एक्स्प्लोर

BLOG: शरद पवारांवर सोशल मीडियावर गलिच्छ भाषेत टीका का?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही  दिवसांपूर्वी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हिंडेनबर्गचा अहवाल आणि अदानींवर आपले मत व्यक्त केले. हिंडेनबर्गला महत्त्व द्यायची गरज नाही असे म्हणत असतानाच विरोधी पक्षाची अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेपीसीची मागणी चूक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याऐवजी सुप्रीम कोर्टानं स्थापन केलेली समिती जास्त चांगला तपास करील असं म्हटलं.

जेपीसीबाबतच्या  वक्तव्यानंतर शरद पवारांवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी सोशल मीडियावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. अनेकांनी तर आक्षेपार्ह शब्दही वापरले. सोशल मीडियावर अंकुश नसल्याने शरद पवारांवर टीका झाली. विशेष म्हणजे ज्यांचे वय शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या निम्मेही नाही अशा व्यक्तीही शरद पवारांना राजकारण शिकवू लागले. जे सोसायटीच्या निवडणुकीत निवडून येऊ शकत नाहीत ते शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका करीत विरोधी पक्षाच्या एकतेची गोष्ट करू लागले. शरद पवारांच्या मागील गोष्टींचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका करू लागले. त्यांच्या खंजीर प्रकरणाचा उल्लेख करून त्यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींच्या आणि विरोधी पक्षाच्या एकजुटीच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं बोललं जाऊ लागलं. शरद पवारांनी जेव्हा राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली तेव्हा यापैकी अनेकांचा जन्मही झाला नसेल. अशा व्यक्तीवर तोंडसुख घेण्यापूर्वी त्यांची कारकीर्द लक्षात घ्यायला पाहिजे होती असे म्हणावे वाटते.

जेपीसी म्हणजे, जॉईंट पार्लामेंटरी कमिटी. ही समिती जर 21  सदस्यांची असेल तर त्यात 15 सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे असतात आणि विरोधी पक्षाचे सहा सदस्य असतात. त्यामुळेच जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती अदानी प्रकरणाच्या चौकशीमध्ये जास्त परिणामकारक ठरेल, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. त्यांचं हे मत चुकीचे आहे असं अजिबात नाही आणि यात विरोधी पक्षाच्या विशेषतः राहुल गांधींच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं नसून त्यांचे डोळे उघडण्यासारखे आहे. पण डोळ्यावर कातडे ओढून बसलेल्या काँग्रेसी नेत्यांना शरद पवारांच्या वक्तव्यामागची सत्य स्थिती दिसली नाही. यासोबतच शरद पवार यांनी हिंडनबर्ग ही परदेशी कंपनी असून या कंपनीनं भारतीय कंपनी अदानीला लक्ष्य केल्याचं सांगत या कंपनीच्या अहवालाला किती महत्व द्यायचं असंही म्हटलं. तसंच देशातील उद्योगपतींना असं टार्गेट करणं चुकीचे आहे. राहुल गांधींनी 20 हजार कोटींचा आकडा कुठून आणला असा प्रश्नही उपस्थित केला जो योग्य आहे. राहुल गांधी एका वर्तमानपत्रातील बातमीच्या आधारावर 20 हजार कोटी रुपये अदानीच्या कंपनीत गुंतवल्याचे म्हणत आहे. याला पुरावा कुठेही नाही आणि म्हणूनच शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं. खरं तर राहुल गांधींनी 20 हजार कोटींबाबत स्पष्टता आणली असती तर शरद पवारांनी असं वक्तव्य केलंच नसतं. 

शरद पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेसनं टीका करण्यास सुरुवात केली. नाना पटोलेसारख्या नेत्यांनी अदानी प्रकरणाची चौकशी जेपीसीमार्फतच झाली पाहिजे असे म्हटले. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शरद पवारांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. शरद पवार योग्य तेच बोलल्याचं संजय राऊत म्हणालेत. तसंच या मुद्द्यावरून विरोधी पक्षात फूट पडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

अदानी प्रकरणापूर्वी शरद पवारांनी नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या बैठकीत राहुल गांधींना सावरकर प्रकरणी शांत राहण्यास सांगितले होते. राहुल गांधी यांनीही त्यांच्या मताला आदर दिला होता. मात्र आता अदानी प्रकरणासोबतच सावरकरांचं प्रकरण जोडून त्याला खंजीर प्रकरणाची फोडणी देऊन शरद पवारांवर सोशल मीडियावर टीका केली जाऊ लागली आहे. मात्र टीका करणाऱ्यांनी शरद पवारांच्या राजकारणाचा आधी अभ्यास करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

शरद पवार केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकीय पटलावरील एक मोठं आणि महत्वाचं नाव आहे.  त्यांची प्रत्येक उक्ती, वक्तव्य हे अत्यंत विचारपूर्वक केलेलं असतं आणि त्या उक्ती आणि वक्तव्यामागे फार मोठे राजकारणही दडलेलं असतं. बुद्धिबळाचा खेळ खेळताना उंटाची तिरकी चाल कधी चालायची आणि हत्तीच्या माध्यमातून थेट हल्ला कधी करायचा हे ठाऊक असणे फार महत्वाचे असते.  शरद पवार या असल्या खेळीत माहीर आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करून पुन्हा काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करणे सोपी गोष्ट नाही.  ज्या सोनिया गांधींना त्यांनी विदेशी महिला म्हणून संबोधित त्यांच्या हाताखाली काम करण्यास नकार दिला, त्या सोनिया गांधींनीही नंतर शरद पवारांना सत्तेत सोबत घेतले. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष देशभर नेला. भले त्यांना मोठे यश मिळाले नसेल पण त्यांनी आपले स्थान मात्र अवश्य निर्माण केलेले आहे. त्यांची ही चतुरता पाहूनच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवारांना आपले गुरु मानले आहे आणि हे जाहीरही केले आहे. शरद पवार महाराष्ट्रात स्वतःच्या बळावर सत्ता स्थापन करू शकले नाहीत. हे सत्यही आहे. याच दरम्यान ममता, केजरीवाल अशा काही नेत्यांची उदाहरणे देऊन शरद पवार असे का करू शकले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जातो. पण त्या राज्यांचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल वेगळा आहे. जाती-पातीचे, धर्माचे राजकारण मोठ्या प्रमाणावर आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असे वेगळ्या स्वभावाचे विभाग आहेत. यापैकी पश्चिम महाराष्ट्रावरच शरद पवारांनी भर दिला आणि तेथे आपले स्थान भक्कम केले. राष्ट्रवादीचे सगळ्यात जास्त आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातूनच येतात. बाकी राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेतच. 

असो. शरद पवारांचा असा राजकीय इतिहास असताना त्यांच्या वक्तव्याचा अभ्यास करण्याऐवजी त्यांच्यावर टीका केली जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर शरद पवारांवर गलिच्छ भाषेत काही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून टीका होत असतानाही राष्ट्रवादीचे सोशल मीडियावर सक्रिय असलेले नेते मूग गिळून गप्प बसलेले आहेत. यामागचे कारण लक्षात येत नाही. एखाद्या सामान्य व्यक्तीने काही पोस्ट केली की लगेचच यावर तुटून पडणारे, अशी पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणारे यावेळी मात्र का गप्प बसलेत ते समजत नाही. खरे तर अदानी प्रकरणावरून शरद पवारांवर अशी टीका करणेच चूक आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget