एक्स्प्लोर

अहमदाबाद डायरी

अहमदाबादच्या सौंदर्याचा जेवढा बाऊ केला जातो, तेवढं ग्रेट नाही. पण आपला वारसा जपण्यासाठी थोडीशी इच्छाशक्ती दाखविली तर काय होऊ शकतं, याचं ते एक उत्तम उदाहरण आहे.

मोदींच्या अहमदाबादची चर्चा जगभर सुरु आहे. हे अहमदाबाद आता ‘गुजरातचं अहमदाबाद’पेक्षा ‘मोदींचं अहमदाबाद’ या नावानं जास्त ओळखलं जातं. देशात कोणी परदेशी पाहुणा आला की, त्याची गुजरात आणि अहमदाबादची वारी ठरलेली असते. त्यात साबरमती रिव्हरफ्रंटवर झोपाळे झुलतात, गांधी आश्रमात सूत कातलं जातं आणि बरंच काही. अहमदाबाद डायरी देशात सत्तेवर येताना तर नरेंद्र मोदींनी गुजरात मॉडेलचे दाखले देत, आश्वासनं दिली होती. आश्वासनांचं काय झालं, हा वेगळा मुद्दा. पण तेव्हापासून गुजरातला जाण्याची संधी शोधत होते. मित्राच्या लग्नाच्या निमित्तानं नुकतीच गुजरातच्या अहमदाबादला अनऑफिशियल ट्रिप झाली. फार वेळ नाही, पण 8-9 तास गुजरातच्या रस्त्यावरुन फिरता आलं. तिथल्या काही ठिकाणांना भेट देता आली. एक सर्वसामान्य प्रवासी आणि पत्रकार या दोन्ही नजरेतून अहमदाबाद कसं दिसलं त्याचीच ही काही क्षणचित्र आणि शब्दचित्रं... अहमदाबाद डायरी अहमदाबाद ही काही गुजरातची राजधानी नव्हे, पण गुजरात म्हटलं की, गुजराती नसलेल्या माणसाच्या तोंडावर या एकमेव शहराचं नाव येतं. मुंबईत राहणाऱ्या माणसाला अहमदाबादच्या रस्त्यावरुन फिरताना भव्य-दिव्य असं फार काही दिसणार नाही. मी राहण्यासाठी अहमदाबादच्या उपनगर भागात होते. गुजराती माणूस म्हणजे गोड बोलणारे, बिझनेस माईंडेड आणि चकाचक घर असलेले, पण रस्त्यात कचरा फेकण्यास अजिबात न कचरणारे अशी सर्वसाधारण ओळख मुंबई किंवा महाराष्ट्रात असते. गुजराती माणसाच्या या ख्यातीची प्रचिती अहमदाबादमध्ये येतेच. ड्रोन कॅमेरातून आपल्याला दाखवलेलं अहमदाबाद प्रत्यक्षात रस्त्यावर तेवढं स्वच्छ दिसेलच याची प्रत्येक चौकात शाश्वती देता येत नाही. अहमदाबाद डायरी अहमदाबाद हे युनेस्कोनं जाहीर केलेलं भारतातलं पहिलं हेरिटेज शहर आहे. वेळ नसल्यानं हा शहरातला ‘हेरीटेज वॉक’ काही मला करता आला नाही. पण पर्यटकांना खुणावणारी काही ठिकाणं मात्र पाहायची संधी मी सोडली नाही. सार्वजनिक वाहतुकीसाठी वाट पहायला वेळ कमी होता, त्यामुळे ओलाची कॅब बुक केली आणि अहमदाबाद दर्शनाला बाहेर पडले. गुजरातच्या रस्त्यात खड्डे नाहीत, असं सांगितलं जातं. अहमदाबाद-गांधीनगर या पट्ट्यात फिरताना यातील वस्तुस्थिती अनुभवता आली. बहुतेक डांबरी रस्ते, पेव्हर ब्लॉकचा कमीत कमी वापर या गोष्टींमुळे रस्ता अगदी प्रेमात पडावा, असाच वाटला. मुंबईत खड्ड्यातून प्रवास करतानाचा अनुभव गाठीशी असलेल्या मला या रस्त्यांवर अगदी चुकल्या-चुकल्यासारखं वाटलं. अहमदाबाद डायरी प्रवासात ड्रायव्हरसोबत गप्पा सुरू होत्या. तो मूळचा गवळी समाजाचा, पण गरिबीमुळे आई-वडिलांनी दुधाचा व्यवसाय बंद करून, नोकरी पत्करली आणि दोन मुलांना मोठं केलं. हा मुलगा अवघा 23 वर्षांचा. उदरनिर्वाहासाठी ओला कंपनीला ड्रायव्हिंग सेवा देतो. सकाळच्या वेळेत हा आणि रात्री याचा भाऊ असे दोघे मिळून गाडी चालवतात. महिनाकाठी घरी 50 हजार रुपये सहज येतात, असं तो बोलून गेला. एवढं होऊनही आई-वडिलांनी काम करणं थांबवलेलं नाहीय. सगळं कुटुंब आठवडाभर झटतं. रविवारची दुपार मात्र एकत्र जेवणाची असते. फॅमिली लंच आटोपूनच तो माझ्यासोबत सारथी म्हणून आला होता. या महत्वाकांक्षी मुलानं आपलं सुटलेलं शिक्षण परत सुरू केलंय. बीकॉमचा अभ्यास तो करतोय आणि अगदी सहा महिन्यांपूर्वी घरी आलेल्या बायकोलाही कॉम्प्युटरचा क्लास लावून दिलाय. “जिंदगीभर थोडेही ओला चलाऊंगा, मुझे तो सरकारी नौकरी करनी है” अगदी पटकन तो हे वाक्य बोलून गेला. गुजराती माणूस श्रीमंत का होतो, याचं हे जिवंत उदाहरण माझ्यासमोर होतं. सहज म्हणून भाजपचा गुजरातमध्ये कमी झालेला करिश्मा, यावर त्याला बोलतं केलं. या पठ्ठ्यानं सगळं खापर विजय रुपाणी यांच्या डोक्यावर फोडलं. “मॅडम मोदी जैसा रुतबा रुपानी के पास नही है, इसलिये उनको वोट कम मिले. अब फिरसे उसेही सीएम बना दिया, अगली बार और कठीन होगा”. भाजपनं तळागाळातल्या या लोकांची मतं जाणून घेतली होती का हा प्रश्नच आहे. नसावं बहुधा अन्यथा हे दिवस पाहायला लागले नसते. अहमदाबाद डायरी प्रवासातला पहिला थांबा होता अडालज-नी-वाव किंवा अडालज स्टेपवेल मराठीत त्याला बारव म्हणतात. मुख्य शहरापासून 20 मिनिटांचा प्रवास पण मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुठेही प्रगतीचा बडेजाव न मिरवता सुरु असलेली विकासकामं. त्यामुळे कुठेही न अडलेली, सुरळीत सुरू असलेली वाहतूक सुखावणारी होती. मध्येच आमच्या पुढच्या गाडीला पोलिसांनी अडवलं. त्यावर ड्रायव्हर पठ्ठ्या म्हणाला “मॅडम जबसे सीसी टीव्ही बैठा है ना, तबसे कोई चिरीमिरी नही लेता, अब परची फाडते है” मला ऐकून गंमतच वाटली. अडालज-नी-वाव ला पोचल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. रस्त्यात मनसोक्त कचरा फेकणारे गुजराती इथे मात्र स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोर पालन करतात. मी गेले तेव्हा या बारवेच्या एका भागाची दुरुस्ती सुरू होती. संपूर्ण दगडी बांधकाम, दृष्ट लागेल असं कोरीवकाम, कुठेरी कृत्रिम सजावट नाही, बांधकाम किंवा दुरुस्ती करताना बारवेच्या ऐतिहासिक रुपाला कुठेही धक्का लागणार नाही, याची पुरेपूर घेतलेली काळजी सारं काही सुखावणारं होतं. रोज शेकडो पर्यटक इथे भेट देतात. गुजरात सरकार हा ऐतिहासिक वारसा जिवापाड जपतं. आपल्याकडे बारव संवर्धनासाठी सरकार दरबारी असलेली अनास्था पाहिली की वाईट वाटतं. अहमदाबाद डायरी अहमदाबाद आणि साबरमती आश्रम हे अतूट नातं आहे. त्यामुळे या आश्रमाला भेट द्यायची होतीच. आश्रमात प्रवेश केल्यानंतर एका वेगळ्याच दुनियेची सफर केल्याची अनुभूती येते. सूर्य डोक्यावर असताना त्याच्या अस्तित्वाची जाणीवही या परिसरात होत नाही. शेकडो पर्यटक एकाचवेळी या आश्रमात असतात, पण कुठेही गोंधळ गडबड नाही. बापूजींचा जीवनपट इथे उलडून दाखविलेला आहे. आणि गुजरात सरकार त्याची जपणूक करतंय.. इथे आलेल्या लोकांसाठी सूत कताईची प्रात्यक्षिकंही दिली जातात. इथे व्यवस्था राखण्यासाठी सरकारनं भरपगारी माणसं नेमली आहेत. साबरमती रिव्हरफ्रंट नदीतल्या पर्यावरणाच्या दृष्टीनं किती योग्य किती अयोग्य हे माहित नाही पण डोळ्याला दिसायला ते खूप सुंदर दिसतंय. आपल्या मुंबईतल्या गटारगंगा झालेल्या नदीपेक्षा शतपटीनं सुंदर. गुजरातचा ऐतिहासिक वारसा सरकार खरंच चांगल्या पद्धतीनं जपतंय. अशा वेळी पंतप्रधान देशोदेशीच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन साबरमती नदीच्या काठी आले तर कोणाच्याही पोटात दुखायला नको. अहमदाबाद डायरी या वेळच्या अहमदाबादच्या भेटीत पूर्ण ‘गुजरात मॉडेल’ अनुभवता आलं नाही. पण जे काही पाहिलं ते मस्त होतं. अहमदाबादच्या सौंदर्याचा जेवढा बाऊ केला जातो, तेवढं ग्रेट नाही. पण आपला वारसा जपण्यासाठी थोडीशी इच्छाशक्ती दाखविली तर काय होऊ शकतं, याचं ते एक उत्तम उदाहरण आहे.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP Premium

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget