(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Leo Weekly Horoscope : 16 जूनपर्यंतचे दिवस सुखाचे; धनलाभासह प्रगतीचे मार्ग मोकळे होणार, वाचा सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य
Leo Weekly Horoscope 10 June To 16 June : करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा सिंह राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Leo Weekly Horoscope 10 June To 16 June : हिंदू कॅलेंडरनुसार, जून महिन्यातला (June Month) दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा सिंह राशीसाठी नेमका कसा असणार आहे? सिंह राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा सिंह राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Horoscope)
या आठवड्यात तुमच्या जोडीदाराशी तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करा. काही लोकांना नात्यात किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. लव्ह लाईफमधील समस्या हुशारीने सोडवा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी अनावश्यक वाद टाळा. सिंह राशीच्या अविवाहितांसाठी हा आठवडा भाग्यवान ठरेल. येत्या काही दिवसात तुम्हाला कोणी खास व्यक्ती भेटू शकते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रपोज केलं तर सकारात्मक प्रतिसादही मिळेल.
सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)
व्यावसायिक जीवनात अनावश्यक वादविवादांपासून दूर राहा. कार्यालयीन राजकारणात पडू नका. या आठवड्यात कलाकार, संगीतकार, अभिनेते, डिझायनर, राजकारणी, चित्रकार आणि कॉपी रायटर यांना करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. क्लायंट हाताळताना आव्हानं येऊ शकतात, पण धीर धरा. या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. त्याच वेळी, आयटी, हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांचं वेळापत्रक खूप व्यस्त असेल.
सिंह राशीचे आर्थिक जीवन (Leo Wealth Horoscope)
उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल. काही लोक नवीन मालमत्ता किंवा घर घेण्याचा विचार करू शकतात. व्यावसायिकांना निधी गोळा करण्यात अडचणी येऊ शकतात, परंतु ग्राहक तुम्हाला आर्थिक मदत करू शकतो. परदेशातील ग्राहकही तुम्हाला आर्थिक मदत करतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)
या आठवड्यात किडनीच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं. काही लोकांना उच्च रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉलची समस्या असू शकते. आरोग्यदायी सवयी अंगीकारा. दररोज योग आणि ध्यान करा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. नकारात्मकतेपासून दूर राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: