vastu tips : पोपटाचे चित्र कसे बदलेल तुमचे भाग्य?
vastu tips : वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पोपट पाळल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, तर दुसरीकडे वास्तूनुसार घरात पोपटाचे चित्र लावणे फायदेशीर ठरते.

vastu tips : घरातील वास्तू बरोबर नसेल तर सर्व सुख-शांती हिरावून घेतली जाते. प्रत्येक पावलावर दोन-चार नव्या समस्यांना तोंड द्यावे लागते. नकारात्मकता आजूबाजूला पाय पसरत असते. अशावेळी काय करावे ते समजत नाही. अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे आपण या त्रासातून बाहेर पडू शकतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पोपट पाळल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, तर दुसरीकडे वास्तूनुसार घरात पोपटाचे चित्र लावणे फायदेशीर ठरते. घरामध्ये पोपटाचे चित्र योग्य दिशेला लावल्यास समस्यांपासून बऱ्याच अंशी सुटका होऊ शकते, कारण पोपटाच्या चित्रामुळे घरात सुख-समृद्धी येते.
अशा प्रकारे घरात पोपटाचे चित्र लावा
घरातील एखादी व्यक्ती आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असेल तर घरात पोपटाचे चित्र किंवा मूर्ती लावा.
खेळकरपणामुळे मुलाचे मन अभ्यासात गुंतत नसेल तर त्याच्या खोलीच्या उत्तर दिशेला पोपटाचे चित्र लावावे. अभ्यास करताना मुलाचे तोंड उत्तर दिशेकडे असावे.
जर तुमच्या नात्यात प्रेमाची कमतरता असेल तर बेडरुममध्ये पोपट जोडप्याचे चित्र किंवा पुतळा लावा, यामुळे नाते आणखी घट्ट होईल.
उत्तर दिशा दोषांपासून मुक्त ठेवण्यासाठी या दिशेला पोपटाचे चित्र लावा, यामुळे व्यवसायातही प्रगती होईल.
घरात पोपटाचे चित्र लावल्याने कुटुंबात प्रेम वाढते आणि दुरावा राहत नाही.
घरामध्ये नेहमी निराशा आणि गरिबी असेल तर ड्रॉईंग रूममध्ये उत्तर दिशेला पोपटाचे चित्र किंवा पुतळा ठेवा.
रंगीबेरंगी पिसे असलेले पोपटाचे चित्र घरातील पाच घटकांचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे पोपटाचे चित्र जरूर लावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
