(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : लवकरच ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा सुरू होणार आहे.हा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे. ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला जर तुमच्या आई-वडिलांना काही गोष्टी सांगायच्या असतील तर त्या मनमोकळेपणाने सांगा. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्व गोष्टी सुरळीत चालतील. थोड्याफार प्रमाणात तुम्हाला कामाचा ताण जाणवेल. पण, तुम्ही मेहनतीने काम कराल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसेल. तसेच, तुमच्या स्पष्टवक्तेपणाचा इतरांना त्रास होऊ शकतो. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तसेच मित्रांच्या सहकार्याने तुम्ही सर्व कामे अगदी सुरळीत कराल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. जोडीदाराच्या बाबतीत तुमचा आठवडा फार चांगला असणार आहे.
त्याचबरोबर, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करु शकता. पण, कोणाला पैसे देताना सावधानता बाळगा. अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यात तुमच्या कुटुंबीयांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमचं कौटुंबिक वातावरण फार चांगलं असणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा अभ्यासात तुम्हाला अडथळे येऊ शकतात.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे. तुमच्या मेहनतीला चांगलं यश येईल. तसेच, तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण होतील. या आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला पैशांची चणचण भासू शकते. पण, कुटुंबीयांच्या सहकार्याने तुमची ही चिंता दूर होईल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला भरपूर प्रवास करावा लागेल. त्यामुळे तुमची खूप धावपळ होईल. पण, कामात नफा मिळाल्याने तुमचं मन प्रसन्न असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :