एक्स्प्लोर

Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाला स्वीपचा ‘फटका’

IND vs AUS : नागपूर कसोटी (Nagpur Test Match) अडीच दिवसात फैसला... भारताचा (Team India) एक डाव 132 धावांनी दणदणीत विजय, तर दिल्ली कसोटीतही (Delhi Test Match) अडीच दिवसात निकाल... टीम इंडियाचा सहा विकेट्सनी खणखणीत विजय... 

खरं तर दोन कसोटी सामने म्हणजे 10 दिवसांचा खेळ अपेक्षित. पण, या मालिकेत आतापर्यंत काय घडलं, तर पाच दिवसात दोन सामने निकाली. तेही ऑस्ट्रेलियासारखी (Team Australia) खडूस टीम समोर असताना.

जी टीम आपल्या अंगणात प्रतिस्पर्ध्यांना चिरडते, बाहेर जाऊनही आपला डंका वाजवून येते. ती टीम इथे मात्र फिरकीच्या जाळ्यात पुरती अडकलीय, इतकी की बाहेर पडेपर्यंत मालिका संपूनही जाईल कदाचित.

दिल्ली कसोटीत पहिल्या डावात 263 ची समाधानकारक मजल मारल्यावर कांगारु दुसऱ्या डावात अशा तऱ्हेने ढेपाळतील असं वाटलं नव्हतं. टीम इंडियाने 262 ची मजल मारल्याने हा सामना दुसऱ्या इनिंगच्या स्कोरवर निकाली ठरणार होता. त्यात ऑसी टीमने एक बाद 65 अशी आश्वासक सुरुवात केली, तेव्हा भारतासमोर किमान अडीचशेचं आव्हान ते ठेवणार असं वाटलं. पण, तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ते पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आणि फिरकीच्या वादळात पालापाचोळ्यासारखे उडालेही.

एक बाद 65 ते सर्वबाद 113. म्हणजे 13 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर हेड हा दुसरा फलंदाज बाद झाला आणि 32 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर कुहनेमनला जडेजाने तंबूची वाट दाखवली. म्हणजे अवघ्या 19 ओव्हर्समध्ये 48 धावांच्या मोबदल्यात नऊ विकेट्स.

इतक्या जलद गतीने विकेट गेल्या, की काही क्षण वाटलं आपण हायलाईट्स पाहतोय.

पहिल्या कसोटीतही दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला 32.3 ओव्हर्सच खेळता आल्या.

आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे इथे दिल्ली कसोटीत सुमारे सहा फलंदाज स्वीपचा फटका खेळण्याच्या मोहात शिकार झाले. स्वीप किंवा रिव्हर्स स्वीप मारताना त्यांनी आपली विकेट घालवली, असंही म्हणता येईल. जिथे चेंडू फिरतोय, तसंच बाऊन्सही अनियमित आहे, तिथे हा फटका खेळणं ही क्रिकेटमधली आत्महत्या आहे, असं जाणकार सांगतात. ऑसी टीमने नेमकं तेच केलं आणि ते फसले.

त्यातही गेल्या मॅचमध्ये आपण पायचीतचे जास्त बळी पाहिलेले. या दुसऱ्या इनिंगमध्ये जडेजाच्या सात विकेट्सपैकी पाच क्लीन बोल्ड, तर अश्विनचे दोन एलबीडब्ल्यू.

कांगारुंना मालिकेत कमबॅक करायचं असेल तर संघात आणि त्यांच्या बॅटिंग एप्रोचमध्ये प्रचंड बदल करावा लागेल.

त्याच वेळी या मालिकेत जर भारताला वर्चस्व कायम राखायचं असेल तर आघाडीच्या फलंदाजांनी धावा करायला हव्यात, नागपूरप्रमाणेच इथे दिल्लीतही आपल्याला पहिल्या डावात सात बाद 139 वरुन तळाच्या फलंदाजांनी तारलं. अक्षर-अश्विनची शतकी भागीदारी झाली नसती आणि ऑसी टीमला मोठी आघाडी मिळाली असती तर निकाल वेगळा लागू शकला असता. राहुल तसंच मधल्या फळीतील श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांच्याकडून मोठ्या खेळी अपेक्षित आहेत, त्या होत नाहीयेत. खास करुन राहुलच्या संघनिवडीवर बरीच मतमतांतरं पाहायला मिळतायत. टॅलेंट असणं वेगळं आणि ते टॅलेंट परफॉर्मन्समध्ये कन्व्हर्ट करणं हे वेगळं. राहुलने 26 डिसेंबर 2021 ला सेंच्युरियनवर ठोकलेल्या सेंच्युरीनंतर त्याने तीन आकडी स्कोर गाठला नाहीये. त्यानंतरच्या 12 डावात अवघं एक अर्धशतक आहे. तर, या मालिकेतील तीन डावात मिळून 38 धावा. जेव्हा गिलसारखे इन फॉर्म प्लेअर पॅव्हेलियनमध्ये बसून मॅच बघत असतात, तेव्हा राहुलच्या या आकड्यांची सल आणखी बोचते. कोहलीकडूनही दिमाखदार शतकाची अपेक्षा आहे. कोहलीने 22 नोव्हेंबर 2019 ला बांगलादेशविरुद्ध इडन गार्डन्सला शतकी वेस ओलांडली होती. त्या खेळीनंतर त्याला शतकाने हुलकावणी दिलीय. शतकांचा हा त्याचा दुष्काळ लवकर संपावा, अशी अपेक्षा करुया. बाकी, आपल्या बोलिंग युनिटचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. म्हणजे बोलर्स हंट इन पेअर्स असं म्हणतात. फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांमध्येही अशी भागीदारी होणं गरजेचं असतं. इथे जडेजा-अश्विन-अक्षर एकमेकांना छान कॉम्प्लिमेंट करतायत. जडेजाची डावखुरी फिरकी, अश्विनचा वैविध्यपूर्ण ऑफ स्पिन मारा, खास करुन त्याची डावखुऱ्या फलंदाजांना अडकवण्याची जादू कमाल आहे. तर अक्षर पटेलची डावखुरी फिरकी जडेजापेक्षा वेगळ्या धाटणीची. हे फिरकी त्रिकूट ऑसी टीमला अक्षरश: नामोहरम करुन सोडतंय. आपण 2-0 अशी आघाडी घेत मालिका गमावणार नाही हे आता निश्चित झालंय. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीही कायम राखणार यावरही मोहोर उमटलीय. त्यात ऑसी टीम 0-2 ने पिछाडीवर. असा सुवर्णक्षण पुन्हा पुन्हा येत नाही. मौका है..जीत का चौका मार दो... नागपूर, दिल्ली दोन्ही फत्ते झालंय. इंदूर, अहमदाबादही होऊन जाऊ दे. लगे रहो टीम इंडिया..

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget