(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : घरातील वास्तुदोष दूर करायचा आहे? लावा हे फोटो
vastu tips : वास्तूनुसार तुमच्या स्वप्नातील घर शिस्तबद्ध पद्धतीने सजवल्याने घराचे सौंदर्य वाढते. त्याच बरोबर त्या घरात राहणाऱ्या लोकांवरही त्याचा परिणाम होतो.
Vastu Tips : एखाद्या घरात वास्तुदोष असेल तर त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या वागण्यात चिडचिडेपणा येतो. त्या घरात मारामारीचे वातावरण असते. घरात अनास्था पसरते. आर्थिक सुबत्ता असूनही लोकांच्या चेहऱ्यावर दुःख दिसून येते. चेहरा आनंदी दिसत नाही. वास्तूनुसार तुमच्या स्वप्नातील घर शिस्तबद्ध पद्धतीने सजवल्याने घराचे सौंदर्य वाढते. त्याच बरोबर त्या घरात राहणाऱ्या लोकांवरही त्याचा परिणाम होतो.
सूर्यफुलाचे फोटो
ज्या घरात वास्तुदोष असतो त्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढतच राहते. लोकांमधील जोश आणि उत्साह ओसरतो. अशा स्थितीत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सूर्यफुलाच्या फुलाचा फोटो लावल्यास घरातील दु:ख दूर होते. घरात सकारात्मक ऊर्जा संचारते
राधा कृष्णाचा फोटो
ज्या घरात पती-पत्नीमध्ये भांडणे होतात. त्या घरात आर्थिक सुबत्ता कधीच येत नाही. तेथील वातावरण खूप प्रदूषित होते. अशा परिस्थितीत पती-पत्नीमधील प्रेम आणि सौहार्द वाढवण्यासाठी वास्तुनुसार बेडरूममध्ये राधाकृष्णाचे फोटो लावणे फायदेशीर ठरते.
कामधेनू गाय
कामधेनू गाईचे फोटो सुख, शांती आणि समृद्धी वाढवण्यासाठी, व्यवसाय वाढीसाठी आणि नोकरीत बढतीसाठी कामधेनूचे घरात लावणे फायदेशीर ठरते. वास्तुनुसार कामधेनूसोबत वासराचे चित्र लावल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते. तेथे सकारात्मक ऊर्जा संचारते. दु:ख घरातून पूर्णपणे निघून जाते आणि घरात शांतता राहते. त्यामुळे घरात कामधेून गाईचा फोटो लावावा असे म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या