एक्स्प्लोर

BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : गावस्करांचं चुकलं की, त्यांना समजून घेताना अनुष्काचं चुकलं?

सुनील गावस्करांनी आपला मुद्दा हिंदीत मांडला असला तरी त्याचा आशय तोच होता. त्यामुळं गावस्करांनी कुठंही आपली अभिरुची सोडून काही भलतंसलतं वक्तव्य केलं होतं का? तर नाही. किंबहुना या प्रश्नाचं उत्तर अजिबात नाही असंच आहे.

आयपीएलच्या पाचवीला वाद जणू पूजलेले असावेत. त्यामुळं आयपीएल आली की, वादांची जणू मालिकाच सुरु होते. आयपीएलचा युएईतला तेरावा मोसमही त्याला अपवाद ठरलेला नाही. यंदाच्या आयपीएलचा नारळ फुटला, त्याला आठवडा व्हायच्या आत सुनील गावस्कर आणि अनुष्का शर्मामधल्या वादानं अवघ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं लक्ष वेधून घेतलं आहे.

त्याचं झालं असं की, अनुष्का शर्माचा पती आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली हा लागोपाठ दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. विराटनं सनरायझर्स हैदराबादसमोर १३ चेंडूंत अवघ्या १४ धावांची खेळी केली होती. मग किंग्स इलेव्हन पंजाबसमोर बंगलोरच्या कर्णधाराला पाच चेंडूंत केवळ एकच धाव करता आली. आजच्या जमान्यातला जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज पहिल्या दोन्ही सामन्यांत सपशेल अपयशी ठरतो, मग चर्चा तर होणारच.

त्याच पार्श्वभूमीवर बोलताना गावस्कर समालोचनात म्हणाले की, 'जितका तुम्ही सराव कराल तितकी तुमची कामगिरी उत्तम होऊ शकते, याची त्याला नेमकी कल्पना आहे. हे तो जाणतो. आता लॉकडाऊनच्या काळात त्यानं अनुष्काच्या बोलिंगवर सराव केला. त्याची चित्रफित आपण पाहिली. पण त्यानं फार काही साध्य होणार नाही.'

स्टार स्पोर्टसवरचं ते समालोचन हिंदीत होतं. त्यामुळं गावस्करांनी आपला मुद्दाही हिंदीत मांडला होता. त्यांनी आपला मुद्दा हिंदीत मांडला असला तरी त्याचा आशय तोच होता. त्यामुळं गावस्करांनी कुठंही आपली अभिरुची सोडून काही भलतंसलतं वक्तव्य केलं होतं का? तर नाही. किंबहुना या प्रश्नाचं उत्तर अजिबात नाही असंच आहे. पण सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात होळीला ठोकायची तशी बोंब रोज सकाळ-संध्याकाळ-रात्री ठोकली जाते. आणि एकानं बोंब मारली की दुसरा त्यावर रिअॅक्ट होतो. मग तो विषय ट्रेण्ड होईपर्यंत ते लोण पसरत जातं.

या साऱ्या चक्रात तो बोंब ठोकणारा पहिला माणूस किती खरं बोलला याचा फारसा विचारही होत नाही. आणि गावस्करांच्या बाबतीत तर त्यांच्या विधानात मोडतोड करुन ते पसरवण्यात आलं. अनुष्काच्या गोलंदाजीवर विराटनं त्यांच्या अपार्टमेंटमध्ये सराव केला होता... त्याची चित्रफित नुकतीच व्हायरल झाली होती.. हा सारा संदर्भ त्या समालोचनात येतो आहे. पण तरीही गावस्कर आणि अनुष्का यांच्यातला वाद विनाकारण पेटला. किंबहुना तो पेटवण्यात आला.

काही रिकामटेकड्या मंडळींना उद्योग नसतो. काहीजणांना तेवढाच उद्योग असतो. मग ध चा मा करुन सोशल मीडियावरून वाद पेटवण्यात येतात. आणि मेन स्ट्रीम मीडियानं सारासार विचार न करता त्या वादाला स्थान दिलं, तर परिस्थिती आणखी चिघळते. पण सुनील गावस्कर यांच्या सुसंस्कृत स्वभावाची कल्पना असल्यामुळं मेन स्ट्रीम मीडियानं सोशल मीडियावरच्या मखलाशीला वेळीच ओळखलं. त्यामुळं गावस्करांच्या वक्तव्याविषयी आणखी गैरसमज पसरला नाही.

पण अनुष्का शर्माला गावस्करांची टिप्पणी भलतीच बोचली. तिनं गावस्करांना थेट स्त्रीवादाच्या कोर्टात उभं केलं. तिनं इन्स्टाग्राम स्टेटसवर पोस्ट करुन गावस्करांना काही प्रश्न केले आहेत. त्यातल्या पहिल्या प्रश्नात अनुष्का म्हणते की, मिस्टर गावस्कर, तुम्ही तुमच्या टिप्पणीतून दिलेला संदेश अभिरुचीहीन आहे, हे वास्तव आहे. पण पत्नीला तिच्या पतीच्या अपयशासाठी जबाबदार धरताना एक सरसकट विधान करण्याचा तुम्ही विचार कसा केलात?

अनुष्का शर्मा ही हिंदी चित्रपटसृष्टीतली आजच्या जमान्याची एक हुशार आणि स्वतंत्र विचारांची अभिनेत्री असली तरी गावस्कर यांची समालोचनातली टिप्पणी तिनं नीट ऐकली आहे का, हा प्रश्नच आहे. कारण गावस्करांनी आपल्या समालोचनात विराटच्या अपयशासाठी अनुष्काला अजिबात जबाबदार धरलेलं नाही.

लॉकडाऊनच्या काळात विराटला आयपीएलला साजेशी पूर्वतयारी करता आलेली नाही. किंबहुना या काळात त्यानं अनुष्काच्या बोलिंगवर केलेला फलंदाजीचा सराव आयपीएलमधल्या यशासाठी पुरेसा नाही, एवढंच गावस्करांना त्या टिप्पणीतून सुचवायचं होतं, हे स्पष्ट दिसतं.

आता पाहूयात दुसरा मुद्दा, तो म्हणजे अनुष्का शर्मा स्त्री आहे म्हणून तिला हिणवल्याचा. सुनील गावस्कर यांचं क्रिकेटर म्हणून झालेलं ग्रूमिंग लक्षात घेतलं तर आयुष्यात कोणत्याही स्त्रीला कमी लेखण्याची चूक ते नक्कीच करणार नाहीत. याचं कारण गावस्कर स्वत: एका स्त्रीची गोलंदाजी खेळून लहानाचे मोठे झाले आहेत. ती स्त्री म्हणजे त्यांच्या आई मीनल मनोहर गावस्कर. छोट्या सुनीलना त्या घरात टेनिस चेंडूनं गोलंदाजी करायच्या.

द्स्तुरखुद्द मीनल गावस्कर यांनी आपल्या 'पुत्र व्हावा ऐसा' या पुस्तकात तो किस्सा लिहिला आहे. घरात सुनील यांच्यासोबत क्रिकेट खेळताना त्यांच्या स्ट्रेट ड्राईव्हवर चेंडू आपल्या नाकावर कसा आदळला... त्यामुळं आपलं नाक कसं फुटलं होतं... ही सारी कहाणी मीनलताईंच्या त्या पुस्तकात आढळते. गावस्करांच्या या ग्रूमिंगची कल्पना असलेली व्यक्ती त्यांना गैरलागू होणारे प्रश्न कधी विचारणार नाही.

सुनील गावस्कर यांच्यावर मध्यमवर्गीय मराठमोळ्या घरात झालेले संस्कार, वयाच्या ७१व्या वर्षांपर्यंत त्यांनी जपलेला सुसंस्कृतपणा, त्यांच्यातली माणुसकी, त्यांचं राष्ट्रप्रेम याविषयी इतके किस्से प्रचलित आहेत की, त्यांच्याविषयी संशय घ्यायला जागाही उरत नाही.

एकदा एका सामन्याच्या प्रक्षेपणादरम्यान दीपिका पदुकोण तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. त्यानंतर एका समालोचकानं गावस्करांना तिच्यासोबत वावरताना कसं वाटत होतं, हा प्रश्न थिल्लरपणे विचारला. त्या वेळी गावस्करांनी दिलेल्या उत्तरावर त्या समालोचकाचा पांढराफटक पडलेला चेहरा मला आजही आठवतो.

गावस्कर म्हणाले होते, 'दीपिकाला मी ती चिमुरडी असल्यापासून ओळखतो. तिचे वडील प्रकाश पदुकोण हे माझे मित्र आहेत. आम्ही दोघं समकालीन आहोत. त्यामुळं प्रकाशची आणि माझी जुनी मैत्री आहे. त्या मैत्रीमुळंच दीपिकाला मी लहानपणापासून ओळखतो. ती मला मुलीसारखी आहे.'

याच गावस्करांनी १९९२ साली मुंबईत उसळलेल्या धार्मिक दंगलीत थेट रस्त्यावर उतरुन एका मुस्लिमधर्मियाचे प्राण वाचवले होते. एका पाकिस्तान दौऱ्यात त्यांनी मी तर फक्त लता मंगेशकर यांना ओळखतो, अस त्यांनी नूरजहांला तोंडावर सांगितलं होतं. निव्वळ वर्णाच्या निकषावर स्वत:ला उच्च समजत असलेल्या परदेशी खेळाडूंसमोर त्यांनी कधीच मान तुकवली नाही. किंबहुना भारतीय खेळाडूंना परदेशी खेळाडूंच्या डोळ्यात डोळे घालून बघायला त्यांनीच पहिल्यांदा शिकवलं.

सुनील गावस्करांचा हा सारा लौकिक क्रिकेट मैदानाबाहेरचा आहे. त्यांच्या क्रिकेट मैदानातल्या लौकिकाविषयी आणखी किती सांगावं? ही सारी प्रतिष्ठा त्यांनी गेल्या ४९ वर्षांच्या प्रवासात मिळवली आहे. आज वयाच्या ७१व्या वर्षी त्या प्रतिष्ठेला धक्का बसेल किंवा त्या प्रतिष्ठेची हानी होईल असं विधान त्यांच्याकडून आजवर झालं नव्हतं आणि यापुढंही होणं शक्य नाही.

विजय साळवी यांचे अन्य ब्लॉग :

BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : झुंजार माणसा, झुंज दे… असं कृतीतून सांगणारा क्रिकेटर

BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : चुकांमधून शिकण्याची वृत्ती हेच रोहित आणि सूर्यकुमारच्या यशाचं गमक

BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : वादळवारं सुटलं ग.. आयपीएलचं तुफान उठलं ग.. BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : बंगलोरचा आयपीएलमधला इतिहास बदलण्याची जबाबदारी देवदत्त पडिक्कलवर BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : ख्रिस गेलला का बसवलं आणि अजिंक्य रहाणेचं घोडं अडलं कुठे? BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : जय हो अंबाती रायुडू, जय हो फाफ ड्यू प्लेसी
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
Embed widget