(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virgo Weekly Horoscope : प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती, सगळ्यात मिळणार नशिबाची साथ; कन्या राशीसाठी पुढचे 7 दिवस मजेचे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Virgo Weekly Horoscope 10 June To 16 June : करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कन्या राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Virgo Weekly Horoscope 10 June To 16 June : हिंदू कॅलेंडरनुसार, जून महिन्यातला (June Month) दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा कन्या राशीसाठी नेमका कसा असणार आहे? कन्या राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कन्या राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कन्या राशीची लव्ह लाईफ (Virgo Love Horoscope)
प्रेमाच्या दृष्टीने हा आठवडा शुभ आहे. किरकोळ वाद असूनही नातेसंबंधातील सुखद क्षणांचा आनंद घ्याल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात एकमेकांना साथ द्या. नात्यात अहंकाराचा मुद्दा जास्त वाढू देऊ नका. लव्ह लाईफमधील समस्या शहाणपणाने सोडवण्याचा प्रयत्न करा. नातेसंबंधातील समस्या सोडवण्यासाठी हा आठवडा योग्य राहील. ज्या लोकांचं नातं संपुष्टात येणार होतं त्यांच्या लव्ह लाईफमध्ये या आठवड्यात रोमँटिक टर्न येईल. जोडीदाराशी संबंध दृढ होतील. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवाल. काही लोकांचे पालक लग्नाला मान्यता देऊ शकतात.
कन्या राशीचे करिअर (Virgo Career Horoscope)
या आठवड्यात व्यावसायिक जीवनात कामातील आव्हानं वाढतील. नवीन कामांची जबाबदारी मिळेल. नवीन कल्पनेने सर्व कामं पूर्ण करा. आयटी आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना लक्ष्य पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. परंतु कठोर परिश्रम आणि समर्पणाने केलेलं काम उत्कृष्ट परिणाम देईल. व्यावसायिकांना नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये भरघोस यश मिळेल.
कन्या राशीचे आर्थिक जीवन (Virgo Wealth Horoscope)
आज अनेक उत्पन्नाच्या स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल. काही लोक घरगुती उपकरणं किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणं खरेदी करण्याचा विचार करू शकतात. पैसे वाचवा, यामुळे तुम्हाला कर्जमुक्ती मिळण्यास मदत होईल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत सुरू असलेल्या कायदेशीर वादातून काही लोकांना दिलासा मिळेल. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
कन्या राशीचे आरोग्य (Virgo Health Horoscope)
या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील, पण कामाचा जास्त ताण घेऊ नका. कुटुंबासोबत वेळ घालवाल. तणाव व्यवस्थापन क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा. रात्रीच्या वेळी काळजीपूर्वक वाहन चालवा आणि वाहतूक नियमांचे पालन करा. याशिवाय तंबाखू आणि दारूचं सेवन टाळा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: