(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : 'या' 3 वस्तूंमुळे घरात येते कंगाली; कायमचा लागतो वास्तूदोष, आजच घराबाहेर काढून टाका
Vastu Tips : वास्तूशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींमुळे घराच्या सुख-शांती, समृद्धीत चांगली वाढ होते. पण, जर घरात वारंवार समस्या वाढतायत तर काही गोष्टी घरातून बाहेर काढणं गरजेचं आहे.
Vastu Tips : ज्योतिष शास्त्राप्रमाणेच वास्तुशास्त्रालाही (Vastu Tips) विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. वास्तूशास्त्रात (Vastu Shastra) सांगितलेल्या गोष्टींमुळे घराच्या सुख-शांती, समृद्धीत चांगली वाढ होते. पण, जर घरात वारंवार समस्या वाढतायत तर काही गोष्टी घरातून बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. त्यामुळे घरातील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे दारिद्र्य वाढते ते जाणून घेऊयात.
1. गंज लागलेल्या वस्तू घरात ठेवू नका
वास्तूशास्त्रानुसार, घरात गंज लागलेल्या वस्तू ठेवल्याने घराला वास्तूदोष लागतो. जर तुमच्या घरात गंज लागलेल्या वस्तू असतील तर त्या आत्ताच बाहेर काढा. यामध्ये गंजलेलं लोखंड, दरवाजा, टाळा-चावी आणि तव्याशिवाय कोणतीही गंज लागलेली वस्तू असल्यास ती लगेच घराबाहेर काढा. यामुळे घरातील सुख-शांती निघून जाते.
2. बंद घड्याळ
घरात चुकूनही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये. बंद घड्याळ घातल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. वास्तूशास्त्रानुसार, बंद घड्याळ अशुभ मानलं जातं. यामुळे आर्थिक समस्या देखील वाढतात. तसेच, कोणाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून देखील घड्याळ देऊ नये असं म्हणतात. यामुळे नात्यात कायमचा दुरावा निर्माण होतो.
3. घरात विनाकारण कचरा ठेवू नका
या व्यतिरिक्त घराच्या छपरावर किंवा गच्चीवर पत्र्याच्या वस्तू ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा संचारते. तसेच, घरात दारिद्र्य वाढते. घरातील सदस्य अचानक आजारी पडतात. त्याचप्रमाणे, घरात धूळ आणि घाण देखील साचलेली असेल तरीदेखील त्याचा तुमच्या वास्तूवर परिणाम होतो. त्यामुळेच तुमचं घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रय्तन करा. स्वच्छ घरात देवी लक्ष्मीचा वावर असतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: