एक्स्प्लोर

Vat Purnima Wishes : वटपौर्णिमेच्या तुमच्या जोडीदाराला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश

Vat Purnima Wishes In Marathi : दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो, या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी उपवास करतात. या पवित्र दिवशी नवरा-बायको एकमेकांना हे खास संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकतात.

Vat Purnima Wishes 2024 In Marathi : वटपौर्णिमेचे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला केले जाते. या दिवशी सुवासुनी स्त्रिया उपवास करुन आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सावित्रीने सत्यवानाचे प्राण पुन्हा आणण्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली होती, तेव्हा यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. तेव्हापासून ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्रीचं व्रत केलं जातं आणि सात जन्म हाच नवरा मिळावा, अशी प्रार्थना केली जाते. या पवित्र दिवशी नवरा-बायको एकमेकांना हे प्रेमळ संदेश पाठवून खास शुभेच्छा (Vat Purnima Wishes In Marathi) देऊ शकतात.

वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश (Vat Purnima Wishes In Marathi)

सण सौभाग्याचा.. बंध अतूट नात्याचा...
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वडाला बांधते सुताचा धागा,
सात जन्म तुच राहाशील मनात माझ्या
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू,
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावास तू…
वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

सात जन्माचे नाते, साथ देईन कायम हे वचन,
वटपौर्णिमेचे व्रत करीन, तुझ्या प्रेमाची ओढ कायम
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

दीर्घायुष्य लाभो तुला
वडाच्या झाडाइतका
सहवास लाभो मला
जन्मोजन्मी तुच मला मिळावा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

दोन क्षणाचे असते भांडण
सात जन्माचे असते बंधन
कितीही आले जरी संकट
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 

नात्यात गुंफले प्रेमाचे धागे,
जबाबदारीने आणि संसार फुले,
वडाला बांधून दोरे
साथ अशीच राहू दे
हेच माझं स्वप्न
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सौभाग्याचा सण,
अतूट नात्याचे बंध,
या शुभदिनी पूर्ण होवो
तुझ्या सगळ्या इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सात जन्माचे नाते,
साथ देईन कायम हे वचन,
वटपौर्णिमेचे व्रत करीन,
तुझ्या प्रेमाची ओढ कायम
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

एक फेरा आरोग्यासाठी,
एक फेरा प्रेमासाठी,
एक फेरा यशासाठी,
एक फेरा दीर्घायुष्यासाठी,
एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी,
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  

विचार आधुनिक आपले जरी,
श्रद्धा असो देवावर आपली,
करण्या रक्षण सौभाग्याचे 
करूया वटपौर्णिमा साजरी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्येष्ठ पौर्णिमेच्या अर्थात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

बंध अतूट नात्याचे,
बंध प्रेमाचे,
सण सौभाग्याचा,
सण अलंकाराचा,
या मंगलदिनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत,
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वडाच्या झाडासारखे आपले नाते दीर्घायुष्यी असावे,
जन्मोजन्मी फक्त तुझीच सोबत असावी...
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सावित्रीच्या निष्ठेचे फळ,
बांधूया आपल्या नात्याचे दर्पण,
करेन तुझ्यासाठी साता जन्माचे समर्पण...
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सुख-दु:खात राहू सोबत कायम
जन्मोजन्मीची बांधूया गाठ
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

साता जन्माची गाठ बांधून झाले पावन मी,
नेहमी सोबत आनंदी राहो आपण सहजीवनी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा:

Vat Purnima 2024 : यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी जुळून आले 4 दुर्मिळ योग; सुवासिनींना मिळणार व्रताचा दुप्पट लाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
Baby John : बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake Beed Entry : लक्ष्मण हाकेंच्या स्वागतासाठी 11 जेसीबी! मुंडेंच्या परळीत वाजत गाजत स्वागतABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 27 June 2024Mira Road Bars : मिरा रोडमध्ये बारवर कारवाई, पालिकेकडून करेक्ट कार्यक्रमShivraj Bangar : कुंडलिक खांडेंमुळे मी शिवसेना सोडली, व्हायरल क्लिपनंतर बांगर म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
Baby John : बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Ajit Pawar: राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष, पण...; वरिष्ठांनी कान टोचताच अजित पवारांना बाहेर काढा म्हणणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा यू-टर्न
राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष, पण...; वरिष्ठांनी कान टोचताच अजित पवारांना बाहेर काढा म्हणणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा यू-टर्न
अखेर पंकजा मुंडेंना गुलाल लागणार?; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपकडून 3 पराभूत नेत्यांना संधी
अखेर पंकजा मुंडेंना गुलाल लागणार?; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपकडून 3 पराभूत नेत्यांना संधी
NEET : लातुरात सापडलेली अॅडमिट कार्ड बिहारच्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांकडून घोटाळा होणाऱ्या सेंटरची निवड 
लातुरात सापडलेली अॅडमिट कार्ड बिहारच्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांकडून घोटाळा होणाऱ्या सेंटरची निवड 
भारत-इंग्लंड सामन्यात पावसाचं संकट, दोन तासांपासून उघडझाप सुरुच, नाणेफेकीला उशीर
भारत-इंग्लंड सामन्यात पावसाचं संकट, दोन तासांपासून उघडझाप सुरुच, नाणेफेकीला उशीर
Embed widget