एक्स्प्लोर
Advertisement
World Cup 2019 : किवींचा बँड वाजवाच....
किवी टीमची गोलंदाजी बोल्टवर अति अवलंबून वाटतेय. याचाच आपण फायदा उचलायला हवा.
विराट कोहलीच्या टीम इंडियासाठी इतिहास आता फक्त दोन पावलं दूर आहे. सेमी फायनलची पहिली लढाई मंगळवारी होतेय ती चिवट पण गेल्या दोन सामन्यांमधील पराभवाने धास्तावलेल्या विल्यमसनच्या न्यूझीलंड टीमशी. थँक्स टू दक्षिण आफ्रिका. शनिवारच्या मॅचमध्ये ड्यु प्लेसीच्या टीमने ऑसींना धक्का दिला म्हणूनच हे शक्य झालं. असो. आता जे झालं ते मागे पडलं. आता लढाई नॉक आऊटची आहे. म्हणजे ‘नजर हटी दुर्घटना घटी’ टाईप्स. एकदा का तुम्ही चुकलात की,फायनलचं तिकीट हुकलात. त्यामुळे यू हॅव टू बी परफेक्ट.
इंग्लंडचा सामना वगळता सारे सामने विराटसेनेने खिशात घातले. अर्थात यापैकी अफगाणिस्तान, बांगलादेश सामन्यात हार्टबीट्स वाढल्या होत्या. पण, बुमरा आणि शमी नावाच्या हाणामारीच्या षटकातील निष्णात डॉक्टरांनी आयसीयूमधून आपल्याला बाहेर काढलं, नाहीतर काहीही होऊ शकलं असतं.
आता हे सारं मागे सारत नव्या पाटीवर नवा इतिहास आपल्याला लिहायचाय. फलंदाजी हे आपलं नेहमीच बलस्थान राहिलंय. यावेळी मात्र फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजही पडदा व्यापून आम्ही साईड हिरो नाही, तर मेन हिरोच आहोत, हे दाखवून देतायत. बुमरा, शमी, चहल, कुलदीप आणि लंकेच्या सामन्यातली जडेजाची गोलंदाजी आठवली तर हे लक्षात येईल.
फलंदाजीत रोहित शर्मा स्वप्नवत फॉर्ममध्ये आहे. तो सध्या अशी फलंदाजी करतोय की, पॅव्हेलियनमध्ये जणू त्याचे पहिले १०० रन्स झालेले असतात आणि उरलेले १०० रन्स तो मैदानात उतरून करतोय. त्याचे कोच लाड सर आमच्या चॅनलवर त्या दिवशी म्हणाले, रोहित पहिल्या १० ओव्हरमध्ये थांबून खेळेल, तर तो प्रत्येक वेळी १०० धावा करेल. हे वाक्य रोहितला इंग्लंडमध्ये ऐकू गेलं असणार. रेकॉर्ड तुमच्यासमोर आहे. रोहित शर्मा नऊ सामने पाच शतकं, एक अर्धशतक. इंग्लिश खेळपट्ट्या मग त्या वनडेसाठी कितीही बॅट्समन फ्रेंडली असल्या तरी त्यावर स्विंगचा स्पीडब्रेकर लक्षात घेऊनच गाडी चालवावी लागते, नाहीतर अपघात कधीही होऊ शकतो. रोहितने याबाबतीत एकलव्याची एकाग्रता आणत फलंदाजी केलीय. म्हणजे फक्त खराब चेंडूंसाठी थांबणं, यावर त्याने लक्ष केंद्रीत केलं आणि रिझल्ट आपल्यासमोर आहे. त्याच्या चेंडूंचा अंदाज घेण्याचं स्किल इतकं भन्नाट आहे की, परवा एक क्रिकेट एक्सपर्ट म्हणाले की, रोहित एकाच वेळी एकाच चेंडूवर चार वेगवेगळे फटके मारण्याची क्षमता राखून आहे. एकदा का तो सेट झाला की, गाडी फेरारीच्या स्पीडने पळतेय. मग समोर कोणीही गोलंदाज असोत.
सो त्याच्याकडून या बिग मॅचमध्ये बिग इनिंग्जची अपेक्षा आहे. तशीच एक अपेक्षा आहे ती विराट कोहलीकडून. म्हणजे पाच अर्धशतकं ठोकूनही विराटच्या बाबतीत आपलं पोट भरलं नाहीये. वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्क्रीनवर रोहित मेन हिरो आणि विराट सध्या सहनायकाचीच भूमिका बजावतोय. रोहितच्या हिरोगिरीबद्दल आनंदच आहे. पण, विराटचं एकही शतक नाही. ये बात कुछ हजम नही होती....म्हणूनच विराटकडून आता खणखणीत शतकाची अपेक्षा आहे. ग्रेट प्लेअरच्या बाबतीत असं म्हटलं जातं. जितका मोठा स्टेज तितका मोठा परफॉर्मन्स. कोहलीसाठी एक कर्णधार आणि खेळाडू म्हणूनही हे आतापर्यंतचं सर्वात मोठं स्टेज आहे. या दोघांसोबत राहुलबद्दल इथे कौतुकोदगार काढावेच लागतील. कारण, पहिल्या काही सामन्यांनंतर अचानक मधल्या फळीतून सलामीला खेळायचं म्हणजे तुम्हाला एक मेंटल एडजस्टमेंट करावी लागते, गेम प्लॅन, खेळण्याची स्टाईल सारं काही बदलावं लागतं. राहुलने ते चटकन केलं, आणि रोहितसारख्या इन फॉर्म प्लेअरला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळेल, हे पाहिलं. त्याच वेळी आपलं अकाऊंट कोरं न ठेवता, तो धावा कॅश करत राहिला. लंकेविरुद्ध शतक ठोकत त्याने आपल्यातील लीड हिरोची झलक दाखवून दिलीय. यासोबत धोनी,पंत, हार्दिक या तीन बिग हिटर्सकडून पहिल्या तिघांच्या स्कोरच्या पायावर कळस चढवण्यात आला तर नो स्कोर इज इम्पॉसिबल.
किवी टीमची गोलंदाजी बोल्टवर अति अवलंबून वाटतेय. याचाच आपण फायदा उचलायला हवा. त्यामुळे त्याचा स्पेल खेळून काढत आपण हेन्री, डी ग्रँडहोम, सँटनर आदींना आपण टार्गेट करु शकतो. तीच गोष्ट फलंदाजीबाबत त्यांच्याकडे विल्यमसनचा खणखणीत अपवाद वगळता अन्य फलंदाजांकडून मोठ्या इनिंग्ज झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे बॅटिंगमध्ये टार्गेट विल्यमसन. तो मिळाला तर न्यूझीलंडच्या काळजात आपण धडकी भरवू शकतो. अर्थात रॉस टेलर, लॅथम, गप्टिलला कमी लेखता येणार नाही, तरीही आपल्यासारखी त्यांची फलंदाजी फॉर्मात आहे असं तरी चित्र नाही. शिवाय साखळीतील शेवटचे तिन्ही सामने ते पराभूत झालेत, त्याचा नाही म्हटलं तरी एक सायकॉलॉजिकल फरक पडेल. तो आपण एन्कॅश करायला हवा. तो झळाळता चषक आपल्याला खुणावतोय, उरल्यात दोन प्रेशर मॅचेस. दबावाच्या क्षणी जो बर्फ डोक्यावर ठेवून खेळेल, त्याची नैया पार होईल. अर्थात धोनी नावाची आईस फॅक्टरी आपल्याकडे असल्याने भारतानेच किवींना उपांत्य फेरीत चीत करुन रविवारच्या फायनलसाठी लॉर्डस गाठावं, अशी क्रिकेटरसिकांची मनापासून इच्छा आहे. कीप गोईंग विराट अँड कंपनी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
निवडणूक
निवडणूक
Advertisement