एक्स्प्लोर

गोष्ट छोटी उंदराएवढी..!

महाराष्ट्राच्या मंत्रालयातच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप नाथाभाऊंनी केला आहे. दिवसाला 46 हजार उंदीर मारणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाचे कपडे या उंदरांनी कुरतडून त्यांना पार नागडं करून टाकलं आहे. विशेष म्हणजे, हा विभाग नाथाभाऊंचे स्नेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित येतो.. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना मूषकबाधेनं ग्रासलंय.

  गोष्ट तशी छोटी उंदराएवढी... मात्र आहे डोंगराएवढी... भाजप सत्तेच्या या डोंगराला पोखरण्यासाठी नाथाभाऊंनी खास ‘उंदीरा’स्त्र डागलं… महाराष्ट्राच्या मंत्रालयातच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप नाथाभाऊंनी केला आहे. दिवसाला 46 हजार उंदीर मारणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाचे कपडे या उंदरांनी कुरतडून त्यांना पार नागडं करून टाकलं आहे. विशेष म्हणजे, हा विभाग नाथाभाऊंचे स्नेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित येतो.. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना मूषकबाधेनं ग्रासलंय.. नाथाभाऊंच्या उंदीर बॉम्बनं सरकारच्या पारदर्शक कारभाराला किती बिळं पाडली आहेत, याची प्रचिती आपल्याला येईल... तसं नाथाभाऊ आजपर्यंत जे बोलत आले, ते सरकारनं फार सीरियसली घेतलं नाही. स्वकीयांवर बरसणाऱ्यांना नाथाभाऊंना विरोधकांना खांदा देण्याचा प्रयत्न करून आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न केला... पण नाथाभाऊंनी आजपर्यंत त्यांना झुलवत ठेवलंय... पण परवा मंत्रालयात त्यांनी उंदीर सोडून स्वतःच्याच पक्षाचे वाभाडे काढले. सर्वसामान्य जनता या अशा घोटाळ्यांना चांगलीच जाणते. किंबहुना हा अनुभव प्रत्येकजण घेतच असतो. पण हा भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, हे खडसेंच्या आरोपांमधून सिद्ध होतं आहे. खडसे आज मंत्री असते, तर त्यांनी कदाचित हा आरोप त्यांनी केलाच नसता. हा घोटाळा उघड़ झालाही नसता. याचा अर्थ असा की, सत्ता उपभोगताना होणाऱ्या गैरप्रकारांना सत्ताधाऱ्यांची मूक संमती असते. नव्हे, त्यांचा अप्रत्यक्ष त्यात सहभागही असतो, असं म्हणायला हरकत नाही. उंदरांनी सरकारी कारभाराच्या केलेल्या या चिंध्या भ्रष्टाचाराचं प्रतिक आहेत. भ्रष्टाचाऱ्यांचे हात एवढे सरावलेत की, ते आता अकल्पित, विश्वास न बसणारी आकडेवारी दाखवून करोडोंचा मलिदा घशात घालत आहेत. कारण त्यांना कुठलंही भय नाही. जिथून राज्याचा कारभार चालतो, जिथे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांची उठबैस असते. अशा मंत्रालयातच भ्रष्टाचाराचे एवढे पेव फुटले असतील, तर गावागावात असलेल्या तलाठ्यापासून झेडपीतल्या बाबूपर्यंत कोणालाच भय असण्याचं कारण नाही. हे या व्यवस्थेला असेच उंदरासारखे अखंड पोखरत राहणार आहेत. सरकार दरबारी खेटे मारून पॅरागॉनचे दहा-बारा जोड झिजवत आयुष्याची हयात घालवणारे, हजारो लोक आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. यातलेच एक धर्मा पाटील मंत्रालयात आले. नेहमीसारखी त्यांची निराशा झाली. आणि त्यांनाही जीव गमवावा लागला. एरवी किड्यामुंग्यांप्रमाणे मरणारा शेतकरी पहिल्यांदाच उंदरासारखा मेला. ज्य़ाचं या व्यवस्थेला काही सोयरसुतक नाही. ''पिपात ओल्या मेले उंदीर, माना टाकून मुरगळलेल्या'' या मर्ढेकरांच्या कवितेच्या ओळीला दुसऱ्या हत्याकांडात मारल्या गेलेल्या ज्युंचा संदर्भ आहे. आज आमचे धर्मा पाटील गेले. उद्या आणखी कोणी जाईल. जात राहतील... 'उडदामाजी काळे गोरे' म्हणण्याची आपली सवय आहे. मात्र, मंत्रालयातल्या घोटाळ्यानंतर 'उंदरामाजी काळे गोरे' म्हणायची वेळ आली आहे. गेल्यावेळी मंत्रालयात आग लागून सगळी कागदपत्रं जळाली. आता उंदरांना लालफितशाही कुरतडण्यासाठी सरकारनं उंदीर पाळले तर नवल नको. यात बिचाऱ्या मूषकराजाची बदनामी होते. तसं पाहिलं तर इंग्लंडच्या मंत्रालयातही उंदरांना आळा घालण्यासाठी मांजरी पाळल्या जातात. आपल्य़ाकडेही खडसेंनी उपहासानं जरी म्हटलं तरी, खरोखरच दोन चार मांजरी, बोके सोडले असते तरी देखील उंदरांचा उच्छाद रोखता आला होता. किंबहुना तशी प्रथा आपल्या मंत्रालयात याआधीपासून आहे. मंत्रालयातले कागदपत्रं कुरतडणाऱ्या उंदरांना रोखण्यासाठी मांजर, बोका पाळले जातात. मग हे उंदीर मारण्याचं कंत्राट हा प्रकार कशासाठी? पण कंत्राट हा आमच्या नेत्यांचा अधिकाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, त्याबद्दल न बोललेलं बरं. यावरूनच आमची व्यवस्था किती लयास गेली आहे, हे दिसून येते. आता गणरायांनीच हे कागदी उंदीर सोडले, असं उपहासानं म्हणावं लागेल. हे उंदीर खुर्चीखालची जागा भुसभुशीत केल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटी सतीश देवपूरकरांच्या चार ओळी आठवतात, बिळातले उंदीर निघाले, शिकारींस ढाण्या वाघांच्या, फडताळांची झुरळे सुद्धा पडली मागे मागे त्यांच्या! एक काफिला तो भ्याडांचा खुराड्यामधे चिवचिव करतो! कुणी खास तोतया त्यांस मग, अनाहूत सल्लेही देतो!!
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SIP : SBI च्या म्युच्युअल फंडमधील 5000 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना 7.22 कोटी मिळाले,करबचतीसाठी परफेक्ट फंडबाबत जाणून घ्या
SIP : SBI च्या म्युच्युअल फंडमधील 5000 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना 7.22 कोटी मिळाले,करबचतीसाठी परफेक्ट फंडबाबत जाणून घ्या
Mumbai rain : अवकाळीनं वातावरण फिरलं, कुठे गारा, कुठे वादळीवारा; मुंबई, पुणे, लोणावळ्यात पाऊस, पाहा PHOTOS
अवकाळीनं वातावरण फिरलं, कुठे गारा, कुठे वादळीवारा; मुंबई, पुणे, लोणावळ्यात पाऊस, पाहा PHOTOS
अतिशय चीड आहे, चौकशी समिती गठित; दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकारावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
अतिशय चीड आहे, चौकशी समिती गठित; दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकारावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दारुच्या नशेत CISF जवान, भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी
दारुच्या नशेत CISF जवान, भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 04 April 2025ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 04 April 2025Pune Shivsena Andolan Deenanath Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसेनेचं तिरडी आंदोलनABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 04 April 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP : SBI च्या म्युच्युअल फंडमधील 5000 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना 7.22 कोटी मिळाले,करबचतीसाठी परफेक्ट फंडबाबत जाणून घ्या
SIP : SBI च्या म्युच्युअल फंडमधील 5000 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना 7.22 कोटी मिळाले,करबचतीसाठी परफेक्ट फंडबाबत जाणून घ्या
Mumbai rain : अवकाळीनं वातावरण फिरलं, कुठे गारा, कुठे वादळीवारा; मुंबई, पुणे, लोणावळ्यात पाऊस, पाहा PHOTOS
अवकाळीनं वातावरण फिरलं, कुठे गारा, कुठे वादळीवारा; मुंबई, पुणे, लोणावळ्यात पाऊस, पाहा PHOTOS
अतिशय चीड आहे, चौकशी समिती गठित; दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकारावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
अतिशय चीड आहे, चौकशी समिती गठित; दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकारावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दारुच्या नशेत CISF जवान, भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी
दारुच्या नशेत CISF जवान, भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी
संताप... डॉ. घैसासच्या रुग्णालयात महिलांकडून तोडफोड, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाहेर तिरडी आंदोलन
संताप... डॉ. घैसासच्या रुग्णालयात महिलांकडून तोडफोड, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाहेर तिरडी आंदोलन
Gold Rate : कधीच विचार केला नसेल इतके सोन्याचे दर घसरणार, 10 ग्रॅमचे दर 60 हजारांच्या खाली येणार,तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी 
अखेर सोन्याच्या दरात घसरण सुरु, 10 ग्रॅम सोनं 60 हजारांच्या खाली येणार, तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी
Video : CAA आणून हिंदूना नागरिकता देण्याची घोषणा केली, 2 हजार सुद्धा आले नाहीत, पण 10 वर्षात 15 लाख भारतीयांनी देश सोडला; संसदेतील खासदाराच्या भाषणाची चर्चा
Video : CAA आणून हिंदूना नागरिकता देण्याची घोषणा केली, 2 हजार सुद्धा आले नाहीत, पण 10 वर्षात 15 लाख भारतीयांनी देश सोडला; संसदेतील खासदाराच्या भाषणाची चर्चा
फेसबुक लाईव्ह करत पतीचा खून, आता व्हॉट्सअपवरुन तेजस्वी घोसाळकरांना जिवे मारण्याची धमकी, मुंबईत खळबळ
फेसबुक लाईव्ह करत पतीचा खून, आता व्हॉट्सअपवरुन तेजस्वी घोसाळकरांना जिवे मारण्याची धमकी, मुंबईत खळबळ
Embed widget