एक्स्प्लोर

BLOG : निवडणुका जिंकण्यात 'महारथी' असल्याची मोदींची प्रतिमा उध्वस्त, येणारे दिवस कदाचित 'अच्छे दिन'

भारतीय निवडणुका हा काही आनंद देणारा मुद्दा राहिला नाही, खासकरून गेल्या दशकापासून हे प्रकर्षाने जाणवतंय. गेल्या काही वर्षात राज्यांच्या निवडणुका या अशा पद्धतीने भव्य आणि प्रचंड संसाधनांचा वापर करुन लढल्या गेल्या आहेत की त्यासमोर जगातल्या अनेक देशांच्या निवडणुका फिक्या पडतील. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अशा पद्धतीने साम-दाम-दंड-भेद यांचा वापर केला की याची गणना इतिहासातील सर्वात कडवट, तिरस्कारपूर्ण  निवडणुकांमध्ये केली जाईल. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप निर्लज्जपणे केंद्रीय निवडणूक आयोगाचा वापरही करु शकतो ही भाजपची वृत्तीही यावेळी दिसून आली. 

या निवडणुकीमुळे भाजप आणि विशेषत: त्याच्या दोन प्रमुख नेत्यांवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यापूर्वी काही संभावित गोष्टींवर नजर टाकणे आवश्यक आहे. राज्यात मिळालेल्या 77 जागा आणि 38.1 टक्के मतं यावर गर्व करणारे अनेक लोक ही वस्तुस्थिती मानण्यास तयार नाहीत की गेल्या सात वर्षातील भाजपचा हा सर्वात मोठा पराभव आहे. या निवडणुकीमधील काँग्रेसची वाईट स्थिती हा एक मुद्दा आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पद्दुचेरी आणि तामिळनाडू या राज्यात काँगेसने निवडणुका लढल्या आणि तो पक्ष आता दयनीय अवस्थेत पोहोचलाय हे स्पष्ट झालंय. तसेच काही काळापूर्वी बंगालच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या सीपीएमची राजकीय घटका भरत आली आहे हे कोणीही सामान्य व्यक्ती सांगू शकेल.

डाव्यांच्या आणि काँग्रेसच्या आघाडीला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. गेल्या म्हणजे 2016 सालच्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांनी 76 जागा जिंकल्या होत्या. अशामध्ये भाजपच्या पराभवाचे समर्थन करणारे लोक सांगू शकतात की, भाजपसाठी हा काही आघात नसून केवळ सौम्य धक्का आहे. भाजपने 2016 च्या विधानसभा निवडणुकीत 10.2 टक्के मते घेतली होती. यावेळी त्याच्यात वाढ झाली असून ती 38.1 टक्के झाली आहेत. भाजपने जवळपास सगळ्या जागा या डाव्या आणि काँग्रेसच्या मतांवर डल्ला मारून जिंकल्या आहेत. 

पण लोकांना दिसतयं त्यापेक्षा वास्तव हे खूपच वेगळं आहे. गेल्या वेळची तुलना करायची असेल तर ती 2016 च्या निवडणुकीची न करता 2019 च्या निवडणुकीची करायला हवी. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने 40.2 टक्के मते मिळवली होती. आकड्यांचे विश्लेषण करणारे सांगू शकतात की राजकारणात दोन टक्के मतांचे महत्व आणि त्याचा फरक किती मोठा असतो ते. वस्तुस्थिती अशी आहे की, गैर-द्रविड आर्यावर्तच्या या प्रदेशावर म्हणजे पश्चिम बंगालवर मोदी आणि शाह यांची गेली अनेक वर्षे नजर होती आणि हा प्रदेश त्यांच्या कचाट्यात सापडता-सापडता निसटला. दुसरीकडे दक्षिणेच्या तामिळनाडू आणि केरळनेही त्यांच्या पदरात निराशा टाकली कारण या ठिकाणी त्यांची डाळ कधीच शिजली नाही. 

खरं पाहिलं तर मोदींनी बंगाल जिंकण्यासाठी अगदी जीवाचं राण केलं होतं. बंगालच्या लोकांनी मोदी यांच्यावरच निर्णय द्यावा किंवा त्यांच्याकडे पाहूनच मतं द्यावी अशी राजकीय व्यूहरचना आखली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका विशाल रॅलीला संबोधित करताना घोषणा केली होती की, त्यांना त्यांच्यासमोर केवळ विशाल जनसागर दिसतोय. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या कोणत्याही निवडणुकीत एवढी गर्दी पाहिली नव्हती. त्यांच्या चहूबाजूने, देशात ज्यावेळी केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे हजारों लोक कोरोनामुळे आपला जीव गमवत होते त्यावेळी पंतप्रधान मोदी अशा प्रकारचे वक्तव्य करत होते. दुसरीकडे त्यांच्या सरकारमधील क्रमांक दोनचे नेते अमित शाह यांनी बंगालमध्ये भाजपला 200 जागा मिळतील असा दावा करत होते. 

मोदींची झालेला हा पराभव साधारण नक्कीच नाही. त्याच्या अनेक बाजू आहेत. हा भाजपचा पराभव आणि मोदींचा शुद्ध अपमान यापेक्षाही जास्त काहीतरी आहे. वास्तविक पाहता केंद्रीय निवडणूक आयोग ही भारतीय लोकशाहीचे संरक्षण करणारी व्यवस्था आहे. पण मोदींनी या व्यवस्थेला आपल्या हातचा बाहुला बनवलं आहे. पहिलं म्हणजे, बंगालची निवडणूक ही पाच आठवड्यांच्या काळात आणि आठ टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतला गेला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय अभूतपूर्व असाच होता. देशातील विधानसभा निवडणूक एवढ्या मोठ्या कालावधीत घेण्याच्या निर्णयातून हे स्पष्ट होतंय की मोदींनी लोकसभेप्रमाणे ही विधानसभा निवडणूक खूप मनावर घेतली होती. याचा सरळ-सरळ अर्थ असा होतो की, भाजप या निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या कालावधीचा वापर करून अधिकाधिक पैसा ओतू शकेल आणि आपल्या हातातील सर्व संस्थांचा आणि व्यवस्थेचा वापर करून निवडणुकीवर प्रभाव पाडेल. या सर्वांचा अर्थ एकच होता की, भाजपला काही करून ही निवडणूक जिंकायची आहे. असं झालं तर भाजपला तृणमूलच्या तुलनेत अधिक फायदा होईल असा होरा मोदींचा होता. 

या सगळ्या गोष्टी असताना भाजप आणि मोदींची पराभव झाला आहे. अनेक केंद्रीय संस्था मोदींच्या खिशात होत्या आणि त्यांचा वापरही करण्यात आला. दशकापूर्वीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तृणमूलच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. असं असूनही मोदी आणि भाजपला पराभव पहावा लागला. असं नाही की देशात धार्मिक भावनांचा राजकारणासाठी वापर करणारा भाजप हा एकमेव आणि पहिलाच पक्ष आहे. पण मोदी आणि शाह यांनी हिंसेच्या भावनेने धार्मिक भावनांचा राजकारणासाठी वापर केला. त्यांनी खुलेपणाने मुस्लिमांचा अपमान केला आणि हिंदू संस्कृती गौरवाच्या नावाखाली हिंदूना भडकवण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोग नेत्यांना धार्मिक भावना न भडकवण्याचा सल्ला देत राहिले पण त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. एवढं करुनही मोदी आणि भाजपचा पराभव झाला. 

येत्या काही दिवसांमध्ये टीव्ही चॅनेलवर, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या निवडणूकीचे पोस्टमार्टम करण्यात येईल यात काही शंका नाही. भारतीय राजकीय विश्लेषक आणि राजकीय चाणक्य हे सातत्याने अॅन्टी इन्कंबन्सीचा दाखला देत बंगालमध्ये आणि केरळमध्ये परिवर्तन होणार असं सांगत राहिले. पण या दोन राज्यांतील निकालाने त्यांना चुकीचं ठरवलं. या निवडणुकीमध्य अनेक आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला. भाजपने धार्मिक भावनांचा निर्लज्जपणे वापर केला आणि लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत भाजपने अमाप पैशाचा वापर केला आणि सोशल मीडियावर आपली ताकत वाढवून अनेक असे ट्रोल्स बसवले की जे लोकांना सातत्याने पिच्छा करू लागले आणि त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करू लागले. सर्वात दुर्दैव हे आहे की, या सर्व गोष्टी अशा वेळी करण्यात आल्या की ज्या वेळी देशात कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजवला होता. या सर्वावरून हे लक्षात येतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकण्यामध्ये 'महारथी' अशी असणारी प्रतिमा उध्वस्त झाली.

प्राचिन भारतात आर्यावर्तमधील राजे अश्वमेध यज्ञ करताना आपला घोडा कोणत्याही राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी मोकळे सोडायचे. मोदींनी असं काही केलं नाही. पण त्यांनी कोरोना काळात देशाला खुलं सोडलं आणि कोरोनाने देशातील हजारो लोकांचा जीव घेतला. या काळात मोदी आणि अमित शाह हे बंगालमध्ये रोड शो करत होते. विशेष म्हणजे आताही असं वक्तव्य करणं घाईचे होईल की बंगालमधील पराभवाने मोदींच्या प्रतिमेला धक्का बसेल आणि कोरोनामुळे ओढावलेल्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची प्रतिमा डागाळेल. आपल्या विजयानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालने भारताला वाचवलं आहे. ममतांचे हे वक्तव्य क्षणिक उत्साहीपणातून आलं आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही. या वक्तव्याला गंभीरपणे घेणं चुकीचं असेल. 

आणखी एक गोष्ट सांगणं महत्वाचं आहे, ते म्हणजे तृणमूल काँग्रेस काही भाजपपेक्षा अधिक सिद्धांतवादी आहे असं काही नाही. ममतांच्या या विजयाकडे त्यांनी मोदींवर मात केली असं पाहण्यापेक्षा केवळ मोदी आणि भाजपचा पराभव तसेच विभाजनवादी शक्तीचा पराभव झाला आहे या नजरेनं पाहणं आवश्यक आहे. मोदी या पराभवाकडे त्यांच्या नेहमीच्या दृष्टीने पाहतील आणि त्यांचे समर्थक सांगतील की, त्यांनी एक लहान लढाई हारली असली तरी ते युद्ध नक्कीच जिंकतील. देशातील राजकारणाला आता नव्या दृष्टीकोनाची गरज आहे, जी वर्तमानातील धर्माच्या आणि असत्याच्या गोंधळातून देशाला बाहेर काढू शकेल. पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे निकाल हे देशाच्या इतिहासातील असलेल्या, सध्याच्या सर्वाधिक अंधकारात दिसणाऱ्या एका आशेच्या किरणासारखी आहेत, जे सांगताहेत की येणारे दिवस हे कदाचित 'अच्छे दिन' असतील.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget