Weekly Horoscope 25 November To 01 December 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 25 November To 01 December 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 25 November To 01 December 2024 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. या नवीन आठवड्यात नोव्हेंबरचा महिना संपणार आहे तर वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सुरु होणार आहे. त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात कमतरता दिसून येईल. तसेच, तुमच्या कुटुंब-परिवारात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या कामकाजात बदल करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच, नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी चांगला योग जुळून आला आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. त्यामुळे तुम्ही मेहनत करत राहा. ज्या लोकांची परदेशात जाण्याची इच्छा आहे. त्यांचीही इच्छा लवकरच पूर्ण होईल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीचे लोक कोणत्या तरी एका कारणाने सतत चिंतित असतील.यामुळे तुमचं नोकरी-व्यवसायातही मन रमणार नाही. कामाचा वर्कलोड देखील जास्त असल्यामुळे तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या खर्चात अचानक वाढ होईल. यासाठी पैसे जपून खर्च करा. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. पण यासाठी तुमचं आरोग्य सर्वात आधी महत्त्वाचं आहे याचा काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांचं नवीन आठवड्यात मन चलबिचल असू शकतं. तुमच्या कामानिमित्त तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. अन्यथा नंतर तुम्हाला त्याचा पश्चात्ताप करावा लागू शकतो. तुमचे तुमच्या मित्रांबरोबर वैचारिक मतभेद देखील असू शकतात. या सर्वांशी तुम्हाला डील करावी लागेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे.या आठवड्यात तुम्ही मनाने खचून जाल. तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता दिसून येईल. यासाठी जास्तीत जास्त वेळ धार्मिक कार्यात घालवा. धार्मिक स्थळाला भेट द्या. तसेच, योग, मेडिटेशन आणि सकस आहार घ्यायला सुरुवात करा. यामुळे तुमचं मन शांत राहील आणि कामावर तुम्हाला नीट फोकस करता येईल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
नवीन आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमचं मन प्रसन्न असेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामात बदल करण्याची गरज आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमची वाहन घेण्याची इच्छा असेल तर ती लवकरच पूर्ण होईल. मित्रांच्या सहकार्याने तुमची सर्व कामे पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :