Leo March Horoscope 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च महिना समस्यांचा? वादांपासून राहा दूर, मासिक राशीभविष्य जाणून घ्या
Leo Monthly Horoscope March 2024: सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च महिना कसा राहील? मार्च महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा सिंह राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.

Leo March Horoscope 2024 : सिंह (Leo) राशीच्या लोकांसाठी मार्च महिना चांगला असणार आहे.परंतु, तुम्हाला वादांपासून दूर राहावं लागेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागेल, पण महिन्याच्या शेवटी तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि सर्वकाही ठीक होईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाईल. तुमचं आरोग्य मार्च महिन्यात बिघडू शकतं.
सिंह राशीच्या लोकांसाठी व्यवसायिक, शैक्षणिक आणि कौटुंबिकदृष्ट्या मार्च महिना कसा असेल? सविस्तरपणे जाणून घेऊया.
सिंह राशीचे करिअर (Leo Job Career Horoscope March 2024)
नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात थोडं सावध राहावं लागेल. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांसोबत वाद घालणं टाळा. मार्च महिन्यत कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.
14 मार्चपासून आठव्या भावात सूर्य-राहूचा ग्रहण दोष असल्याने महिन्याच्या मध्यात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात वरिष्ठ तुमच्यावर अधिक लक्ष ठेवतील. सहकारी तुम्हाला एखाद्या वादाच्या परिस्थितीत ढकलू शकतात. तुम्ही कार्यालयीन राजकारणाचे बळी होऊ शकता. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहून विचारपूर्वक पाऊलं उचलावी लागतील.
14 ते 25 मार्च दरम्यान आठव्या भावात बुधादित्य योग तयार होत आहे, त्यामुळे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला अद्भूत यश मिळेल.
31 मार्चपासून शुक्र सिंह राशीच्या आठव्या भावात उच्चस्थानी असेल, त्यामुळे महिन्याच्या शेवटी तुम्ही तुमची कामं सुरळीत पार पाडाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळेल.
विद्यार्थ्यांसाठी महिना कसा? (Student Monthly Horoscope March 2024)
14 मार्चपर्यंत नवव्या भावात मंगळ असल्यामुळे तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती क्षमता कमी होईल, त्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुम्ही अभ्यासासाठी विशेष वेळ काढावा. कठोर परिश्रम आणि नियमित अभ्यासामुळे तुमचे चांगले दिवस पुन्हा सुरू होतील आणि लोक तुमच्या यशाकडे बघून प्रभावित होतील. 14 ते 26 मार्च दरम्यान बुधादित्य योग बनत असल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्यांना या काळात चांगली संधी मिळेल आणि अभ्यासात यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती होईल.
सिंह राशीचं मार्चमधील आरोग्य आणि प्रवास जीवन (Leo Health And Travel March 2024)
7 ते 25 मार्च या काळात आठव्या भावात बुध-राहूचा जडत्व दोष निर्माण होत आहे, त्यामुळे प्रवास करताना वाहन जपून चालवावं, अन्यथा दुखापत होऊ शकते. जुनाट आजारांनी त्रस्त लोकांना अधिक काळजी घ्यावी लागेल. काही लोकांना झोप न लागणं आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहणं तुम्हाला महागात पडू शकतं.
सिंह राशीसाठी उपाय (Leo Remedies March 2024)
8 मार्च, महाशिवरात्री :- फळांचा रस पाण्यात मिसळून शंकराच्या पिंडीला अर्पण करा. मिठाई अर्पण करा. “ओम नंदेश्वराय नमः” या मंत्राचा जप करा .
24 मार्च, होळी :- होळीच्या दिवशी होलिकां दहनात 250 ग्रॅम जव अर्पण करा. दुसऱ्या दिवशी 5 चिमूट होलिका दहन भस्म कपड्यात गुंडाळून घरी आणा, यामुळे तुमचं आरोग्य तंदुरुस्त राहील आणि रोगांपासून सुटका होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
