Weekly Horoscope 8 To 14 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 8-14 April 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या काळात काही राशींना शुभ फल प्राप्त होईल, तर काही राशींना अडचणींचा सामना करावा लागेल. मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 8-14 April 2024 : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मेष आणि वृश्चिकसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. एप्रिलचा नवीन आठवडा (8 April To 14 April Weekly Horoscope) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरेल. या आठवड्यात प्रवासाचे योग आहेत, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. या आठवड्यात तुम्हाला तुमचं काम पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. व्यावसायिकांनी आपले पैसे हुशारीने गुंतवावे. या आठवड्यात तुमचे काही अचानक खर्च निघू शकतात, ज्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. तुमच्या प्रियकरासोबत सुरू असलेला तुमचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुम्ही कुटुंबासह बाहेर फिरायला जाऊ शकता.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप भाग्याचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न केले तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील, उत्पन्नाचे स्रोत वाढेल. अडकलेला पैसा या आठवड्यात परत मिळू शकतो. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. प्रेमाच्या बाबतीतही हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीचे लोक नवीन आठवड्यात अधिक व्यस्त असणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला तुमची कारकीर्द आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. नवीन गोष्टी करण्यात सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. कोर्टात केस चालू असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडी जास्त धावपळ करावी लागू शकते. प्रेम संबंध सामान्य असतील. तुमचा तुमच्या प्रियकरासोबत चांगला समन्वय राहील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ आणि सौभाग्य देणारा आहे. या आठवड्यात तुमची सर्व नियोजित कामं पूर्ण होतील, ज्यामुळे तुमच्यामध्ये काम करण्याचा उत्साह निर्माण होईल. ऑफिसमधील तुमचं काम पूर्ण होईल. तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांचा येणारा आठवडा चांगला जाईल. तुम्ही परदेशात जाण्याचा प्लॅन बनवू शकता. कौटुंबिक प्रश्न सोडवताना वडीलधाऱ्यांची आणि लहानग्यांची मदत मिळेल. या आठवड्यात आरोग्य थोडं खालावलेलं असेल, त्यामुळे आरोग्याची चांगली काळजी घ्या. तुम्हाला ताप, सर्दीसारख्या आजारांचा त्रास होऊ शकतो. या आठवड्यात प्रियकराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात खूप सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कोणीतरी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतं. तुमचे काम इतरांवर सोडू नका. कार्यालयीन कामं पूर्ण करण्यासाठी या आठवड्यात तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. या आठवड्यात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या जोडीदाराशी तुमची जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रेमविवाहाला मान्यता देऊ शकतात.व्यवसायासाठी हा काळ अनुकूल राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :