एक्स्प्लोर

खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर

सुमारे 5 लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहरात सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अपघात आणि त्यावर होणारी वाहतूक कोंडी हे विषय सार्वजनिक चर्चेच्या अजेंड्यावर आहेत. एका वर्षांत जवळपास 360 अपघात आणि त्यात सुमारे 160 जणांचा मृत्यू असे सध्याचे चित्र आहे. या महामार्गावरुन रोज किमान 10 ते 12 हजार अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यात जळगाव शहरातील किमान बाराशे ते तेराशे वाहने असतात. अशा असुरक्षेच्या वातावरणात वाहतुकीसाठी सध्याचा महामार्ग कमी पडतो आहे. म्हणून जळगाव शहरात राष्ट्रीय महामार्गालगत समांतर रस्त्यांची कामे तातडीने केली जावीत, यासाठी जळगाव समांतर रस्ते कृती समितीच्या माध्यमातून जनआंदोलन उभे राहते आहे. तसेच जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जळगाव मनपा यांचे प्रशासनही कामाला लागले आहे. धुळे, नंदुरबार आणि अकोला या महानगरांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने चौपदरीकरणाचे दोन प्रस्ताव मंजूर केले आहेत. धुळेहून मुंबई, इंदौरकडे व अकोला येथून नागपूरकडे जाण्यासाठी चौपदरी महामार्ग तयार झाले आहेत. फक्त जळगाव जिल्हा हद्दीत चौपदरीकरणाचे काम तीन वर्षांपासून रेंगाळले आहे. यातील पहिला प्रस्ताव हा महामार्ग वळण रस्त्याचा आहे. या बरोबर जळगाव शहरातून सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाचेही चौपदरीकरण केले जाणार आहे. मात्र, हे दोन्ही प्रस्ताव मंजुरी आणि आरेखनाच्या पातळीवर होते. एकनाथराव खडसे हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करुन चौपदरीकरणाचे दोन्ही प्रस्ताव मार्गी लावले आहेत. परंतु वाढते अपघात व तांत्रिक प्रक्रिया रेंगाळल्यामुळे समांतर रस्त्यांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. 'जळगाव फर्स्ट' या बिगर राजकीय संघटनेचे नेते डॉ. राधेशाम चौधरी यांनी या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी गांधी पुण्यतिथीला महामार्गावर गांधी मार्च काढला. त्यानंतर नगरसेवक अनंत जोशी यांच्या नेतृत्वाखाली एका नागरिक मंचाने जनसभा घेतला. विविध 70 संघटनांचे लोक एकत्र आल्यामुळे जळगाव समांतर रस्ते कृती समिती स्थापन झाली. त्यात डॉ. चौधरी, जोशी यांच्यासह विनोद देशमुख, गजानन मालपुरे, सचिन नारळे, शंभू पाटील, दिलीप तिवारी, फारुक शेख, विराज कावडीया, अमित जगताप, कैलास सोनवणे आदींचा कोअर टीममध्ये समावेश आहे. या समितीने महापौर, आमदार यांच्याशी चर्चा केली. समातंर रस्त्याशी संबंधित विविध मुद्दे जनतेसमोर मांडले. याच दरम्यान आमदार सुरेश भोळे व आमदार चंदूभाई पटेल हे मंत्री गडकरी यांची नागपुरात भेट घेवून आले. त्यांनीही समांतर रस्त्यांचा प्रश्न मंत्र्यांसमोर मांडला. अर्थात, मंत्री गडकरीही याविषयाकडे लक्ष देवून आहेत. पण कामांची प्रक्रिया ही विहीत पद्धतीत होत असल्यामुळे काही प्रमाणात कालहरण होत आहे, हे नक्की. यानंतरच्या घडामोडीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तरसोद ते पाळधीफाटा अशा 15.4 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा (डिपीआर) जिल्हा प्रशासनासमोर सादर केला आहे. यात शहरातील 60 मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण, गिरणा नदीवर दोन समांतर पूल, रेल्वे आव्हर ब्रीज 10 ठिकाणी भुयारी मार्ग, 20 ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गिका, दोन ठिकाणी लोडर्स हायवे, एक ठिकाणी उड्डाणपूल आणि दोन्ही बाजूला 7 मीटरचे समांतर रस्ते करण्याचा सुमारे 450 कोटी रुपये खर्चाचा आराखडा सादर केला. समांतर रस्त्यांसाठी जनमताचा रेटा वाढल्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन गतीमान झाले आहे हे नक्की. या विषयावर जळगाव येथून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व दैनिकांनी घेतलेल्या तीव्र भूमिकांचेही कौतुक करायला हवे. समांतर रस्त्यांची कामे लवकर व्हावीत, म्हणून सर्वच दैनिकांनी विविध प्रकारची पाठपुरावा सदरे सुरू केली आहेत. अशा प्रकारे सर्व माध्यमातून निर्माण होणारा जनमताचा रेटा आता समांतर रस्त्यांचा विषय सार्वजनिक चर्चेच्या अजेंड्यावर घेवून आला आहे. जळगाव शहरातील समांतर रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन गोष्टींची प्रामुख्याने गरज असून, त्याचा पाठपुरावा जळगाव समांतर रस्ते कृती समिती करीत आहे. यात सर्व प्रथम जळगाव शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, ते तसे होणार नाही. कारण प्रथम वळण रस्त्यांचे काम सुरू होईल. ते पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा काळ लागू शकतो. त्यानंतर जळगाव शहरातील महामार्गाचे काम सुरू होईल. ही बाब लक्षात घेता, जळगाव शहरात समांतर रस्त्यांचे किमान भरावाचे काम करुन त्यावरुन शहरातील दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक वळविण्याकडे लक्ष द्यायला हवे. तसेच मनपाने गरजेनुसार समांतर रस्त्यांसाठी आपल्या ताब्यातील नागरी लेआऊटमधील 12 किंवा 9 मीटरची जागा राष्ट्रीय महामार्गास हस्तांतरित करण्याचा ठराव करुन घ्यावा. यासोबत अजून एक मुद्दा कृती समितीने समोर आणला आहे तो म्हणजे, महामार्ग चौपदरीकरणाचा जो काही आराखडा तयार केला आहे, त्यावर जनसुनीवणी लवकरात लवकर घ्यावी. म्हणजे जळगावकर नागरिक त्यावर दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करु शकतील. जळगाव शहरातील किंवा वळण महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण झाले तर मुंबई, नागपूर, इंदौर, जयपूर, भोपाल, कोलकाता, हैद्राबाद, औरंगाबाद, चेन्नई अशी महानगरे चौपदरी मार्गाने थेट जोडली जाणार आहेत. कधीकाळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाहिलेले 'भारत जोडो'चे स्वप्न पूर्ण होवू शकेल.

‘खान्देश खबरबात’मधील याआधीचे ब्लॉग :

  खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !! खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर

खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन

खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे

खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार

खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार

खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ

खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!

 खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे

खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?

खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा

खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…

खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!

खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…

खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर

खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत  

 
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget