(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : तब्बल 12 वर्षांनंतर बुध आणि गुरुने बनवला समसप्तक राजयोग; 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, चौफेर धनलाभाचे संकेत
Samsaptak Rajyog 2024 : बुध आणि गुरु वक्री स्थितीत समोरासमोर आले आहेत, ज्यामुळे समसप्तक राजयोगाची निर्मिती होत आहे. याचा 3 राशींच्या लोकांना बंपर लाभ होणार आहे.
Samsaptak Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांपैकी बुध आणि गुरूला विशेष महत्त्व आहे. अशात ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. सध्या गुरू वृषभ राशीमध्ये वक्री स्थितीत आहे. दुसरीकडे, बुध वृश्चिक राशीत वक्री झाला आहे. अशा स्थितीत गुरू आणि बुध हे दोन्ही ग्रह उलट चालीत फिरत आहेत. दुसरीकडे दोघेही एकमकेांच्या समोर आहेत, त्यामुळे समसप्तक राजयोगाची निर्मिती झाली आहे. ज्यामुळे काही राशींचं नशीब उजळू शकतं. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
या राशीमध्ये गुरु मजबूत स्थितीत आहे. यासोबतच बुध ग्रहाच्या स्थितीमुळे या राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो. गुरू-बुध मागे गेल्यानंतरही प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्रातही तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. इतर लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. त्यामुळे करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी आता संपुष्टात येऊ शकतात. तुमचे काम पाहून वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी तुमची प्रशंसा करतील. आर्थिक परिस्थिती खूप मजबूत असणार आहे. वैवाहिक जीवन चांगले जाईल.
सिंह रास (Leo)
आर्थिक लाभाचा स्वामी बुध या राशीच्या चौथ्या भावात स्थित आहे. यासोबतच गुरू दहाव्या घरात प्रतिगामी आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होणार आहे. समसप्तक राजयोग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळून बढती मिळू शकते. तुम्ही तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळवू शकता. तुमच्या कामाचे कौतुक होईल. पगारवाढीसह पदोन्नतीची शक्यता आहे. नात्यात गोडवा येईल. दशम भावात गुरुची उपस्थिती तुमच्या जीवनात अनेक आनंद आणू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतूनही तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी समसप्तक राजयोग देखील खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या अनुभवामुळे तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल, ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतो. उत्पन्नात लक्षणीय सुधारणा होणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: