Vastu Tips : पोळपाट लाटण्याशी संबंधित 'या' गोष्टी तुम्हाला टाकतील दारिद्र्यात; भासेल आर्थिक चणचण
Vastu Tips : पोळपाट-लाटणं खरेदी करताना किंवा वापरताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे, हे वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. चुकीच्या पद्धतीने पोळपाट-लाटणं वापरल्यास वास्तुदोष निर्माण होतात, ते नेमके कसे? जाणून घ्या.
Vastu Tips : वास्तूशास्त्रात घरातील प्रत्येक गोष्टीचे नियम सांगण्यात आले आहेत. कोणत्या गोष्टींमुळे घरात सुख-समृद्धी नांदते आणि कोणत्या गोष्टींमुळे घरात अनेक अडचणी निर्माण होतात हे वास्तूशास्त्र सांगते. स्वयंपाकघरात पोळ्या लाटण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पोळपाट लाटण्याबद्दलही काही तसंच आहे. स्वयंपाकघरात दररोज वापरण्यात येणारी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे पोळपाट-लाटणं. हेच पोळपाट-लाटणं तुमच्या गरिबीचं किंवा श्रीमंतीचं कारण ठरू शकतं, असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.. पण होय, वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) स्वयंपाकघरात पोळपाट लाटण्याचा योग्य वापर केल्यास घरातील समृद्धी वाढते.
पण जर तुम्ही हेच पोळपाट-लाटणं चुकीच्या पद्धतीने वापरलं तर घरात गरिबी येते. पोळपाट लाटण्यासंबंधित छोट्यातल्या छोट्या चुका देखील वास्तुदोष निर्माण करू शकतात हे लक्षात ठेवा. काही महिला पोळपाट-लाटण्याशी संबंधित काही क्षुल्लक चुका करतात, ज्यामुळे घरात आर्थिक चणचण भासते आणि घरात कधी पैसा टिकत नाही. मग पोळपाट-लाटणं वापरताना कोणत्या चुका टाळाव्या? जाणून घेऊया.
पोळपाट-लाटणं वापरताना टाळा 'या' चुका
1. वास्तु शास्त्रानुसार, जर पोळी बनवताना पोळपाट आवाज करत असेल तर वास्तु दोष निर्माण होतो. पोळपाटाच्या आवाजामुळे घरात पैसा टिकत नाही, धन हानी होते, असं म्हटलं जातं. त्यामुळे जर तुमच्याही पोळपाटाचा आवाज येत असेल तर तो लगेच बदला आणि दुसरा पोळपाट विकत घ्या. तेही करायचं नसेल, तर पोळी लाटताना पोळपाटाखाली कापड आथरू शकता, यामुळे वास्तुदोष नाहीसा होतो.
2. रात्री झोपण्यापूर्वी पोळपाट-लाटणं स्वच्छ धुवून ठेवावं. पोळ्या झाल्याबरोबरच पोळपाट-लाटणं धुतलं तर अति उत्तम. पोळपाट-लाटणं वापरल्यानंतर प्रत्येक वेळी ते स्वच्छ करावं. असं न केल्यास घरातील लोकांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि अर्धा पैसा आजारावर खर्च होतो.
3. तुम्ही नेहमी चांगल्या स्थितीतील पोळपाट-लाटणं वापरलं पाहिजे. तुटलेलं पोळपाट-लाटणं वापरू नका, यामुळे वास्तु दोष निर्माण होतात आणि यामुळे घरात भांडणं देखील वाढतात.
4. वास्तु शास्त्रानुसार, आठवड्यातील ठराविक दिवसांमध्ये पोळपाट-लाटणं खरेदी करू नये. मंगळवारी आणि शनिवारी पोळपाट लाटणं खरेदी करणं टाळावं. बुधवारी पोळपाट-लाटणं खरेदी करणं शुभ मानलं जातं. मंगळवारी आणि शनिवारी पोळपाट लाटणं खरेदी करणं कुटुंबासाठी शुभ मानलं जात नाही.
5. वास्तु शास्त्राप्रमाणे पोळपाट कधीही उलटा करुन ठेवू नये, नाहीतर घरात वास्तु दोष निर्माण होतो. या व्यतिरिक्त पोळपाट कधीही पिठाच्या डब्यावर ठेवू नये, यामुळे तुमच्या घरात पैसा टिकत नाही. घरात वाद देखील वाढतात. बऱ्याच महिलांनी चपात्या लाटल्यानंतर पिठाच्या डब्यावर पोळपाट ठेवण्याची सवय असते, परंतु यामुळे दारिद्र्य येते, हे लक्षात घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :