फटके तो चेंडूच्या जवळ जाऊन ..तर काही फटके उशीरा खेळून त्याने आपले अर्ध शतक पूर्ण केलं...
हरप्रीत बार चा एक चेंडू भुवि ने बॅकवर्ड सीमारेषेवर मारून चौकार वसूल केला...आणि पुढील चेंडू तो चिन्ना स्वामीच्या च्या बाहेर फेकायला गेला..आणि बाद झाला..खरे तर त्याने टीम डेव्हिड ला अधिक फलंदाजी कशी मिळेल हे पाहायला हवे होते...पण आय पी एल ही स्पर्धा तुम्ही स्वतःच किती मोठे हिरो आहेत हे तुमच्या मनात भरवत असते..आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता..बंगलोर संघाची सर्वात मोठी भागीदारी ही दहाव्या विकेट साठी टीम डेव्हिड आणि हेझलवूड यांच्या मध्ये झाली यावरून बंगलोर संघाचे कोसळणे लक्ष्यात येते...९६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेला पंजाब संघ सुद्धा बंगलोर संघाच्या आत्मघातच्या वाटेवरून जात आहे की काय अशी सुरुवातीला शंका यावी..अशी गोलंदाजी भुवि आणि हेझलवूड यांनी केली...हेझल वूड याने कसोटी क्रिकेटप्रमाणे आपला टप्पा उजव्या यष्टी बाहेर ठेवून पंजाब संघाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला...पण ९६ धावत पंजाब चा बुरूज कोसळेल इतका तो कमजोर ही नाही आणि तितके इंधन बंगलोर संघाच्या गोलंदाजीत नव्हते..१९ चेंडूत ३३ धावांची खेळी करून नेहाल वढेरा ने सामना पंजाब चा केला..बंगलोर संघाची पडझड होत असताना त्यांनी दीपक पडिकल ला का खेळविले नाही हे समजण्या पलीकडे आहे..या आई पी एल मधे गेले काही सामने हे गोलंदाज जिंकून देत आहेत...कधी तो स्टार्क असतो..कधी चहल..तर कधी मार्को जॉन्सन...गोलंदाजांना दासी बनविण्याच्या या खेळात कधी कधी गोलंदाज पट्टराणी होऊ शकतात ही सुखावणारी गोष्ट आहे.
























