एक्स्प्लोर

बालपणाचं बोन्साय अर्थात मोबाईलच्या विळख्यातलं बालपण

आजची मम्मी मुलाला मोबाईलवर डाऊनलोड केलेली अंगाई ऐकवते, कार्टून दाखवते. दीड- दोन वर्षाचं मूल मोबाईलच्या स्क्रीनवर बोटं फिरवू लागलं की आईवडिलांना आपल्या मुलानं ऐवरेस्ट सर केल्याचा आनंद होतो. मूल मोबाईल स्क्रीनवर रमलं की मुलाची मम्मीही खूष होऊन टिव्ही सिरियल बघायला मोकळी होते तर पप्पाही फेसबुकवर रममाण होतात.

परवा कोल्हापूर-सोलापूर बस प्रवासात माझ्या शेजारी एक दहा- अकरा वर्षांचा मुलगा होता. त्याची आई आणि आठ वर्षांची बहिण आमच्या पुढच्या सीटवर होत्या. हे त्रिकुट दिवाळीसाठी मामाच्या गावाला निघाले असल्याचे त्यांच्या बोलण्यातून कळले. बस सुरू झाल्याझाल्या त्याने आईकडून स्मार्टफोन मागून घेतला. मुलाला मोबाईल देताना आईच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. मुलाने मोबाईलवर गेम खेळायला सुरू केलं. त्याची पुढच्या सीटवर बसलेली बहिण वाकून वाकून मोबाईलमध्ये बघत होती. मोजून पंधरा मिनीटांनी बहिणीने भावाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि ती टिकटॉक व्हिडीओज बघू लागली. पंधरा-पंधरा मिनीटाला ही मोबाईलची देवाणघेवाण दोन-तीन तास अखंड सुरू होती. जेवायला गाडी थांबली. आईने मुलांसाठी आणलेला जेवणाचा डबा बॅगमधून बाहेर काढला. मोबाईलमध्ये मग्न असणाऱ्या मुलांचे पोटातल्या भूकेकडे अजिबातच लक्ष नसावे. आईने उघडलेल्या जेवणाच्या डब्याकडे दोन्हीही मुलांनी साफ दुर्लक्ष केले तेव्हा शेवटी आईने रागारागाने मुलाकडून मोबाईल घेतला आणि पर्समध्ये टाकला. तर मुलगा मोठ्याने ओरडला " आई  प्रॉमिस तोडतेयस तू. मी मामाच्या गावाला येणार नाही म्हणत होतो तर म्हणालीस मामाच्या गावाहून परत येईपर्यंत मोबाईल तुमच्याकडेच. This is not fair आई. मी आताच्या आत्ता उतरून परत जातो बघ." असं म्हणून तो सिटवरून उठून बसच्या दरवाज्याकडे चालू लागला. आईने वैतागून पर्समधून मोबाईल काढला आणि मुलाकडे भिरकावला. मोबाईल खाली पडून त्याचे अवयव इतस्त विखुरले. मुलाने ते सगळे मोबाईलचे अवयव गोळा करून मोबाईल सुरू केला. आईने उघडलेला जेवणाचा डबा बंद केला, जसाचा तसा बॅगमध्ये ठेवून दिला आणि हतबल होऊन खिडकीतून बाहेर बघू लागली. पूर्ण प्रवासभर दोन्हीहीभावंडांनी एकदाही खिडकीबाहेर बघितले नाही. खिडकीतून दिसणाऱ्या कुठल्याच गोष्टीशी मुलांचं काहीच देणघेणं नव्हतं. त्यांचा सोबती एकच ' मोबाईल'. मामाच्या गावी गेल्यावरही ही दोन्ही भावंडं मोबाईलच्याच स्क्रीनवर खिळून राहिली असतील हे वेगळं सांगायला नको. आमच्यावेळी मामाच्या गावाला जायची प्रचंड उत्सुकता असायची. प्रवासभर आम्ही भावंडं खिडकीतून बाहेर बघत गावं मोजायचो. झाडं,वाहणं मोजायचो.आजच्या मुलांचं बालपण आणि बालपणातल्या मोहक गोष्टी मोबाईल नामक यंत्राने गिळंकृत केल आहेत. मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी जाऊन अट्टल मोबाईलव्यसनी बनली आहेत. मुलांना व्यसन जडलय मोबाईलवर सतत गेम खेळण्याचं, शाळेतील मित्र-मैत्रीणींशी वॉट्सअपवर चॅटिंग करण्याचं, आपल्या वयाशी तीळमात्र संबंध नसलेले व्हिडीओज बघण्याचं. नव्या माणसांचं, नव्या जागेचं कशाचच कुतूहल मुलांना राहिलेलं नाही. आजची मुलं फार खेळत नाहीत, फार हसत नाही आणि बोलत तर नाहीतच नाहीत. पण मुलं भांडतात खूप. मुलं मोबाईलसाठी आईवडिलांना ब्लॅकमेलही करतात. कुठेकुठे मुलं मोबाईलसाठी इतकी हायफर होतात की मोबाईल नाही दिला तर घरातील वस्तूंची तोडफोड करतात. इतकंच कायतर जीव देण्याची धमाकी द्यायलाही मागे पुढे बघत नाहीत. मूल महत्वाचं की मोबाईल याचा विचार करून आईवडील अगदी सहजपणे मुलांना स्मार्टफोन घेऊन देतात. स्वतःच्या मालकीचा मोबाईल मिळाल्याने मुलांना त्यासमोर सगळं जग तुच्छ वाटू लागतं. मुलांच्या मोबाईल ॲडिक्शनला आधी मुलांचे पालकच जबाबदार आहेत. पालक इकडे मूल जन्मलं की तिकडे त्याचे फोटो काढून ते क्षण प्रत्यक्ष नाही तर कॅमेऱ्यात जगायला सुरू करतात. मूल रडायला लागलं की त्याच्याशी संवाद साधण्याऐवजी त्याला मोबाईलवर वेगवेगळे व्हिडीओज दाखवून शांत करू पाहतात. आणि त्यात यश आलं की मुलासहीत आईवडीलही ' रडलं मूल की दाखव व्हिडीओ ' या सवयीचे गुलाम होऊन जातात. पूर्वी मुलाला झोपवण्यासाठी मुलाची आई अंगाई गायची, राजा-राणीच्या, राम-लक्ष्मणाच्या गोष्टी सांगायची. आजची मम्मी मुलाला मोबाईलवर डाऊनलोड केलेली अंगाई ऐकवते, कार्टून दाखवते. दीड- दोन वर्षाचं मूल मोबाईलच्या स्क्रीनवर बोटं फिरवू लागलं की आईवडिलांना आपल्या मुलानं ऐवरेस्ट सर केल्याचा आनंद होतो. मूल मोबाईल स्क्रीनवर रमलं की मुलाची मम्मीही खूष होऊन टिव्ही सिरियल बघायला मोकळी होते तर पप्पाही फेसबुकवर रममाण होतात. जन्मल्यापासूनच मुलांना पालक असे मोबाईलच्या जाळ्यात अडकवत असतील तर आजच्या त्यांच्या अतीरेकी मोबाईल वापराला पालकच कारणीभूत आहेत हे म्हणताना काहीएक चूक वाटत नाही. आधी आईबाप मुलांना मोबाईलशी कनेक्ट करतात आणि नंतर आपल्या मुलाला आईबापापेक्षा मोबाईल महत्वाचा वाटतो म्हणून घडोघडी तक्रार करतात. ज्या घरात स्मार्टफोन आहे अशा घरातलं चार-पाच वर्षाचं मुलही आईवडिलांपेक्षा अधिक मोबाईल एक्स्पर्ट आहे. पाचवी सहावीच्या मुलांचे वॉट्सॲपवर ग्रुप आहेत. आठवी-नववीच्या मुलांकडे स्वतःचे अँड्रॉईड हँडसेट आहेत. सातवी-आठवीची मुलं मोबाईलवर पॉर्न बघतात. त्यांची ही सवय त्यांना कधी विकृतीकडे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलेली बहुतांश मुलं ही सुशिक्षित, उच्चवर्गीय घरातली असल्याचे हल्ली आढळून येतं आहे कारण आपली मुलं मोबाईलवर नेमकं काय करतात हे बघायला पालकांकडे वेळ कुठे आहे. पालक फेसबुक लाईक्समध्ये आणि वॉट्सअप फॉरवर्डींगमध्ये गुंतून गेलेले आहेत. " आमचा मुलगा-मुलगी खूपच टेकसॅव्ही. " हे वाक्य आईवडील गौरवनं उच्चार असतात तेव्हा अॉनलाईन चॅटींगमध्ये अडकून मुलं फसव्या आभासी जगात जगतायत याची शंकाही आईवडीलांच्या मनाला शिवलेली नसते. चॉटिंग ते सेक्स्टिंग असा प्रवास मुलं काही मिनीटांत करतात. हळूहळू संपूर्ण मानसिक स्वास्थ्य हरवून जाण्यापर्यंत हा प्रकार चालू राहतो. मोबाईलवर अॉनलाईन जुगार खेळून घरातले पैसे चोरण्यापर्यंत मुलांची  मजल गेल्याचं आढळून आलं आहे. शाळा,  अभ्यास यांकडे मुलांचं दुर्लक्ष होतंच शिवाय करीयरवरही त्याचा दूरगामी परिणाम झाल्यावाचून राहत नाही. मोबाईल नावाचं वीष मुलाच्या अंगात पूर्ण भिणलं की आईवडीलांना जाग येते पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. आजच्या मुलांचं मैदानी खेळापासून दुरावणं ही मुलांच्या भविष्यातील शारीरिक अनारोग्याची नांदी आहे. मुलं आणि त्यांच्या पालकांमध्ये आवश्यक संवाद नसणं हे सुद्धा मुलं आणि पालक यांच्यातल्या कमकुवत नात्याचं लक्षण आहे. शिवाय हीच मुलांच्या आईवडीलांपासून आणि एकूण जिवंत माणसांपासून तुटण्याची सुरूवात आहे. टाइमपाससाठी मुलांच्या हातात मोबाईल देणं म्हणजे मुलांना सर्जनशील गोष्टींपासून वंचित ठेवणं आहे हे जेव्हा पालकांना कळेल तेव्हाच ते मुलांचं बालपण बोन्साय होण्यापासून वाचवू शकतील. कौतुक म्हणून लहाण मुलाच्या हातात दिलेला मोबाईल मुलांच्या आणि एकूण कुटुंबाच्या वाताहातीकडे घेऊन जातो याची भणक वेळीच पालकांना लागणं गरजेचं आहे. आईनं मोबाईल दिला नाही म्हणून नागपूरमधील चौदा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची बातमी आजच्या बालदिनादिवशी मला टिव्हिच्या स्क्रीनवर बालदिनाच्या शुभेच्छांच्या ओळीत झळकताना दिसतेय. या नोटवर मला लेखाचा शेवट करावा लागतोय हे नेमकं कुणाचं दुर्दैव आहे याचा गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP Premium

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025  : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Embed widget