Vastu Tips : घरात कोळ्याचं जाळं असणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...ते जाणून घ्या
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, कोळ्याच्या जाळ्यामुळे नकारात्मकता येते. याबरोबरच कोळ्याचे जाळे स्वच्छ न केल्यास घरातील सदस्यांना मानसिक तणाव, चिंता आणि अशांतीचा सामना करावा लागतो.
![Vastu Tips : घरात कोळ्याचं जाळं असणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...ते जाणून घ्या Vastu Tips know the vastu shastra of spiders web marathi news Vastu Tips : घरात कोळ्याचं जाळं असणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...ते जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/26/923f90c403c0310d91b50278bdce6e77_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vastu Tips : वास्तूशास्त्रात (Vastu Tips) अनेक नियम पाळणं फार गरजेचं आहे. वास्तूशास्त्राच्या (Vastu Shastra) नियमांनुसार, घरात एखादी वस्तू असल्यास किंवा ठेवल्यास त्याचे सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम मिळतात. तसेच, घरात साडेसाती सुरु होते. त्यामुळे, वास्तूशास्त्राचे नियम समजून घेणं, त्याची दिशा आणि शुभ, अशुभ परिणाम समजून घेणं फार गरजेचं आहे.
अनेक अडचणींचा सामना करावा लागतो
वास्तूचे नियम पाळले नाहीत तर वास्तूदोष होतो. घरात राहणाऱ्या सदस्यांना वास्तूदोषांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. घरातील स्वच्छतेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. असं म्हणतात की, ज्या घरात स्वच्छता असते, तिथे देवी लक्ष्मी वास करते. तसेच घरातील आर्थिक समस्याही दूर होते.
घरात नकारात्मकता येते
आपल्याला अनेकदा घरांमध्ये कोळ्याचे जाळे दिसतात. वास्तूशास्त्रानुसार, स्पायडर वेबमुळे घरात नकारात्मकता येते. याबरोबरच कोळ्याचे जाळे स्वच्छ न केल्यास घरातील सदस्यांना मानसिक तणाव, चिंता आणि अशांतीचा सामना करावा लागतो.
वास्तूशास्त्रानुसार घराच्या कोपऱ्यात कोळ्याचे जाळे ठेवल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
पूजेच्या खोलीत कोळ्याचं जाळं दिसणं
जर तुमच्या पूजेच्या खोलीत स्पायडर वेब असेल तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नकारात्मकतेचा तसेच अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घराच्या मंदिरात कोळ्याचे जाळे असल्यास ते लगेच स्वच्छ करा असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय.
स्वयंपाकघरात कोळ्याचं जाळं असल्यास...
वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात कोळ्याचे जाळे लावल्यास घरावर रोगांची सावली राहते. घरातील एक किंवा दुसरा सदस्य नेहमी आजारी राहतो. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात कोळ्याचे जाळे असल्यास ते त्वरित स्वच्छ करावे.
बेडरूममध्ये कोळ्याचं जाळं दिसल्यास
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कोळ्याच्या जाळ्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत पती-पत्नीमध्ये नेहमी मतभेद होतात.
त्यामुळे वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, पूजेच्या खोलीत, बेडरूममध्ये तसेच, स्वयंपाकघरात जर कोळ्याचं जाळं दिसत असेल तर ते लगेच काढून टाका. अन्यथा घरात नकारात्मकता पसरायला वेळ लागणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shy People Effect : अत्यंत हुशार, स्वभावाने शांत आणि चांगले श्रोते असतात 'या' राशींचे लोक; फक्त इतरांसमोर आपलं म्हणणं यांना करता येत नाही व्यक्त
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)