एक्स्प्लोर

BLOG | ...आणि कोरोनाने पिच्छा सोडला!

लहानपणीपासुनच्या आजारपणात‌ मलेरियाचा ताप वगळता कावीळ, कांजण्या, छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन यात मी कधीच गलितगात्र झाले नाही. लोळत पडले नाही.‌ सगळी आजारपणं हसत खेळत निभावली. या पूर्वानुभवामुळे कोरोना आपल्यापाशी फिरकणार नाही हा जो काहीसा माझ्या शरिराला, आरोग्याला गृहीत धरण्याचा ओव्हर कॉन्फिडन्स होता तो आज गळून पडला होता.

कालच्या थकव्यातून आणि ताणातून काहीसा दिलासा देत आजच्या दिवसाची सुरुवात झाली. जरी माझी प्रकृती नाजुक असली आणि शरीरयष्टी बारीक असली तरीमला माझ्या काटक असण्याचा अभिमान होता. आपल्याला कधी साधी चक्करही आली नाही त्यामुळे मला काय होतंय? याची बेफिकीरीही मनात असायची.

लहानपणीपासुनच्या आजारपणात‌ मलेरियाचा ताप वगळता कावीळ, कांजण्या, छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन यात मी कधीच गलितगात्र झाले नाही. लोळत पडले नाही.‌ सगळी आजारपणं हसत खेळत निभावली. या पूर्वानुभवामुळे कोरोना आपल्यापाशी फिरकणार नाही हा जो काहीसा माझ्या शरिराला, आरोग्याला गृहीत धरण्याचा ओव्हर कॉन्फिडन्स होता तो आज गळून पडला होता.

सतत कामामागे पळणं, जेवताना फोन आले तर ते उचलणं, शरीर नीट साथ देतंय म्हणून व्यायामाची टंगळमंगळ करणं, आराम न करणं थोडक्यात कळत नकळत वर्कोहॉलिक बनणं हे सगळं आज अधिक‌ तीव्रपणे आठवू लागलं, टोचू लागलं. काही वर्षांपूर्वीचं माझं डाएट, व्यायाम, योग या सगळ्याबद्दल आग्रही असलेली मी कामाच्या व्यापात कशी बेशिस्त झाले हे मलाच उमगेना. पण आता हे सगळं दुरुस्त करायचं होतं. कोरोनातून बरं होऊन आयुष्याला परत शिस्त लावायची होती.

मी खाजगी लॅबमधून कोरोनाची चाचणी केल्याने कल्याण डोंबिवली मनपाला माझा अहवाल आज प्राप्त‌ होणार होता. अपेक्षेप्रमाणे सकाळीच केडीएमसीतून फोन आला. डॉ. गौडकरांनी माझी सगळी माहिती घेतली. घरी कोण असतं, त्यांची चौकशी केली. आणि आणि पुढच्या प्रक्रीयेप्रमाणे माझ्या घरी केडीएमसीची माणसं जातील आणि बिल्डींग सील करतील हेही सांगितलं.

घरच्यांची ओळख परेड झाली. त्यांना नियमानुसार गोळ्या दिल्या‌ गेल्या. नवऱ्याची टेस्ट‌ तातडीने कालच ‌केली होती त्याची नोंद घेतली. आमच्या मजल्यावर फवारे मारले आणि बिल्डींगमधल्या सगळ्या घरी केडीएमसीची माणसं‌ गेली.

आमच्या बिल्डिंगमधल्या प्रत्येकानं मला सहकार्य केलं. बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.‌ त्यांची नक्कीच थोडी गैरसोय झाली असणार पण त्यांच्या समजुदार पणाने मला खूप मोठा आधार दिला. सोसायटी सॅनिटाईज‌ झाली, सगळ्या मेंबर्सच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के बसले आणि सोसायटीच्या गेटला सील ठोकलं गेलं. हे ऐकून मला जरा अवघडल्यासारखं झालं पण तू तुझी काळजी घे इथली चिंता नको हे प्रत्येक मेंबरने सांगितलं.

BLOG | ...आणि कोरोनाने पिच्छा सोडला!

यादरम्यान ज्यांना माझ्याबद्दल समजतं होतं ते सगळेच काळजीपोटी फोन करु लागलेले. अनेकजण अनेक सल्ले देत होते. असं‌ कर, तसं करु नको. हे खा ते खाऊ नको.. वगैरे वगैरे... आधीच थोडा ताण त्यात प्रेमापोटी दिलेले हे सल्ले यामुळे मी नेमकं करु काय हे समजेना. आता आमची बिल्डींगही सील असल्याने सतत घरातून काही मागवणंही शक्य नव्हतं. आता मी गरम पाणी किंवा हळदीचं दूध सतत प्यायले नाही तर काय? मी फळं कोणती खाऊ, घरचं जेवण नाही मिळालं तरी चालेल का? अशा असंख्य प्रश्नांनी डोकं भणाणलं होतं. पण जे‌ सध्या उपलब्ध आहे ते नीट खायचं आणि ज्या गोष्टी मिळणं अवघड आहे‌ त्याचा ताण घ्यायचा नाही हे मनाशी अगदी पक्कं केलं.

पण आजचा 28 मेचा कोरोनासोबतचा दुसरा दिवस ‌तुलनेने सुसह्य आणि दिलासादायक होता. पण उद्याचा शुक्रवार 29 मे चा दिवस महत्वाचा असणार होता कारण उद्या माझ्या नवऱ्याचा टेस्ट रिपोर्ट अपेक्षित होता. लक्षणं दिसू लागल्यानंतर मी घरातल्या इतरांपासून जरी अलग झालेले असले तरी नवरा आसपासच होता.‌ काय हवं नको ते तोच पाहत होता. ‌त्यामुळे क्लोजेस्ट कॉन्टॅक्ट असल्याने सर्वाधिक धोकाही त्यालाच होता.

29 मेची सुरुवात मनात धाकधुक घेऊनच झाली. नवऱ्याचा रिपोर्ट कधी समजतोय याचीच वाट पाहत होते. वेळ घावण्याचे आणि टाईमपास करण्याचे सगळे फालतू प्रयत्न करुन झाले होते. मीही लॅबला फोन करून झाला पण रिपोर्ट काही आला नव्हता. फायनली सकाळी 10‌च्या दरम्यान रिपोर्ट समजला. नवरा निगेटिव्ह होता. हुश्श...!!! पण फोन ठेवला आणि रडुच आलं. तितक्यात नर्स आल्या, त्यांनाही कळेना की, मी का रडतेय.. कारण समजल्यावर हसु लागल्या आणि म्हणाल्या की, तुम्हीही पटकन घरी जाल.. चिंता करु नका. हसा आता आणि औषध घ्या..

BLOG | कोरोना आणि मी : ज्ञानदा कदम

मनावरचं मोठं दडपण अचानक हलकं झालेलं. ही आपल्या सगळ्यांचीच भावना असते की, मला काही झालं तर चालेल पण घरच्यांना नको. तीच कोरोनात तीव्रतेने जाणवते. कोरोना झालाय यापेक्षा आता माझ्या घरच्यांचं काय? त्यांना टेस्टसाठी करावी लागणारी पळापळ, त्यांचा रिपोर्ट काय‌ येणार याची चिंता, बिल्डींग सील होत असताना नकळत येणारं दडपण, 14 दिवस आपल्या आजारपणामुळे घरातच‌ क्वॉरंटाईन झालेले सोसायटीचे सदस्य या वातावरणाने माणूस अधिक त्रस्त होतो, अपराधी पणाची भावना रुजते असे मला वाटत. आजारपणाच्या काळात मानसिक स्वास्थ महत्वाचं पण या कोरोनाकाळात ‌कितीही प्रयत्न केला तरी सुरुवातीच्या दोन/ तीन दिवसात तेच थाऱ्यावर नसतं.‌

BLOG | ...आणि कोरोनाने पिच्छा सोडला!

माझे सुरुवातीचे दोन तीन दिवस तिथे रुळण्यात गेले. पण नंतर मलाही त्या रुटीनची तिथल्या वातावरणाची सवय झाली. यादरम्यान बिल्डींग सील झाल्यानं मला घरातून काहीच मागावता येत नव्हतं. आजारपणात चांगलं सकस‌ खाणं महत्वाचं. पण घरंच जेवण मला काही मिळत नव्हतं. इकडे हॉस्पिटलमधून रोजचा नाश्ता, चहा आणि जेवणाची सोय होती. काहीशा नाखुशीनेच मी त्या जेवणाकडे वळले. पण हॉस्पिटलच्या जेवणाने मला फार निराश केलं नाही. सकाळी वेळेत गरमागरम चहा आणि नाश्ता यायचा. दुपारी आणि रात्री जेवण. डाळ, भात, भाजी, पोळी किंवा पुरी असा आहार असायचा. सोबतीला मी घरातून सोबत नेलेली फळं आणि सुकामेवा खात होते. फार शारीरिक हालचाल नाही, कामाचा ताण नाही. त्यामुळे भूक लागण्याचं प्रमाण तसं कमीच होतं. अॅसिडीटी वाढू नये म्हणून हॉस्पिटल अँटासिडच्या गोळ्याही देत होतं.

BLOG | ...आणि कोरोनाने पिच्छा सोडला!

माझा दिवस साधारणपणे आठ साडेआठला सुरु व्हायचा. बेसिक गोष्टी आवरल्या की, नाश्ता करायचा, गोळ्या घ्यायच्या मग बाकीचं आवरल्यावर थोडे प्राणायामचे प्रकार करायचे, शांत बसायचे त्यात अर्धा तास‌ गेला की, नर्सच्या राऊंडची वेळ झालेली असायची. नर्स सगळ्या गोष्टींच्या नोंदी घ्यायच्या, थोडं बोलणं व्हायचं. तोवर घरातून किंवा मित्रमंडळापैकी एक दोघांचे फोन यायचे. मग थोडा वेळ फेसबुक, ट्विटर, इन्टाग्रामवर जायचा तोवर डॉक्टर आलेले असायचे. नर्सकडून सगळ्या नोंदी पाहून ते परत आस्थेने चौकशी करायचे. ‌काय काय होतंय ते विचारायचे, कोणतंही लक्षण किंवा त्रास होत असेल तर लगेच सांगा असं काळजीने सांगायचे. डॉक्टरांची व्हिजीट संपेपर्यंत दुपारच्या जेवण्याची वेळ झालेली असायची.

जेवण झालं की, परत नर्सचा राऊंड व्हायचा, औषधं घेतली की मी थोडावेळ झोपायचे. दुपारी 4 च्या दरम्यान चहा यायचा आणि सोबतच कुणीतरी नर्सही रुममध्ये डोकावून जायच्या. त्यानंतर मी फोनवर वेबसिरीज पाहायचे, अॅपवर काही गोष्टी वाचल्या यादरम्यानचा मोठा वेळ हा आलेल्या मेसेजेसला उत्तरं देण्यात जायचा. अधनं मधनं फोनही सुरु असायचे. यादरम्यान माझ्या रुममध्ये टिव्ही नसल्यानं तो पाहण्याचा प्रश्नच नव्हता. खरंतर हॉस्पिटलला दाखल होण्यापूर्वी टिव्ही आणि आरसा या दोन गोष्टींनी माझं आयुष्यं व्यापलेलं होतं. या दोन गोष्टी असंख्य वेळा माझ्या नजरेसमोर असायच्या आणि काय योगायोग माझ्या हॉस्पिटलच्या रुममध्ये या दोन गोष्टी दूरदूर पर्यंत नव्हत्या.

BLOG | ...आणि कोरोनाने पिच्छा सोडला!

सकाळ आणि दुपारची वेळ पटकन सरायची पण संध्याकाळी सात नंतरची वेळ अस्वस्थ करायची. एकतर मला खूप आधीपासून पिवळसर प्रकाशात फार फ्रेश वाटत नाही. पण हॉस्पिटलमध्ये अंधार पडला की याच पिवळ्या रंगाची उधळण असायची. खिडकीच्या समोर एक लग्नाचं लॉन होतं आणि त्याच्यापलीकडे आणखी एक हॉस्पिटल एका हॉस्पिटलच्या खिडकीतून दुसऱ्या हॉस्पिटलला पाहणं हे काही फार आनंददायी नसतं. पण त्या लग्नाच्या लॉनमध्ये अधुन मधून फिरणारी पांढरीशुभ्र बदकं काय तो विरंगुळा असायची.

पुढे सरकत होते आणि माझी प्रकृती सुधारत होती. आता माझं काम अशा क्षेत्रातलं आहे की, इच्छा असुनही कामापासून एकदम लॉकडाऊन होता येत नाही. माझ्या घरी (आमच्या सोसायटी ऑफिसमध्ये) लाईव्ह बुलेटिनचा सेट अप लावला होता. त्याच दरम्यान निसर्ग चक्रीवादळाचं कव्हरेज करण्यासाठी माझ्या सेटअपमध्ये असलेल्या लाईव्ह यूची ( लाईव्ह टेलिकास्ट करणारं मशीन) ‌ऑफिसला निकड होती.

मला त्याविषयीचे फोन सुरु झाले. आता परिस्थिती अशी की, मी हॉस्पिटलमध्ये, माझे घरचे घरातच‌ क्वॉरंटाईन आणि बिल्डिंगचं मेन गेट सील.. आता घरचा उंबरा ओलांडून सोसायटीच्या ऑफीसात जाऊन ते युनिट कॅमेरापासून अनप्लग करुन सोसायटी बाहेर उभ्या असलेल्या माणसापर्यंत पोहोचवायचं म्हणजे एक दिव्यचं होतं.‌ पण याक्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करत असल्याने ऑफिसच्या कामाची पद्धत आणि ईमर्जन्सीची पूर्ण जाणीव होती.‌‌ आता करायचं काय‌‌? हा मोठा प्रश्न होता. आता आरोग्य, वैयक्तिक आयुष्यं आणि ऑफीसची जबाबदारी याची नीट सांगड घालायची वेळ होती. सगळ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने मी हा प्रश्न नीट सोडवू शकले. माझ्या करिअरमध्ये आजवर असे अनेक प्रसंग आलेत पण सुदैवानं त्यावर नीट तोडगा काढता आलाय. असाच हा सुद्धा एक अनुभव गाठीशी बांधला गेला.

औषधोपचार सुरु झाल्यावर माझी लक्षणं हळुहळु कमी झाली, जवळपास पूर्ण बंद झाली. औषधांचा कोर्सही पूर्ण झाला. सोमवार 1 जूनपासून मी अंडर ऑब्जर्व्हेशन होते. ‌गोळ्या हायड्रोक्सीक्लोरिक्वीन आणि बाकी औषधांचा कोर्स पूर्ण झाला होता. माझ्यातली लक्षणं गायब झाल्याने सोमवारपासून मुख्य औषधं बंद झाली आणि फक्त मल्टिव्हिटॅमिन आणि कफ सिरप सुरु होतं. ऑक्सिमीटरवर ऑक्सीजनची लेव्हल पाहणं आणि अधुन मधुन ब्लडप्रेशर चेक करणं हा तर सवयीचा भाग झाला होता. डॉक्टर माझ्या प्रगतीमुळे खूष होते. ‌तुम्ही लवकरच बऱ्या होणार हे त्यांनी केव्हाच सांगून टाकलं. कोरोना पासून घाबरण्याचं कारण नाही फक्त तुम्ही योग्य खबरदारी घेणं महत्वाचं. वळेत निदान महत्वाचं, आणि लक्षणं दिसल्यावर तातडीने डॉक्टरांचा सल्ला.

मी परत स्वॅब टेस्टची विनंती केली होती. माझी टेस्ट रिपीट झाली. आणि परत‌ जीवघेणा वेटिंग गेम सुरु झाला. यादरम्यान सगळीकडे चर्चा सुरु होती निसर्ग चक्रीवादळाची. 3 जूनला यावर्षीचा पहिला पाऊस मी हॉस्पिटलमधूनच्या खिडकीतूनच अनुभवला. बाहेर सुरु होतं निसर्गाचं वादळ आणि माझ्या मनात‌ रिपोर्टच्या टेन्शनचं. निर्सग वादळामुळे बऱ्याच‌ ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम झाला होता. माझ्या रिपोर्टवरही त्याचा परिणाम झाला. रिपोर्ट अपेक्षित‌ वेळेनुसार हाती‌ पडला नाही. अशाच वेटिंग गेमदरम्यान फायनली माझ्या मोबाईलवर रिपोर्टची पीडीएफ फाईल रिसिव्ह झाली. शांतपणे फाईल ओपन केली. रिपोर्ट निगटिव्ह होता. हुश्श्श... फायनली कोरोनाचा चॅप्टर संपला होता.‌

BLOG | ...आणि कोरोनाने पिच्छा सोडला!

हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकल्यापासून ते हा निगेटिव्ह रिपोर्ट या सगळ्यादरम्यान या ‌हॉस्पिटलमध्ये मला भेटलेल्या कोविड योद्ध्यांबद्दल मी लिहणार आहे पुढच्या लेखात...‌ आणि हो कोरोनाच्या काळात काळजी काय घ्यायची काही समज गैरसमज यांचाही अनुभव शेअर करायचाय. ‌पुढच्या लेखात लिहीनच सविस्तर.

तोवर तुम्ही काळजी घ्या... आनंदी राहा!!

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget