एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Weekly Horoscope 05 June to 11 June 2023 : मेष, सिंह, मकर राशीच्या लोकांनी या आठवड्यात 'या' गोष्टी करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 05 June to 11 June 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 05 June to 11 June 2023 : जून महिन्यातील हा आठवडा काही राशींसाठी चांगला तर काही राशींसाठी आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात मेष राशीचे लोक आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवतील, तर मिथुन राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा दिसेल. तूळ राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील, तर, मकर राशीच्या लोकांना कठोर परिश्रम करावे लागतील. एकूणच 12 राशींचा हा आठवडा कसा असणार आहे? यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात. 

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली आहे. तुमच्या नात्यात अधिक जवळीक वाढून तुम्ही कुटुंबीयांकडे आपल्या जोडीदाराबाबत चर्चा करू शकता. आपल्या जोडीदाराची भेट घडवून देऊ शकता. आठवड्याच्या मध्यात तुमच्या खर्चात वाढ होईल. पैशांचा वापर जरा जपून करा. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात, स्वतःची काळजी घ्या. नोकरीत तुमची बाजू चांगली राहील. सर्वजण तुमच्या कामाचं कौतुक करतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही व्यवसायात प्रगती करण्यास सक्षम नसाल. कोणताही निर्णय घेताना तुम्हाला चिंता, तणाव जाणवेल. जोडीदाराबरोबरही वाद होण्याची शक्यता आहे.

वृषभ 

वृषभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या घरातील जबाबदाऱ्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करतील. घरासाठी लागणाऱ्या वस्तू आणतील. तुमचे मन नोकरीत गुंतून राहील. आठवड्याच्या मध्यात नोकरीत बदल होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या नात्याला चांगला वेळ देता येईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत काहींना अस्वस्थ वाटेल. नवीन गुंतवणुकीचा विचार तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. 

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली राहील. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला फार पुढे घेऊन जाईल. प्रत्येक काम मनापासून करण्याची तुमची इच्छा होईल.  भावंडांशी प्रेमाने वागा. आठवड्याच्या मध्यात घरी पूर्ण वेळ द्याल आणि नोकरीतही प्रामाणिकपणे काम कराल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचं उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. या आठवड्यात पोटाच्या संबंधित आजार उद्भवू शकतात.  

कर्क 

कर्क राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात काहीशी मानसिक तणावात जाईल. तुमच्या खर्चात वाढ होईल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात मोठे निर्णय घेणे टाळा. तब्येत बिघडू शकते.

सिंह 

सिंह राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला खूप आनंदी दिसतील. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. कामाच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न चांगले राहील. आठवड्याच्या मध्यात तुमच्या खर्चात वाढ होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात कौटुंबित जीवनात निराशा येईल. व्यवसायासाठी वेळ उत्तम राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहणं गरजेचं आहे.

कन्या 

कन्या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला आनंदी वाटेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर चांगला वेळ घालवाल. तुमचे मनही प्रसन्न राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर दूर प्रवासाला जाण्याचा योग आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्हाला नोकरीत जास्त मेहनत करावी लागेल. कामाचा ताण जास्त राहील. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ

तूळ राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात चांगली असेल. सुरुवातीचा काळ मित्रांबरोबर चांगला जाईल. करिअरमध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. आठवड्याच्या मध्यात अचानक तुम्हाला नोकरी आणि कुटुंबीयांची जास्त काळजी वाटू शकते. नोकरीत परिस्थिती चांगली राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये वैवाहिक जीवनात काही कारणास्तव तणाव वाढू शकतो. तुमचे उत्पन्न चांगले राहील. नोकरीत बदल होऊ शकतो. व्यवसायात लाभ होईल. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्ही कोणत्याही चांगल्या योजनेत गुंतवणूक करू शकता. कुटुंबातील सदस्यांचा पू्र्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. आठवड्याच्या मध्यात प्रवासाला जाण्याचा योग आहे. जे नवीन विवाहित लोक आहे ते एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देतील. या आठवड्यात मित्रांच्या सहकार्याने तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करू शकता. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबाला वेळ देणं गरजेचं आहे. तुमच्या व्यवसायात तुमची प्रगती दिसेल. 

धनु 

धनु राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला प्रकृतीत सुधारणा जाणवेल. तुमचे मन या आठवड्यात अगदी प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यात कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगले नातेसंबंध निर्माण झालेले दिसतील. घरातील वातावरण आनंदी असेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत बाहेर फिरायला जाण्याचा योग येईल. ऑफिसमधील सहकारी खूप सहकार्य करतील.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात थोडी खर्चिक होऊ शकते. त्यामुळे पैशांचा अतिवापर करू नका. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रामाणिकपणा दिसून येईल. इतकेच नाही कर, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमचं कौतुक होईल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला घरगुती जीवनात पूर्ण आनंद मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला चिंता वाटू शकते. अति विचार करणे टाळा.

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांचे आठवड्याच्या सुरुवातीचे दिवस चांगले जातील. यामध्ये तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल. जोडीदाराबरोबर तुमचा व्यवहार सामंजस्याचा असेल. तसेच, एखाद्या धार्मिक ठिकाणालाही भेट द्याल. मात्र, आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतील, परंतु तुमच्या आनंदासाठी हे पैसे खर्च केल्याने तुम्हाला अधिक आनंद मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात स्वतःबद्दल विचार करा. स्वत:चं आत्मपरीक्षण करा. कौटुंबिक जीवनात आनंद असेल पण तुमच्या नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवा.

मीन 

मीन राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या कामात व्यस्त राहतील. कामाच्या ठिकाणी तुमचं योगदान फार मोठं असेल. तुमच्या कामाचं कौतुकही केलं जाईल. पण, त्याचबरोबर कुटुंबाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. आठवड्याच्या मध्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही केलेल्या व्यावसायिक गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. वैवाहिक जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगली संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचे खर्च वाढतील. तसेच तुमची तब्येतही बिघडू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 05 June 2023 : कर्क, धनु, मकर राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  6:30 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
Embed widget