एक्स्प्लोर

Travel Without Money : लिफ्ट प्लीज : पैसे खर्च न करता देशभ्रमंती करणारा अफसार मलिक!

आयुष्य जगताना आपल्या खूप इच्छा असतात, स्वप्नं असतात, पण त्यांच्या मागे धावता धावता आपण जगणं विसरून जातो. आयुष्याला साचलेपण येतं. इच्छा नसतानाही काही गोष्टी करत राहाव्या लागतात. पण काही वेडी माणसं ही सगळी बंधनं झुगारुन मुक्तहस्तानं आयुष्याचा आनंद लूटतात. असाच ठार वेडा आहे अफसार मलिक. दिल्लीचा अफसार ट्रॅव्हलर आहे. पण तो जरा वेगळा ट्रॅव्हलर आहे. कारण ट्रॅव्हल करताना तो ट्रॅव्हलिंगवर एकही पैसा खर्च करत नाही. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. तर हो, अफसारनं हे करुन दाखवलंय. अफसार रस्त्यावर ‘लिफ्ट प्लीज’चा बोर्ड घेऊन रस्त्यावर उभा राहतो. लिफ्ट मागत तो आपला प्रवास पूर्ण करतो. आतापर्यंत त्यानं जवळपास संपूर्ण भारत असाच पालथा घालताय. आहे की नाही कमाल !!

हिचायकिंग.. ही ट्रॅव्हलिंगमध्ये नवी कन्सेप्ट आहे. हिचायकिंगचा अर्थ आहे, तुम्ही लिफ्ट मागत प्रवास करायचा. ज्याला लिफ्ट मागणार आहोत त्याच्याशी तुमची ओळख नसावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही लिफ्ट देणाऱ्याला पैसे देता कामा नये. अफसार आपल्या पाठीवर बॅग घेऊन असाच घराबाहेर पडतो. पुढच्या महिना दोन महिन्याचा रोडमॅप आणि टारगेट्स ठरवतो. मग लिफ्ट घेत आपला प्रवास पूर्ण करतो. आहे की नाही इंटरेस्टिंग!

अफसारनं एकदा पश्चिम किनारपट्टीपासून थेट दक्षिणेत असाच प्रवास केला. पनवेल-अलिबागपासून त्याचा प्रवास सुरू झाला. अख्खी कोकण किनारपट्टी, मग कर्नाटक, केरळ ते थेट तामिळनाडूच्या कन्याकुमारीपर्यंतचा थरारक प्रवास २० दिवसात पूर्ण केला. संपूर्ण प्रवास त्यानं एक रुपयाही प्रवासावर खर्च केला नाही. अकरा रात्री समुद्रकिनारी कॅम्प लावला. आणि इतर रारी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारांचा आसरा घेतला. राहिला खाण्याचा खर्च, पण खाण्याचा खर्च तर आपण घरी असलो तरी होतोच की. अलिबाग ते कन्याकुमारी हा प्रवास फक्त एक उदाहरण आहे. अफसारनं लेह, लडाख, जम्मू-काश्मिर, पंजाब, राजस्थान, संपूर्ण दक्षीण भारत असाच प्रवास केलाय. प्रवासात मिळेल त्या वाहनात तो लिफ्ट मागतो. टांगा, टू व्हीलर, ट्रक, फोर व्हीलर, मालवाहू वाहनं, प्रवास करायला कुठलंही वाहन वर्ज नाही. आपण ठरलेल्या वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचतो ना!  बस्स.. हे एकच लक्ष्य.

कोण आहे अफसार मलिक?

थोडसं अफसारविषयी जाणून घेऊया. अफसार हा मूळचा दिल्लीचा. ट्रॅव्हलिंगच वेड त्याला आधीपासून होतंच. यासाठी तो छोट्या छोट्या बजेट ट्रिप्स करायचा. त्यावेळी हॉस्टेलमध्ये राहणं, पब्लिक ट्रान्सपोर्टनं फिरून तो पैसे वाचवायचा. कधी कधी लिफ्ट मागायची वेळही यायची. अशीच एकदा लिफ्ट मागितल्यावर अफसारला वाटलं, आपण असाच संपूर्ण प्रवास करावा का? असं मनात आल्यावर त्यानं पुढची ट्रिप अशीच लिफ्ट मागत केली. मग काय हेच त्याचं पॅशन बनलं. तोपर्यंत 2018 साली त्यानं उच्चशिक्षण घेऊन काही दिवस नोकरी केली, पण मन लागेना. मग काय फुल्लटाईम असाच प्रवास करायचं असं ठरवून त्यानं पूर्ण तयारीनं ट्रॅव्हल विदाऊट मनी ही कन्सेप्ट अंमलात आणली. हातात लिफ्ट प्लीज लिहिलेला बोर्ड, खांद्यावर बॅग, बॅगेवरही बिना पैसे के संपूर्ण भारत यात्रा असं लिहिलं. अफसारचा हा अनोखा फंडा बघून लोकही त्याला मदत करतात. अफसारच्या अनुभवानुसार त्याला 50 टक्के टू व्हीलरकडूनच लिफ्ट मिळते. त्यासाठी तो सोबत हेल्मेटही ठेवतो. संपूर्ण भारत पालथा घातल्यावर अफसारला आता देशभरही असंच फिरायचंय. Travel Without Money या यू ट्युब चॅनेलद्वारे तो व्हिडिओमधून ट्रॅव्हलर्सना मार्गदर्शनही करतो.

अफसारसारखं आपणही करावं असं तुमच्या मनात आलं असेल तर फार एक्साईटेड होऊ नका, जरा थांबा! असा प्रवास करताना आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे हे आधी समजून घ्या.

सोबत काय ठेवाल

हे सगळ्यात महत्वाचं आहे. खरंतर कमीत कमी वस्तू अगदीच गरजेच्या वस्तू सोबत ठेवा. मोबाईल, चार्जर, कॅमेरा, पॉवर बँक या वस्तू तर सोबत असतातच. पण सोबत एक हेल्मेट ठेवा. कॅम्पिंगसाठी टेन्ट, स्लीपिंग बॅग, थोड्या खाण्याच्या वस्तू, पाण्याची बॉटल आणि सगळ्यात महत्वाचं चेहऱ्यावर छान स्माईल ठेवा, म्हणजे लिफ्ट लवकर मिळेल.

 

हिचायकिंग / ‘ट्रॅव्हल विदाऊट मनी’ कोण करु शकतं?

खरं तर हिचायकिंग कोणीही करु शकतं मात्र यासाठी तुम्ही शारिरीकदृष्ट्या फिट असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला बघून लोकांनी लिफ्ट द्यावी, असं तुमचं व्यक्तिमत्व असावं. तुम्ही जेन्यूइन ट्रॅन्हलर आहात हे समोरच्या व्यक्तीला तुम्हाला पटवून द्यावं लागेल. मिळेत त्या वाहनात प्रवास करण्याची तयारी असावी. तयारीपेक्षाही तुम्हाला प्रत्येक वाहनात प्रवास करताना आनंद घेता यायला हवा. फिजिकली फिट असाल तर यासाठी वयाचं काहीही बंधन नाही.

 

मुली/महिला असा प्रवास करु शकतात का?

हो, अगदीच करु शकता. पण त्यासाठी मुलींनी प्रचंड आत्मविश्वासानं वावरावं लागेल. मुलींची कुणी छेड काढत असेल तर एका आवाजावर लोक मदतिला धावूनही येतात. त्यामुळे मनाची तयारी असेल तर मुली किंवा महिलाही असा प्रवास करु शकते. ज्या गाडीत तुम्ही प्रवास करणार आहात त्या गाडीत व्हिडिओ घेणं, फोटो काढणं, फोनवर बोलून तुमच्यासोबत आसपास इतरही लोक आहेत याची जाणीव समोरच्याला करून देणं. असे फंडे वापरून समोरच्यावर सायकोलॉजिकल दबाव आणू शकता. जेणेकरून त्याच्या मनात काही अनुचित आलं तरी तो काही करु शकणार नाही.

गृप असेल तरी हिचायकिंग शक्य

तुमच्या मनात हा प्रश्न आला असेलच की आम्ही दोन चार मित्र एकत्र असू तर कसं करायचं. तर यावरही पर्याय आहे. तुम्ही एक निश्चित टारगेट ठरवून वेगवेगळ्या वाहनांनी इच्छित स्थळी पोहोचू शकता, एकत्र येऊ शकता. पण शक्यतो सोलो ट्रॅव्हलर्ससाठी हा पर्याय जास्त उपयुक्त आहे.

बरं, ट्रॅव्हलिंगचं झालं! राहण्या-खाण्याचं काय?

तर मित्रांनो राहण्यासाठी तुम्ही तुमच्या बॅगेत बसेल असा कॅम्पिंग टेन्ट सोबत ठेऊ शकता. तीन-चार हजार रुपयांपासून कॅम्पिंग टेन्ट बाजारात आणि ऑनलाईन सहज उपलब्ध होतात. फक्त कॅम्प लावताना ठिकाण काळजीपूर्वक निवळा. ते तुमच्या डेस्टिनेशननुसार ठरवा. दुसरा पर्याय म्हणजे मंदिर, मस्जिद किंवा गुरूद्वारा हा पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे, हॉस्टेलचा. हॉस्टेलचं जाळं आता बऱ्याच ठिकाणी पसरलंय. शंभर रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत उत्तम हॉस्टेल सोलो किंवा गृप ट्रॅव्हलर्ससाठी उपलब्ध आहे. हा सर्वोत्तम पर्याय आहे. खाण्यासाठी स्ट्रिट फूड एक्सप्लोर करू शकता. ढाब्यांवर उत्तम जेवण अगदी स्वस्तात मिळतं. किंवा तुम्ही सोबत न्यूट्रिशन बार किंवा ड्रायफ्रूट्स ठेऊ शकता. इतके पैसे वाचवताय, थोडं खाण्यापिण्यावर खर्च करा की राव!!!

तर मंडळी, फिरण्याची हौस असेल, माणसं, नवीन ठिकाणं जाणून घ्यायला आवडत असतील तर असा ऑफबिट प्रवास करायला हरकत नाही. कण्हत कण्हत गाणं म्हणत सगळेच जगतात. जरा खुलके जगायचं असेल तर उचला बॅग आणि म्हणा. ‘लिफ्ट प्लीज’

 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asrani Passed Away: शोलेतील 'अंग्रेजो के जमाने के जेलर' अजरामर करणाऱ्या कॉमेडियन असरानी यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
शोलेतील जेलर अजरामर करणारे विनोदी अभिनेते दिग्दर्शक असरानी यांचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 20 OCT 2025 | ABP Majha
Zero Hour Sarita Kaushik : शनिवार वाड्याच्या नावावर जे होतंय ते निव्वळ राजकारण- सरिता कौशिक
Zero Hour : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण, नवा वाद पेटला
Zero Hour : नमाज पठण करणे हा गुन्हा होऊ शकत नाही, Anwar Rajan यांचं थेट स्पष्टीकरण
Govardhan Asrani : 'असरानी यांचं निधन, तीन पिढ्यांना हसवणारा तारा हरपला'

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asrani Passed Away: शोलेतील 'अंग्रेजो के जमाने के जेलर' अजरामर करणाऱ्या कॉमेडियन असरानी यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
शोलेतील जेलर अजरामर करणारे विनोदी अभिनेते दिग्दर्शक असरानी यांचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
OLA : ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
Railway Rules For Ticket Upgradation: स्लीपर तिकिटावर एसी कोचमध्ये प्रवास करू शकाल! काय आहे नियम आणि कसा घेता येईल लाभ?
स्लीपर तिकिटावर एसी कोचमध्ये प्रवास करू शकाल! काय आहे नियम आणि कसा घेता येईल लाभ?
महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट, 47 अधिकाऱ्यांना बढत्या; महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट, 47 अधिकाऱ्यांना बढत्या; महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
Embed widget