एक्स्प्लोर

‘मन’ की बात… है भाई...

थोडं मशीन ओरिएन्टेड जगण्यापेक्षा माणूस ओरिएन्टेड जगूया की, कारण ही मशीन्स, हे तंत्रज्ञानही माणसानेच बनवलंय ना. तेव्हा माणसासाठी तंत्रज्ञान जन्माला आलंय किंबहुना ते माणसानेच घातलंय, तंत्रज्ञानासाठी माणूस जन्माला आलेला नाही, हे लक्षात ठेवूया आणि मानसिक आरोग्य जपूया.

मायानगरी मुंबई.... स्वप्ननगरी मुंबई...बॉलिवूड म्हणजे मुंबई....देशाची आर्थिक राजधानी मुंबई.... ‘धिस सिटी नेव्हर स्लीप्स’ हेही वर्णन मुंबईचंच. या यादीत आता एक नकोशी भर पडलीय ती मानसिक विकार झालेल्यांची मुंबई अशी. कारण, एका अहवालानुसार, देशात सर्वात जास्त मानसिक उपचारांची गरज मुंबईकरांना आहे. या यादीत खरं म्हणजे कोणालाच यायला आवडणार नाही....अव्वल तर नाहीच नाही....त्या यादीत मुंबई आलीय. त्यातही इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ही परिस्थिती मुंबईकरांना फेस करावी लागतेय. असा धक्कादायक निष्कर्षही समोर आलाय. परिस्थिती खरोखरच चिंताजनक, फार खोलवर विचार करायला लावणारी आहे. मुंबईकर पायाने नव्हे तर घड्याळ्याच्या काट्याने चालतात, म्हणजे तास मिनिटं नव्हे तर सेकंदाचा हिशेब ठेवत त्यांना पावलं टाकावी लागतात. मग नोकरी-व्यवसाय, शाळा-कॉलेज गाठणं असेल किंवा अगदी सुट्टीच्या दिवशी नातेवाईकांकडे जाणं असेल. त्यातही मुंबईत रोज लाखो जण लाईफलाईन अर्थात रेल्वेने प्रवास करतात. ८.१२, ९.१८ हे मुंबईकरांसाठी फक्त आकडे नाहीत, तर ते त्यांचं भन्नाट वेगाने जगणं आहे. किंबहुना मुंबई आणि बहुतेक शहरांमधला हा बेसिक फरक आहे, तो म्हणजे इथल्या जगण्याला असलेला अफलातून पेस. ती ट्रेन गाठण्यासाठी, बस पकडण्यासाठी, ट्रॅफिक टाळण्यासाठीची धडपड, जेव्हा फक्त शरीर नव्हे तर मनही धावत असतं, शरीरावर आलेला ताण काही काळाने कमी होतो, पण, धावलेल्या मनाचं काय? त्याला रिकव्हर व्हायला मिळतच नाही, ऑफिस गाठलं की ऑफिसमधलं प्रेशर, काम संपवून घरी परतलं की तिथल्या वातावरणातलं प्रेशर....कुणाची आजारपणं, कुणाचे घरगुती वादविवाद, कुणाला पैशाची चणचण. या सगळ्याचा ताण जो मन घेतं, त्याला रिलॅक्स करायला तुमच्याकडे वेळच नाहीये किंवा किंबहुना तो आपण वेळेचं नियोजन काढत नाहीये का? आपणच आपल्याला विचारायला हवं. सकाळी ट्रेन पकडण्यापासून ते रात्री उद्या सकाळी उठायच्या टेन्शनपर्यंतचं सगळा दबाव हे एकटं मन घेत असतं, त्यातच आता सोशल मीडिया नावाच्या अपरिहार्य घटकाने आपल्या आयुष्यात एन्ट्री घेतलीय. किंबहुना सोशल मीडियाने जग जवळ आलंय, पण माणसं दूर जातायत अशी स्थिती आहे. तासन् तास माणसं सतत मोबाईलमध्ये नाहीतर पीसीवर डोकं घालून बसलेली, कधी कुणाशी चॅटिंग, कधी सेल्फी तर कधी कुणाच्या पोस्ट केलेल्या फोटोवर किंवा कमेंटवर आपण रिएक्ट होणं...यात काही कन्स्ट्रक्टिव्ह आणि उपयुक्त कारणांचा अपवाद सोडला तर माणूस आता सोशल मीडिया नावाच्या नशेत अडकत चाललाय, अशी स्थिती आहे. हाडामासाचा माणूस बाजूला बसलेला असतो, पण आपलं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर. सतत अनेक तास. त्यामुळे आपण अॅडिक्ट झालोय. आहारी गेलोय, या सोशल मीडियाच्या. त्यातूनच मग डोळ्यासोबतच मेंदूवर, मनावर येणारा असह्य ताण. रात्र रात्र चॅटिंग करत बसणं, बऱ्याचदा अनावश्यक किंवा निव्वळ टाईमपासच्या गप्पा यात असतात. ज्याचा तुमचं आयुष्य घडवण्यात शून्य उपयोग असतो, बरं रिलॅक्सेशनसाठी काही काळ मोबाईलवर किंवा पीसीवर घालवायचा असं म्हटलं तरी तो काही काळ हा काही काळापुरता मर्यादित राहत नाही, तुम्ही तुमचे राहतच नाही. एकदा ती किक लागली की. तो चक्रव्यूह आहे आहे, ज्यात तुम्ही अडकत जाता, फसत जाता. ज्याचा अंतिम परिणाम फक्त निगेटिव्हच असतो. मोबाईलवर रेंगाळण्याची किंवा मोबाईलच्या आधीन होण्याची ही सवय फक्त मोठ्यांनाच नाही तर अगदी वर्षा दोन वर्षांच्या मुलांनाही लागलीय. आज मोबाईलवर गाणं किंवा कार्टून लागलं नाही तर दूधाचं भांडं तोंडाला लागत नाही किंवा घास घशाखाली उतरत नाही, ही सवय लावणारेही आपल्यासारखे आईवडीलच आहेत. तेव्हा ही मुलांची ही सवयदेखील आपण बदलण्यासाठी आता तरी कटिबद्ध होऊया. शरीराप्रमाणेच मनालाही विश्रांती हवी असते, हे आपण समजून घेणार आहोत की नाही ? असंख्य भावभावनांचा कल्लोळ, कोलाहल सुरु असलेलं मन, कधी आनंदाने उधाणलेलं तर कधी दु:खाने होरपळलेलं, कधी रागाने करपलेलं तर वेदनेने जखमी झालेलं मन. मन हा आपला आरसा असतो, आपल्या सभोवतालच्या परिस्थितीने आपल्यामध्ये होणाऱ्या बदलांचं प्रतिबिंब मनात उमटत असतं. प्रत्येक दिवसाच्या, प्रत्येक तासाला नव्हे प्रत्येक मिनिट अगदी प्रत्येक सेकंदालाही या मनात काहीतरी सुरु असतं, मला तर असं वाटतं की आपण झोपतो तेव्हाही मनात काही तरी सुरु असतं, म्हणूनच स्वप्न पडतात, म्हणूनच कधी दचकून आपण उठतो, तर कधी आपण झोपेतच बडबडतो. हे सारं आपलं मन करत असतं. मला तर वाटतं की, जगातील सर्वात वेगवान काय असं म्हटलं तर मी मन हेच उत्तर देईन. म्हणजे अगदी रिटायर झालेल्या उसेन बोल्टसारख्या धावपटूलाही मागे टाकण्याची ताकद फक्त कोणात असेल तर ती मनात आहे. मग इतकं वेगवान, इतक्या भावभावनांचा मुक्त संचार सुरु असलेल्या मनाला विश्रांती हवीच. जी आपण वेळेचं उत्तम नियोजन करुन घेऊ शकतो. मनाला रिलॅक्स करण्यासाठी साधेसोपे उपाय केले तरी चालतील. ज्यात दिवसातून किमान एकदा १५ मिनिटं शांत बसून ध्यान करणं. हा उपाय फायदेशीर ठरु शकतो. शांत असतानाही माणूस स्वत:शी बोलत असतो, असं म्हणतात. पण, त्या वेळी कोणत्याही गोष्टींचा विचार न करणं किंवा केलाच तर नकारात्मक गोष्टींचा अजिबात न करणं हे गरजेचं. दुसरं म्हणजे १५ मिनिटं तर उत्तम संगीत जे तुमच्या मनाला शांत करेल, नवसंजीवनी देईल ते ऐकणं. तुम्ही ज्या माणसांसोबत रिलॅक्स फिल करत असाल त्यांच्याशी बोलणं. असे काही छोटे छोटे उपाय केले तर मनाला शांत वाटू शकेल. मुद्दा तुम्ही कोणता उपाय करता हा नसून मनाला ताण न देणं हा आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक चांगली नोकरी मिळवण्याची, अधिकाधिक पैसे मिळवण्याची पर्यायाने जगण्याची स्पर्धा वाढतच जाणार, त्यातही मुंबईत उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आणि मुंबईची लोकसंख्या हे गणित इतकं विस्कटलेलं आहे की, त्याबद्दल न बोललेलंच बरं. म्हणून या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याबद्दल बोलण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे ते करुया. थोडं मशीन ओरिएन्टेड जगण्यापेक्षा माणूस ओरिएन्टेड जगूया की, कारण ही मशीन्स, हे तंत्रज्ञानही माणसानेच बनवलंय ना. तेव्हा माणसासाठी तंत्रज्ञान जन्माला आलंय किंबहुना ते माणसानेच घातलंय, तंत्रज्ञानासाठी माणूस जन्माला आलेला नाही, हे लक्षात ठेवूया आणि मानसिक आरोग्य जपूया, अधिक चांगलं कसं राहील याकडे जास्त लक्ष देऊया. या मनाची महती किंवा त्याचे गुणधर्म सांगताना समर्थ रामदास म्हणतात, अचपळ मन माझे नावरे आवरीता तुजविण शीण होतो धाव रे धाव आता त्याच वेळी आमच्या बहिणाबाई लिहून जातात, मन पाखरु पाखरु याची काय सांगू मात.... आता होतं भुईवर....गेलं गेलं आभाळात अशा या चंचल, वेगवान, भाव-भावनांचे अनेक पदर एकाच वेळी ल्यालेल्या आपल्या मनाची काळजी आपल्याला घ्यायलाच हवी. मन की बात है भाई...ध्यान दो.....
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSaif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Embed widget