एक्स्प्लोर

BLOG | मिशन नंदादेवी: हिमालयातील हेर

चीनच्या अणवस्त्र मोहिमेवर हालचाली ठेवायच्या नादात अमेरिका आणि भारताने 'मिशन नंदादेवी' नावाची एक गुप्त मोहीम राबवली. त्यासाठी मानवी जीवासाठी अत्यंत धोकादायक ठरु शकणारे प्लुटोनियम न्यूक्लिअर डिव्हाईस हिमालयात नेण्यात आले, आणि तिथूनच या रहस्यमय घटनेला सुरुवात झाली.

उत्तराखंडात चामोली जिल्ह्यात नुकतंच हिमकडा कोसळल्याने मोठं नुकसान झालं, त्यात अनेकांचे प्राण गेले. उत्तराखंडातील या आपत्तीनंतर सुमारे 55 वर्षापूर्वी अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयए आणि भारतीय गुप्तचर संघटना आयबीनं याच भागात राबवलेल्या 'मिशन नंदादेवी'ची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. या मिशनमुळे हिमालयाच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला कायमचा धोका निर्माण झालाय.

चीनच्या अणवस्त्र मोहिमेवर हालचाली ठेवायच्या नादात अमेरिका आणि भारताने 'मिशन नंदादेवी' नावाची एक गुप्त मोहीम राबवली. त्यासाठी मानवी जीवासाठी अत्यंत धोकादायक ठरु शकणारे प्लुटोनियम न्यूक्लिअर डिव्हाईस हिमालयात नेण्यात आले, आणि तिथूनच या रहस्यमय घटनेला सुरुवात झाली.

हिमालयाच्या रांगेत जगातली सर्वाधिक उंचीची पर्वत उभी आहेत. त्यात नंदादेवी या उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात वसलेल्या पर्वताची उंची 25 हजार फुटांपेक्षा जास्त आहे. या पर्वताला 'ब्लू माऊटंन' असंही म्हटलं जातं. ही पर्वत रांग ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी आवडती आहे. ऋषीगंगा ही गंगेची हेड रिव्हर याच भागात उगम पावते.

शीत युद्धाची सुरुवात साठच्या दशकाचा सुरुवातीचा काळ हा शीत युद्धाच्या सुरुवातीचा काळ. दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर संशयाची परिस्थिती निर्माण झाली होती. साम्यवादाला आळा घालायच्या नादात व्हिएतनाम प्रकरणात अमेरिकेने आपले हात पोळून घ्यायला नुकतंच सुरु केलं होतं. त्यातच 1964 साली चीनने आपली अणवस्त्र चाचणी घेतली. त्यामुळे आता अमेरिकेच्या चिंतेत भर पडली.

अमेरिकेच्या आशियातल्या वर्चस्वाला आता आव्हान मिळालं होतं. त्यामुळे चीनच्या अणवस्त्र मोहिमेवर आता नजर ठेवायची गरज अमेरिकेला भासू लागली. अमेरिकेचे अर्धे अधिक टेहळणी विमानं ही सोव्हियत रशियावर नजर ठेवून होते. चीनच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी पाकिस्तानचा वापर करायचा तर तो देश बेभारवशाचा होता. मग या भागातला भारत हा एकमेव देश होता की जो अमेरिकेला या कामात मदत करु शकत होता.

1962 च्या युद्धात चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्यानंतर 1964 साली चीनने आपली अण्वस्त्र चाचणी घेतली होती. त्यामुळे भारताला चीनचा धोका कायम वाटत होता.

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने चीनच्या अणवस्त्र कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी हिमालयात एक न्यूक्लिअर डिव्हाईस ठेवायची कल्पना अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्या गळी उतरवली. लगोलाग त्यांनी भारताची गुप्तचर संघटना आयबीशी संपर्क साधला.

काय आहे प्लुटोनियम न्यूक्लिअर डिव्हाईस? प्लुटोनियमचा वापर स्पेस प्रोग्रॅममध्ये करण्यात येतो. स्पेस प्रोग्रॅम किती वर्षे चालेल याची खात्री नसते. त्यामुळे ऊर्जेसाठी प्लुटोनियमचा वापर केला जातो.

अमेरिकेने हिमालयात बसवायचे न्यूक्लिअर डिव्हाईस तयार केले. त्याचे एकूण चार भाग पडतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सिस्टिम ऑफ ऑक्सिलरी पॉवर (SNAP) जनरेटर म्हणजेच प्लुटोनियम कॅप्सूल युक्त जनरेटर होय. त्यानंतर यात एक 8-10 फुटाचा अॅन्टेना वापरण्यात येणार होता. त्यामुळे चीनच्या हालचाली रेडिओ तरंगाच्या सहायाने पकडता येणं शक्य होतं. तसेच यात दोन ट्रान्समीटरचा वापर करण्यात करण्यात आला होता.

या न्यूक्लिअर डिव्हाईस मध्ये 56 किलोग्रॅम प्लुटोनियमचा वापर करण्यात येणार होता. याचे आयुष्य जवळपास 100 वर्षे इतके होतं. पण अमेरिकेला याचा वापर फक्त 10-15 वर्षासाठी करायचा होता. कारण त्यांचे सॅटेलाईट विकसित करण्यात येत होतं.

अमेरिकेच्या आणि भारताच्या या संयुक्त कार्यक्रमाचे नाव होतं 'ऑपेरेशन हॅट' (HAT-High Altitude Test). भारतात याचं नाव 'मिशन नंदादेवी' असं होतं. या मिशनसाठी 200 लोकांची एक टीम तयार करण्यात आली. या टीमचे नेतृत्व ITBP चे कॅप्टन मनमोहन कोहली यांच्याकडे होतं. या टीममध्ये भारत आणि अमेरिका या दोन देशातील बेस्ट गिर्यारोहक आणि शेर्पा होते. 18 ऑक्टोबर 1965 साली या टीमने नंदादेवीची चढाई सुरु केली.

जवळपास 23 हजार फुटाच्या जवळपास, कॅम्प 4 या ठिकाणी पोहोचल्यानंतर या पर्वतावर ब्लिझर्ड सुरु झालं. ब्लिझर्ड म्हणजे एकाचवेळी बर्फ आणि वादळ सुरु होणे. अशा पारिस्थितीत पुढं जाणे केवळ अशक्य होतं. सहकाऱ्यांचा जीवही जाण्याचा धोका होता. आता या त्या परिस्थितीत कॅप्टन मनमोहन यांना आता हे मिशन किंवा सहकाऱ्यांचा जीव त्यापैकी काही एक निवडायचं होतं त्यांनी आपल्या सहकार्‍यांचा जीव निवडला आणि मागे फिरायचा निर्णय घेतला. मग हे एवढं अवजड साहित्य घेऊन मागे फिरता येत नव्हतं त्यामुळे ते सर्व साहित्य कॅम्प या ठिकाणी एका मोठ्या दगडाला बांधण्यात आले आणि टीम मागे फिरली.

हे मिशन पूर्ण करण्यासाठी 1965 साली पुन्हा ही टीम नंदादेवी वर गेली. कॅम्प फोर याठिकाणी पोहोचल्यानंतर या टीमला धक्काच बसला. कारण गेल्या वेळी ज्या ठिकाणी न्यूक्लिअर डिव्हाईस ठेवलं होतं त्याठिकाणी आता ते नव्हतं, ते गायब झालं होतं. केवळ 1 मायक्रोग्रॅम प्लुटोनियममुळे माणसाचा जीव जाऊ शकतो. इथं तर 56 किलोग्रॅम प्लुटोनियमचा प्रश्न होता. प्लुटोनियमची बरीच शोधाशोध झाली पण काहीच हाती लागले नाही. याच पर्वतावर गंगा नदीची हेड रिवर ऋषी गंगाचा उगम आहे. जर हे प्लुटोनियम त्या पाण्यात मिसळलं तर लाखो लोकांचा जीव जाण्याचा धोका होता. या प्लुटोनियमच्या शोधासाठी अमेरिकेच्या सीआयए आणि भारताच्या वतीने अनेकदा तपास करण्यात आला पण त्याचा काही शोध लागला नाही.

1966 साली चीनने दुसरी अण्वस्त्र चाचणी घेतली आणि अमेरिका खडबडली. त्यामुळे मिशन नंदादेवी पुन्हा सुरु करण्याचे ठरलं. या वेळी कॅप्टन मनमोहन कोहली यांच्यासोबत जगातले बेस्ट ट्रेकर म्हणून नावाजलेले सोनम वानग्याल, HCS राव, GS बानू यांची टीम तयार करण्यात आली. पण यावेळी नंदादेवी नाही तर 22,510 फुटावरचे नंदाकोट पर्वतावर हे न्यूक्लिअर डिव्हाईस बसवण्याचं ठरलं. हे काम करण्यात यावेळी टीम यशस्वी झाली.

एका वर्षानंतर या डिव्हाईसच्या कामात काहीतरी अडथळा आला. त्याला ठीक करण्यासाठी पुन्हा अमेरिकन एक्स्पर्ट टीम त्या ठिकाणी गेली तर नुक्लिअर डिव्हाईस जागेवर नव्हतं. त्याच्या शोधासाठी आजूबाजूचा बर्फ वितळवण्यात आला. तब्बल 8 फूट बर्फ वितळवल्यानंतर ते न्यूक्लिअर डिव्हाईस सापडले. प्लुटोनियमच्या उष्णतेने ते खाली वितळत जाऊन एका भुयारात पोहचलं होतं.

नंदादेवीच्या पर्वतावर 1965 साली गायब झालेलं प्लुटोनियम आजातगायत सापडलं नाही. 1977 साली मोराराजी देसाई पंतप्रधान असताना ही गोष्ट फुटली आणि हंगामा झाला. माध्यमं आणि विविध पक्षांचा मोराराजी देसाईंच्यावर मोठा दबाव आला आणि त्यांनी संसदेत ही गोष्ट मान्य केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर 2008 साली हा प्रश्न चर्चेत आला आणि परत गोंधळ उडाला. मसूरीचे लेखक स्टिफन अल्टर यांनी त्यांच्या 'Becoming Mountain' या पुस्तकात मिशन नंदादेवी बाबत काही गोष्टी नमूद केल्या आहेत. ते सांगतात की प्लुटोनियमचे वहन करणारे अनेक शेर्पा रेडियशनमुळे आजारी पडले, अनेकांना कॅन्सर झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

आंतरराष्ट्रीय लेखक पेटे टाकेडा यांनीही मिशन नंदादेवी वर 'An Eye At The Top Of The World' हे पुस्तक लिहलंय. 2004-07 या दरम्यान त्यांनी उत्तराखंडातील गंगा नदीच्या पाण्याचे नमुने गोळा केले. ते पाणी दोन प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आले. एका अहवालात त्या पाण्यात रेडिएशन नाही असं आलं तर दुसऱ्या अहवालात त्या पाण्यात रेडिएशनचा अंश असल्याचे आढळून आलं.

2018 साली उत्तराखंड राज्याचे तत्कालीन पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि गायब असलेल्या न्यूक्लिअर डिव्हाईसचा शोध पुन्हा सुरु करावा अशी मागणी केली. त्या प्लुटोनियमचा जीवन काळ अजून 45 वर्षे आहे. त्यामुळे त्याच्या रेडिएशनचा धोका अजूनही कायम आहे.

अनेक तज्ज्ञ लोकांचा दावा आहे की ते प्लुटोनियम जरी पाण्यात मिसळले तरी ते पाण्याच्या प्रमाणाच्या तुलनेत डायल्यूट झालेले असेल. त्यामुळे त्याचा काही धोका नाही. तर काही अभ्यासक म्हणतात की ते प्लुटोनियम वाळू-दगडात फसले असेल. असा वेगवेगळा दावा हे सगळे करत असले तरी यांच्यापैकी कोणीच असं 100 टक्के सांगत नाही की प्लुटोनियमच्या रेडिएशनचा धोका काहीच नाही.

अमेरिकेची पातळयंत्री गुप्तचर संघटना सीआयएने अमेरिकेच्या फायद्यासाठी भारताला आपल्या जाळ्यात ओढले आणि हिमालयात कायमस्वरुपी धोका रुतवून ठेवला. आता ज्या-ज्या उत्तराखंड वा हिमालयात नैसर्गिक आपत्ती येते वा तश्या काही घटना घडतात, त्यावेळी या 'मिशन नंदादेवी' अथवा 'मिशन हॅट' ची चर्चा दबक्या आवाजात होत असते.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Embed widget