एक्स्प्लोर

BLOG :शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर 'या' 25 चुका टाळा

मुंबई : 2016 साली शेअर मार्केट सुरू केलं, तेव्हा शिकण्यासाठी आत्तासारखी माध्यम, influencers, youtube video उपलब्ध नव्हती. त्यामुळे काय करावं समजत नव्हतं. यात अनेक चूका केल्या. अर्धवट माहितीवर चार्टच निरीक्षण करून पैसे टाकले. फंडामेंटल- टेक्निकल कशाशी खातात हे ही समजत नव्हतं. त्यात रिटेलर्स जी चूक करतात तीच मी सुद्धा केली.

5 रुपयांचा स्टॉक 10 रुपयाला जरी गेला तरी पैसे दुप्पट अस म्हणून मूर्खांसारखे पेनी स्टॉक मध्ये पैसे टाकले. शेवटी व्हायचं तेच झालं. यातले अर्धे स्टॉक 90 टक्के उतरले तर काही डिलिस्ट झाले. अक्खा पैसा गेला. 8 हजार रुपये पगार असताना 2 लाख 50 हजारांच नुकसान झालं.

मेहनत काटकसरीने साठवलेला पैसा गायब झाला. हताश निराश झालो. काही दिवस तर घशाखाली घास उतरत नव्हता. झोपताना पण तोच विचार. शेवटी शेअरबाजार आपल्यासाठी नाही असा विचार करत मार्केटला राम राम केला. पण 2020 मध्ये परत एन्ट्री घेतली आणि इथे गेलेले पैसे इथून वसूल करू शकतो या विचाराने अभ्यास सुरू केला आणि काही लॉसेस रिकव्हर केले. या सगळ्या प्रवासात, इतक्या वर्षात शेअर बाजारात काय करायचं नाही हे शिकलो.

2016 ते 2021 ही 6 वर्ष मार्केट मध्ये कोणत्या चुका करायच्या नाही हे शिकण्यात गेली. पण मार्केट मधून पैसे कसे निघतात हे शिकलो ते 2022-23 या वर्षात. सुदैवाने अनेक चांगली माणसं जोडली गेली. भरपूर शिकायला मिळालं. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार. पण सामान्य गुंतवणुकदार आजही काही चुका करून आपला पैसा घालवतात. त्यामुळे नेमक्या काय चुका मी केल्या ते सांगतो म्हणजे त्या टाळता येतील. खालील गोष्टी शिकण्यासाठी मी 2 लाख 50 हजार इतक्या लॉसेसची किंमत या अनुभवासाठी मोजलीये. हे पैसे मी ट्युशन फी समजतो.  तुम्हाला हे न्यू इयर गिफ्ट समजा. नव्या वर्षात या चुकांना आपण मागे टाकू ही अपेक्षा

1) रँडमली घाईघाईत कोणताही शेअर विकत घेणं

2) बातमी बघून लगेच शेअर विकत घेणं

3) मोठ्या इन्वेस्टरने एखादा शेअर घेतल्याच समजल की लगेच आपणही घेणं.

4) काहीही अभ्यास न करता पेनी स्टॉकच्या नादाला लागणं.  

5) शेअर स्वस्त वाटला म्हणून खरेदी करणं. या वाटण्याला valuation चे कसलेही पॅरॅमिटर न लावणं.

6) एखादा शेअर केवळ खूप पडला म्हणून विकत घेणं

7) कुठलाही शेअर घेताना कंपनीचा काहीही अभ्यास न करणं

8) शेअर पडल्यावर काहीही न बघता अॅव्हरेजिंग करत राहणं

9) शेअर घेण्यापूर्वी त्याचं व्हॅल्युएशन,फंडामेंटल, बिजनेस चेक न करणं

10) केवळ हा वर जाईल ही भावना ठेवून आंधळेपणाने घेणं

11) मोठी आणि चांगली कंपनीही अव्वाच्या सव्वा भावात घेतली की नुकसान होतच. (उदा- टाटा मोटर्स मी 2016 मध्ये 500 ला घेतला होता त्यानंतर त्याची किंमत 80 रुपयांपर्यंत आली होती. Tata motors कंपनी तेव्हाही चांगली होती आणि आताही आहे पण तेव्हा ऑटो सेक्टर मध्ये मंदी होती, धंदा होत नव्हता, कर्ज आणि त्यात कोव्हिड त्यामुळे योग्य कंपनी योग्य किंमतीत घेतली तरच फायदा होतो.

12) सेक्टर, मार्केटमध्ये काय हेडवाईंड, टेलवाईंड(प्रतिकूल अनुकूल स्थिती) आहे याची काहीही माहिती न ठेवणं.

13) चार्ट अप डाऊन दिसतोय म्हणून प्रीव्हीयस डाऊनला आला की लगेच घेणं. 

14) आपण घेतल्यानंतर स्टॉक वर गेला नाही की उगाच लॉग टर्मसाठी घेतलाय म्हणत होल्ड करणं. कळ काढणं

15) मोठी नकारात्मक बातमी आली की पॅनिक सेलिंग करणं. (नोटबंदी असताना सगळे बँक शेअर मी लॉसमध्ये घाबरून विकले पण नंतर बक्कळ वर गेले. तेही या निर्णयाचा बँकांवर काय परिणाम होणार हे न बघता)

16) आपण शेअर घेतला म्हणजे तो वर जाणारच हा अंधविश्वास बाळगणं. 

17) शेअर वर गेला की गडबडीत विकणं. यामुळे बऱ्याचदा काही पटींचा फायदा काही टक्क्यांवर आला. एक कंपनीचा स्टॉक मी 48 रुपयांमध्ये घेऊन 54 च्या आसपास विकला. त्यानंतर पुढच्या दोन वर्षात स्टॉक 300 च्या पार गेला. अस बऱ्याचदा घडलं. 

18)केलेल्या गुंतवणूकीचा ट्रॅक रेकॉर्ड न ठेवणं

19) valuation पेक्षा शेअरच्या किमतीवरुन तो स्वस्त महाग ठरवणं. म्हणजे 20 रुपयांचा शेअर स्वस्त आणि 500 रुपयांचा महाग.

20) सतत टीप शोधत राहणं. आणि त्या आंधळेपणाने फॉलो करणं.

21) स्टॉक consolidation मध्ये असल्यावर वैतागून विकणं

22) स्टॉक घेताना/ विकताना रिझल्ट न बघणं

23) कम्पनी मधल्या घडामोडींची माहिती न ठेवण

२४) स्टॉक खरेदी विक्रीबाबत सतत दुसऱ्यांच्या opinion वर अवलंबून राहणं.

25) सतत वर जाणाऱ्या स्टॉक ला चेस करण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे लागोपाठ 6 दिवस तो स्टॉक वाढला की मग आणखी वाढेल हा विचार करत घेणं. अश्याने खूपदा वरच्या प्राईस ला आपण अडकून पडतो. मग स्टॉक पडायला सुरुवात होते. (उदा.. AWL. 350 ला असलेला स्टॉक महिन्याभरात 700 पार गेला. अनेकांना वाटलं तो आणखी वर जाईल त्यामुळेअनेकांनी तो घेतला. त्यानंतर हा करेक्शन आलं ते अजूनही हा स्टॉक 400 च्या पार जाऊ शकला नाहीये)

आपला एकेक रुपया कष्टाचा, घामाचा आहे. तो आपल्या चुकांमुळे कोणाला पायघड्या टाकून देऊ नका. स्टॉक मार्केट मधून भरपूर पैसे कमवण शक्य आहे पण त्यासाठी स्वतःवर भरपूर काम करा. नव्या वर्षाचा हाच संकल्प करा आणि या चूका टाळा.

सर्वात महत्वाचं- शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार नाही. 
I repeat- शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार नाही. 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pankaja Munde On Voting : योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करा : पंकजा मुंडेSanjay Raut Allegation On Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा राऊतांचा आरोपRaksha Khadse Birthday Celebration : रक्षा खडसेंचा वाढदिवस, सासरे एकनाथ खडसेंकडून शुभेच्छाAnna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Chandrashekhar Bawankule : 'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Embed widget