(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips For Home : उलट्या चपला, उपडी भांडी आणि बरंच काही; घरात चुकूनही 'या' गोष्टी चुकीच्या पद्धतीने ठेवू नका
Vastu Tips For Home : उलट्या ठेवलेल्या चपला घरात वादविवाद निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात.
Vastu Tips For Home : असं म्हणतात की, घरातील प्रत्येक वास्तू वास्तूशास्त्रानुसार (Vastu Shastra) ठेवली तर आपल्या आयुष्यात एक प्रकारे सकारात्मकता येते. वास्तूशास्त्रानुसार, अनेक गोष्टी शुभ-अशुभ ठरविल्या जातात. वास्तूशास्त्राच्या अशुभ परिणामांनी पैशांची कमतरता भासते. तर, काहींना आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. त्याचबरोबर वास्तूशास्त्रात (Vastu Tips) अशाही काही गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे ज्या घरात चुकूनही उलट्या ठेवू नयेत. अन्यथा, तुमच्या आयुष्यात अनेक समस्या वाढू शकतात. या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
घरात वादविवाद वाढू लागतात
घरात जर चुकून तुम्ही बूटं, चपला उलट्या ठेवल्या तर घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून तुम्हाला ओरडा पडलेला आठवला असेलच. असं म्हणतात की, उलट्या ठेवलेल्या चपला घरात वादविवाद निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर काही मान्यतेनुसार, असे केल्याने लक्ष्मी देवी देखील नाराज होते. त्यामुळे जर कधीही चुकूनही तुमच्याकडून बूटं, चपला उलट्या ठेवल्या असतील तर त्या नीट ठेवल्या पाहिजेत या गोष्टीची काळजी घ्या.
घरात 'या' गोष्टींमुळे सुरु होते साडेसाती
आपल्या घरातील हॉल, किचन, देवघराप्रमाणेच बाथरूममध्ये देखील वास्तू नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. तुमच्या बाथरूममधील बादलीसुद्धा चुकूनही उलटी ठेवू नका. तसेच, ती कधी रिकामी ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होऊ शकतो. जरी तुमच्या वापरात या वस्तू नसतील तरी त्यात थोडे पाणी भरून ठेवा.
स्वयंपाकघरासंबंधी वास्तू नियम
काही लोकांना स्वयंपाकघरातील भांडी उपडी ठेवण्याची सवय असते. वास्तूशास्त्राच्या नियमांनुसार, स्वयंपाकघरात तवा हा कधीच उपडी ठेवू नये. अन्यथा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. तसेच, घरातील व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर घरातील कढईसुद्धा कधी उलटी ठेवू नये. वास्तूशास्त्रानुसार, यामुळे देखील घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: