Weekly Horoscope 05 August To 11 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 05 August To 11 August 2024 : आठवड्याचा शेवटचा आणि पहिला दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. एकूणच मेष ते कन्या राशीच्या लोकांचा नवीन आठवडा नेमका कसा असेल? जाणून घेऊया साप्ताहिक राशीभविष्य.
Weekly Horoscope 05 August To 11 August 2024 : ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. व्यापारी, व्यावसायिक उत्तम काम करतील. तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्ही साथीच्या आजारांना बळी पडू शकता.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात. आजचं काम उद्यापर्यंत ढकलू नका. तुम्हाला तुमच्या बॉसच्या रागाला बळी पडावं लागू शकतं. या आठवड्यात तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात काही मोठ्या गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल. तुमचे जवळचे मित्र तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. या आठवड्यात तुमच्या प्रियकराला भेटणं कठीण होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात या आठवड्यात सकारात्मक बदल घडू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कोणतीही जबाबदारी सोपावली जाऊ शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुमचा वेळ चांगला जाईल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ असेल. आठवड्याच्या मध्यात सिंह राशीच्या लोकांची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नवीन आठवड्यात तुमच्या व्यवसायात तेजी दिसेल. तुमचं अपूर्ण काम पूर्ण होईल. प्रेम जीवनात आनंद राहील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी सोमवारपासून सुरू होणारा नवीन आठवडा तणावापासून मुक्ती देणारा ठरेल. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल. व्यवसायात तुम्ही मोठी जोखीम घेऊ शकता. तुमची लव्ह लाईफ या काळात छान असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :