एक्स्प्लोर

Virgo March Horoscope 2024 : कन्या राशीसाठी मार्च महिना आर्थिकदृष्ट्या समृद्ध; नोकरीत मिळेल बढती, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Virgo Monthly Horoscope March 2024: कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च महिना कसा राहील? मार्च महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा कन्या राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.

Virgo March Horoscope 2024 : कन्या (Virgo) राशीच्या लोकांसाठी मार्च महिना (Virgo March 2024 Horoscope) खूप चांगला असणार आहे. विशेषत: नोकरीशी संबंधित लोकांना या महिन्यात लाभ मिळेल. या महिन्यात तुमच्या पगारवाढ किंवा बढतीचीही शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांनाही त्यांच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला असेल. कामानिमित्त केलेला प्रवास फलदायी ठरेल. या काळात आपल्या आरोग्याची आणि आहाराची काळजी घ्या.

कन्या राशीच्या लोकांसाठी व्यवसायिक, शैक्षणिक आणि कौटुंबिकदृष्ट्या मार्च महिना कसा असेल? सविस्तरपणे जाणून घेऊया.

कन्या राशीचे करिअर (Virgo Job Career Horoscope March 2024)

मार्च महिन्यात कामाच्या संदर्भात केलेले प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात कामाच्या ठिकाणी तुमचे काही नवीन मित्र बनतील, जे तुम्हाला भविष्यात उपयोगी पडतील.

14 ते 25 मार्च दरम्यान सिंह राशीच्या सप्तम भावात बुधादित्य योग तयार होत असल्याने पदोन्नतीसोबतच नोकरदारांच्या पगारातही वाढ होऊ शकते.

7 मार्च ते 30 मार्चच्या काळात शुक्र-शनिच्या युतीमुळे तुमच्यासाठी नवीन नोकरीचे दरवाजेही उघडू शकतात.

14 मार्चपासून काही दिवस तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो, परंतु तरीही हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला राहील. 15 मार्चपासून अंगारक दोष असल्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणची काही माणसं अधिकाऱ्यांना तुमच्याविरुद्ध भडकावू शकतात, त्यामुळे त्यांच्यापासून सावधगिरी बाळगा. 

विद्यार्थ्यांसाठी महिना कसा? (Student Monthly Horoscope March 2024)

मार्च महिन्यात उच्च शिक्षण आणि संशोधनाशी संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. साहित्य आणि तांत्रिक क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी काळ अतिशय अनुकूल राहील. 14 ते 25 मार्च दरम्यान सप्तम भावात बुधादित्य योग असल्याने उच्च शिक्षण, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. सरकारी परीक्षांमध्ये तुम्ही चांगलं यश मिळवू शकता. जर तुम्ही वेळेचं योग्य व्यवस्थापन केलं, तर परीक्षेची तयारी करणं सोपं जाईल आणि तुम्हाला तणाव जाणवणार नाही.

कन्या राशीचं मार्चमधील आरोग्य आणि प्रवास जीवन (Virgo Health And Travel March 2024)

नवीन महिन्यात तुम्हाला सांधेदुखी, डोळ्यांच्या समस्या आणि पोटाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. निष्काळजीपणा आणि कामाच्या ताणामुळे आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. कामानिमित्त तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावं लागू शकतं, या दरम्यान काळजी घ्या. 15 मार्चपासून सहाव्या भावात मंगळ आणि शनीचा अंगारक दोष असेल, त्यामुळे या काळात गाडी चालवताना काळजी घ्या. दुखापत होण्याची शक्यता आहे.

कन्या राशीसाठी उपाय (Virgo Remedies March 2024)

8 मार्च, महाशिवरात्री :- शंकराला फुलं अर्पण करुन “ओम ओंकाराय नमः” या मंत्राचा जप करा.

24 मार्च, होळी :- होलिका दहनात 3 जायफळ आणि 3 काळी मिरी घाला. दुसऱ्या दिवशी 11 चिमूट होलिका दहनाची राख घरी आणून कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. तुम्हाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Leo March Horoscope 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च महिना समस्यांचा? वादांपासून राहा दूर, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget