एक्स्प्लोर

BLOG: कुणी घरभाडं देता का घरभाडं?

BLOG: एक आटपाट नगर होते. त्या नगरावर सोनियाचं राज्य होतं. घरावर सोन्याची कौलं होतं. राजकुमार, राजकुमारी तोंडात हिरेजडित चमचा घेऊन जन्माला आले होते. आटपाट नगर म्हणजे त्यांचं हक्काचं राज्य होतं. पण म्हणतात ना चांगले दिवस नेहमी राहात नाहीत. तसंच झालं.  पश्चिमेच्या राज्यातून आलेल्या एकाने आटपाट नगरावर कब्जा केला आणि ज्या राजमहालात सगळं आयुष्य घालवलं ते सोडावं लागलं. राजवाडा सोडला तरी पुन्हा त्यावर कब्जा करण्याचं स्वप्न पाहाणं काही पूर्वीच्या राजघराण्यानं सोडलं नाही. राजघराण्याच्या तीन पिढ्य़ा आटपाट नगरावर राज्य करीत होत्या. पण आता सगळं संपुष्टात आलं होतं. खरं तरं या राजघराण्यानं प्रचंड संपत्ती कमवून ठेवली होती. त्या पैशातून देशात परदेशात ते कोट्यवधींची संपत्ती आरामात घेऊ शकत होते. त्यांनी घेतलीही असेल पण राजघराणं असल्यानं त्यांना विचारणार कोण?

बरं ते जाऊ दे पण राजघराण्याला आयुष्यभर आरामात राहाता यावं यासाठी जरी आटपाट नगरीत दुसरा राजा आला तरी त्यानं जुन्या राजघराण्याला राज्यातच नाममात्र भाड्यानं आलिशान घर द्यावं असा नियम होता. या नियमाचा फायदा राजवाड्यातून बाहेर पडलेल्या राजघराण्यानं घेतला. नव्या राजानं राणी, राजकुमाराला नाममात्र भाडं आकारून आलिशान घर दिलं. काम करण्यासाठी ऑफिसही दिलं. त्यांच्या काही सरदारांनाही भाड्यानं जागा दिल्या. बरं नुसतं घरंच नव्हे तर त्यात टेलिफोनपासून गॅसपर्यंत सगळ्या सोयीही मोफत उपलब्ध करून दिल्या. राजकुमारीची एका मोठ्या उद्योपतीशी लग्न लावून देण्यात आलं होतं. त्याचा उद्योग वाढावा म्हणून राजघराण्यानं सत्तेवर असताना खूप मदत केली होती. राजकुमारीनं अनेक आलिशान घरं बांधली पण आईला आणि भावाला त्या घरात ठेवण्यास ती तयार नसल्यानं त्या दोघांना भाड्याच्या घरात राहावं लागत होतं.

दिवस भरा भरा पुढे जात होते. पुन्हा आटपाट नगरीचं राज्य येईल या आशेवर राणी आणि राजकुमार होते. विविध प्रदेशातील सरदारांना एकत्र करून राज्य काबिज करण्याचे त्यांचे प्रयत्नही सुरु होते. पण यश येत नव्हतं. हातातला पैसा संपत आला होता. शेवटी शेवटी तर अशी परिस्थिती आली की ऑफिसचं सोडा घराचंही  भाडं भरण्यास पैसा उरला नाही. राणीचं भाडं भरत नाही म्हटल्यावर अनेक सरदारांनीही जागेचं भाडं महिनो न महिने थकवलं. नव्या राजानं त्याकडं लक्ष दिलं नव्हतं. राज्यासाठी राजघराण्यानं केलेला त्याग लक्षात घेऊन जनता गप्प होती. पण ते काही तरी आरटीआय नावाचं प्रकरण आलं आणि घरभाड्याचं प्रकरण समोर आलं.

राणीच्या ऑफिसचं भाडं जवळ जवळ दहा वर्ष भरलं नसल्याचं समोर आलं. राणीच्या घराचंही दीड वर्ष काही हजारात असलेलं घरभाडंही भरलं गेलं नव्हतं.  राणीच्या सचिवाच्या घराचं भाडंही 9 वर्षांपासून थकलं होतं. पैसाच नसल्यानं भाडं भरण कठिण झालं होतं. राणीही वयोमानामुळं थकली होती. राजकुमार पुन्हा आटपाट नगरीवर राज्य करण्याचं स्वप्न बघत देशोदेशी फिरत होता. सरदार जमा करत होता. पण त्याला यश मिळत नव्हतं.

घरभाडं न भरल्यानं आता घर, ऑफिस सोडावं लागतंय की काय अशी शंका राणीच्या मनात उद्भवू लागली होती. आणि याचवेळी कुणी घर देता का घर? या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण राणीला झाली आणि ती म्हणू लागली....

कुणी घरभाडं देता का घरभाडं?

एका असहाय्य राणीला,

कुणी घरभाडं देता का घरभाडं?

एका राजपुत्र देवाच्या दयेवाचून

जंगलाजंगलात हिंडतय. 

जिथून कुणी उठवणार नाही,

अशी एक जागा धुंडतय.

कुणी घरभाडं देता का घरभाडं?

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?Eknath Shinde And Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमनेसामने; नेमकं काय घडलं?Shivsainik Bail granted On Kunal Kamraकुणाल कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूरYogesh Kadam On Kunal Kamra CDR : कुणाल कामराला कुणी पैसे दिलेत का? हे तपासणार : योगेश कदम

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
Embed widget