(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Horoscope 29 April to 5 May : आजपासून सुरू झालेला नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 29 April to 05 May : नवीन आठवड्यात काही राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील, तर काही राशींच्या लोकांना या काळात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तुमच्यासाठी नवीन आठवडा कसा असेल? जाणून घ्या
Weekly Horoscope 29 April to 05 May : एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा अनेक राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. ग्रहमाणाच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 1 मे रोजी गुरू तब्बल 12 वर्षांनंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच मीन राशीमध्ये राहू आणि बुध यांचा संयोग होईल.
आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीत सूर्य, गुरू आणि शुक्र 3 ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग (Trigrahi Yog) तयार होत आहे. शुक्र आणि सूर्याच्या संयोगामुळे शुक्रादित्य योग (Shukraditya Yog) देखील तयार होणार आहे. यासोबतच गुरू आणि शुक्र एकत्र आल्याने गजलक्ष्मी योग (Gajlaxmi Yog) तयार होईल. या आठवड्यात तयार झालेल्या या योगांमुळे काही राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप खास ठरू शकतो. तुमच्यासाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या
मेष रास (Aries)
आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीमध्ये चंद्र नकारात्मक स्थितीत असल्यामुळे तुम्हाला निराशेचा सामना करावा लागेल. आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्हाला केलेल्या गोष्टींचं योग्य फळ मिळायला सुरू होईल. आठवड्याच्या शेवटी तुमचा मूड चांगला असेल आणि या काळात तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचीही शक्यता आहे.
वृषभ रास (Taurus)
आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या जीवनात गोष्टी चांगल्या होतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्हाला तुमच्या कामाचा ताण जाणवेल, पण तुम्ही तो नीटपणे हाताळू शकाल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमचं करिअर आणि लव्ह लाईफ याच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत छान रोमँटिक डेटवर देखील जाऊ शकता.
मिथुन रास (Gemini)
जेव्हा तुम्ही एखाद्या प्रकल्पावर नवीनच काम करायला सुरुवात केली असेल तेव्हा तुमचं काही आर्थिक नुकसान होऊ शकतं. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता.
कर्क रास (Cancer)
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न कराल. आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल काही चांगली बातमी मिळेल, या काळात तुमची बढती होण्याची दाट शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी सर्व काही ठीक होईल आणि तुम्ही तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकाल.
सिंह रास (Leo)
आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या मागील गुंतवणुकीतून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्ही तुमच्या आहारावर नीट लक्ष केंद्रित कराल आणि व्यायामाला सुरुवात कराल. आठवड्याच्या अखेरीस तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता आणि त्यांच्यासोबत मोलाचा वेळ घालवू शकता.
कन्या रास (Virgo)
आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेले तुमचे वाद मिटतील. अविवाहितांना त्यांचा सोबती सापडण्याची शक्यता जास्त आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.
तूळ रास (Libra)
हा आठवडा तुमच्यासाठी तणावपूर्ण असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. आठवड्याच्या अखेरीस विद्यार्थ्यांना पुरस्कृत केलं जाईल आणि त्यांच्या वर्गात तुमचं नाव होईल.
वृश्चिक रास (Scorpio)
आठवड्याच्या सुरुवातीला कामावर सहकाऱ्यांमुळे तुम्ही थोडे उदास असाल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही खरेदीला जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जाऊ शकता.
धनु रास (Sagittarius)
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवू शकता आणि तुमच्यात जर काही मतभेद झाले असतील तर ते सोडवू शकता. आठवड्याच्या अखेरीस तुम्ही खरेदीसाठी बाहेर जाऊ शकता.
मकर रास (Capricorn)
मकर राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला त्यांचे खर्च कमी करण्यावर भर देतील. आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्ही कामात समाधानकारक परिणाम मिळवू शकाल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही सकारात्मक बातम्या मिळतील आणि तुमची बढती होण्याची शक्यता देखील जास्त आहे.
कुंभ रास (Aquarius)
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही जेवण्यासाठी आलिशान ठिकाणी जाल. आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल, ज्यामुळे तुम्ही पैसे वाचवू शकाल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या मित्रांना घरी आमंत्रित करू शकता आणि घरीच पार्टी करुन चांगला वेळ घालवू शकता.
मीन रास (Pisces)
मीन राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कामावर लक्ष केंद्रित करतील आणि तुमचे सहकारी तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर डिनरला जाल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही काही मालमत्तेत गुंतवणूक कराल, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: