एक्स्प्लोर

BLOG : 'सनशाईन'चा अस्त.. आठवणींचा उदय

गिरगाव आणि इराणी रेस्टॉरंट किंबहुना मुंबई आणि इराणी रेस्टॉरंट हे अत्यंत गहिरं नातं राहिलंय. नाक्यानाक्यावर किंवा रस्त्याच्या कोपऱ्यावर वसलेली ही रेस्टॉरंट्स म्हणजे गप्पांचा, मित्रपरिवाराला भेटण्याचा हक्काचा अड्डा. कटिंग चहा, बन-मस्का, ब्रुन-मस्का, ऑम्लेट-पाव, खिमा-पाव यासारखा मेन्यू, सोबत आपली जिवलग दोस्तमंडळी.

या इराणी रेस्टॉरंटचं इंटिरिअरही लक्षात ठेवण्यासारखं. नक्षीवाल्या लाकडी खुर्च्या, लाकडी गोलाकार सर्व्हिंग टेबलवर असलेली काच. असं नेपथ्य असलेली ही हॉटेल्स म्हणजे मुंबईकरांच्या संस्कृतीचा एक भाग राहिलीत. याच मालिकेतलं पण, सध्या नियमित हॉटेल्ससारखी आसनव्यवस्था असलेलं गिरगावच्या ठाकूरद्वार नाक्यावर वसलेलं सनशाईन हॉटेल बंद होण्याची बातमी आली आणि आणखी एक खाद्यसंस्कृती जपणारा आणखी एक सामाजिक धागा काळाच्या ओघात आता विरणार याची जाणीव झाली.

या रेस्टॉरंटची जागा धोकादायक इमारत परिसरात असल्याने ते बंद करुन पाडण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलंय. या बातमीने अनेक वयोगटातले गिरगाव हिरमुसले आहेत. सनशाईन हे ठाकूरद्वार नाक्यावरचं बेकरी प्रॉडक्ट मिळण्याचं हे हक्काचं ठिकाण. गिरगावकरांचा दिवस सूर्य उगवायच्या आत सुरु होतो, तो लवकर येणाऱ्या पाण्यामुळे. इथे नळाचं पाणी सुरु होतं आणि तिथे सनशाईनचं शटर वर जातं. कारण, सनशाईनही पहाटे पाचला उघडतं. बनपाव, बिस्किटं, केक्स खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ तिकडे सुरु होत असते. सकाळी भाजी घ्यायला, वॉक घ्यायला किंवा नाश्ता करायला मंडळी बाहेर पडतात. तेव्हा त्यांची पावलं सनशाईनकडे न वळली तरंच नवल. केवळ स्थानिक नागरिकच नव्हे तर वसई, विरारसारख्या लांबच्या भागातून नोकरीव्यवसायासाठी या परिसरात येणारी अनेक मंडळी इथे येऊन आपली पोटपूजा करुन मगच दिवसाची सुरुवात करत असत.

या रेस्टॉरंटबद्दल अनेक मंडळींना बोलतं केलं, तेव्हा आठवणींचे अल्बम एकामागोमाग एक उघडले गेले.

रेस्टॉरंटचे मालक बेहरुझ इराणी यांची यावेळी भेट झाली असता ते म्हणाले, माय ब्लड इज हिअर. माझं जणू या वास्तुशी रक्ताचं नातं आहे, असंच त्यांना सुचवायचं होतं. १०० वर्षांपूर्वी दळणवळणाची, वाहतुकीची व्यवस्था नव्हती, तेव्हा घोड्यासारख्या प्राण्याचा वापर प्रवासासाठी होत असे. आमचे पूर्वजही असेच इथे आले. तिथपासून आजचा हा दिवस आपण पाहतोय. ही रेस्टॉरंटरुपी परंपरा कायम राहावी, असं मला मनापासून वाटतंय.

रेस्टॉरंटचे मॅनेजर अशोक शेट्टीही यावेळी भावूक झालेले. ते म्हणाले, मी इथे आलो, तेव्हा 16 वर्षांचा होतो, तेव्हा मी इथे वेटरसारखी अनेक कामं केलीत. कालांतराने माझ्या कामाने मी मालकाचा विश्वास संपादन केला. आज मी वयाच्या पन्नाशीत आहे आणि गेली काही वर्षे मी इथलं व्यवस्थापन पाहतोय.

या रेस्टॉरंटमध्ये नियमित भेट देणारे काही खवय्ये गिरगावकर मला इथे भेटले. ज्यात विविध वयोगटातील व्यक्ती होत्या. वयाची 74 वर्षे पूर्ण करणारे दिलीप पोवळे आठवणींमध्ये चांगलेच रमले. आपण तब्बल सत्तर वर्ष इथे येत असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. या रेस्टॉरंटमध्ये अनंत काणेकर, बबन प्रभूंसारखी दिग्गज मंडळी इथे यायची ही खास आठवणही त्यांनी सांगितली. एक इंटरेस्टिंग किस्सा सांगताना ते म्हणाले, एके काळी या ठिकाणी हाफ ब्रुन पाव मिळायचा. तो 10 ते 15 पैशांमध्ये मिळत असे. कारण, तेव्हा कडकी तेजीमध्ये होती, त्यामुळे आम्हाला तसंच खावं लागायचं, अशीही कोपरखळी यावेळी त्यांनी मारली.

ज्येष्ठ वृत्तछायाचित्रकार घन:श्याम भडेकर हेही सनशाईनच्या आठवणीत जागवताना म्हणाले, हे रेस्टॉरंट आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर. तेव्हा मलाही ते आवडतं. इथे बाबूराव अर्नाळकर, आर.एन.पराडकरांसारखी विविध क्षेत्रातील मोठी माणसं येऊन बन-मस्का, ब्रुन-मस्क्याचा आस्वाद घेत. सचिन तेंडुलकरचे मामा इथेच जवळ राहात असत. त्याच मामांसोबत शालेय वयात सचिनही इथे यायचा.

याच परिसरात मेडिकल स्टोअर असलेले गिरगावकर शशिकांत शेट्टीही इथले नेहमीचे विझिटर. ते म्हणाले, इथला बन-मस्का, केकसह इथली खारी, पॅटिसही केवळ अप्रतिम. आज हे रेस्टॉरंट बंद होण्याची बातमी आल्यावर ठाणे, डोंबिवलीहून लोक इथे आवर्जून आले आणि त्यांनी नाश्त्याचा, चहाचा आस्वाद घेतला.

आणखी एक गिरगावकर कुमार गोखले यांनीही या रेस्टॉरंटशी आपलं नातं असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मला या रेस्टॉरंटबद्दल ज्या क्षणी बातमी कळली मी तात्काळ पत्नी आणि मुलीसोबत तिथे जाऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेऊन आलो. इथे तासन् तास गप्पा मारणं, हा त्या काळी आमचा नित्यक्रम असे.

सनशाईनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या दरवाज्यातून बाहेर पडलात की, समोर हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार राजेश खन्नांचं घर. म्हणजे त्याचे काका चुनीलाल खन्ना यांचं घर सनशाईनच्या अगदी समोरच्याच बिल्डिंगमध्ये. जिथे राजेश खन्ना यांचं वास्तव्य होतं. त्या घराच्या गॅलरीत तुम्ही उभं राहिलात की सनशाईनचं दर्शन तुम्हाला होतं. राजेश खन्ना त्यांच्या उमेदीच्या काळात इथे नियमित यायचे, असे जुने जाणते गिरगावकर नेहमी सांगतात. तसंच त्यांची आणखी एक गिरगावकर असलेले ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्याशी असलेली मैत्री पाहता ते दोघे एकत्रही इथे येत असत, अशीही आठवण काहींनी सांगितली.

अन्य रेस्टॉरंटसारखं आपलं खाणं आटोपलं की, इथे तुम्ही स्वत:हून बाहेर पडत नाही किंवा तुम्हाला कुणी तसं सांगतही नाही. त्यामुळे या रेस्टॉरंटशी असलेली नात्याची वीण आणखी घट्ट झालीय.

इथे आल्यावर एखाद दोन चहा घेऊन, बन-मस्का खात अनेक तास अनेक पिढ्यांनी गप्पांची मैफल रंगवलीय. बिस्किटे, केक्स ठेवलेल्या त्या कपाटाच्या काचेत पाहताना तुम्हाला त्या काळातल्या अनेक क्षणांचं प्रतिबिंब उमटताना दिसेल. आज अनेकांशी बोलत असताना त्यांच्या डोळ्यातही ते क्षण घर करुन होते. अनेकांचे डोळे ओलावले होते. अनेक जण सेल्फी किंवा फॅमिली फोटो घेत होते, पण तो नावाचाच. त्यांनी मनाच्या कॅमेऱ्याने या रेस्टॉरंटला, इथे जगलेल्या असंख्य क्षणांना आपल्या हृदयाच्या एका कोपऱ्यात केव्हाच कैद केलंय.

अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घडामोडींचा साक्षीदार असलेला हा ठाकूरद्वार नाका आणि तिथल्या या रेस्टॉरंटनेही अनेक स्थित्यंतरं पाहिलीत.

सनशाईन काळाच्या ओघात लुप्त होत असतानाच पुन्हा ते सुरु होईल का, पुन्हा ते याच रुपात दिसेल का, दोन कटिंग, एक ऑम्लेट पाव द्या, अशा टाईपची ऑर्डर नेमकी कधी ऐकायला मिळणार, अशा अनेक प्रश्नांचं शटर सनशाईन बंद होत असताना गिरगावकरांच्या मनात उघडलंय. सनशाईन जरी बंद होत असलं तरी लोकांच्या मनात या रेस्टॉरंटच्या असंख्य आठवणींचा 'सन' कायम 'शाईन' होत राहील हे नक्की.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawade:निवडणूक आयोग तुमचा घरगडी म्हणून काम करतंय,Sushma Andhare यांचा आरोप Prasad Lad खडाजंगीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 19 नोव्हेंबर  2024: ABP MajhaBaramati : Shrinivas Pawar यांच्या शरयू मोटर शोरुमध्ये सर्च ऑपरेशन,तपासणीत काही न आढळल्याची माहितीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 19 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Embed widget