Vastu Tips : घरात चुकूनही डस्टबिन या दिशेला ठेवू नका, होतील वाईट परिणाम
Vastu Tips : वास्तूनुसार घरात एखादी वस्तू कोणत्या दिशेला ठेवली जाते त्याचा घरातील अनेक गोष्टींवर खूप प्रभाव पडतो. वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट दिशा निश्चित केलेली आहे.
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते असे म्हटले जाते. वास्तूनुसार घरात एखादी वस्तू कोणत्या दिशेला ठेवली जाते त्याचा घरातील अनेक गोष्टींवर खूप प्रभाव पडतो. वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट दिशा निश्चित केलेली आहे. वास्तूचे हे नियम पाळले नाहीत तर घरातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. घरामध्ये कोणतीही वस्तू योग्य दिशेने न ठेवण्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. वास्तूमध्ये डस्टबिनची देखील निश्चित दिशा आणि स्थानही निश्चित करण्यात आले आहे. वास्तूनुसार घरात ठेवलेली डस्टबिन योग्य ठिकाणी नसेल तर त्याचा नकारात्मक परिणाम घरातील सदस्यांवर होतो. घरातील सदस्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तुनुसार डस्टबिन कोणत्या दिशेला असावी हे जाणून घेऊया.
Vastu Tips : चुकूनही या दिशेला डस्टबिन ठेवू नका
वास्तूनुसार डस्टबिन विशिष्ट दिशेला अजिबात ठेवू नये. विशेषतः उत्तर-पूर्व दिशेला कधीही ठेवू नका. ईशान्य दिशा ही देवतांची दिशा मानली गेली आहे. या दिशेला डस्टबिन ठेवल्याने घरातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे घरात वास्तुदोष होऊ शकतो. त्याच्या प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. याशिवाय डस्टबिन पूर्व, आग्नेय आणि उत्तर दिशेला ठेवू नये. यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे डस्टबिन नेहमी योग्य दिशेलाच ठेवली पाहिजे. वास्तुशास्त्रात डस्टबिन कोणत्या दिशेला ठेवावी हे देखील सांगण्यात आलेआहे.
Vastu Tips : डस्टबिन ठेवण्यासाठी योग्य दिशा
डस्टबिन ठेवण्याची विशेष दिशा वास्तुशास्त्रात दिली आहे. यानुसार डस्टबिन नेहमी घराच्या आत असावी. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य किंवा उत्तर-पश्चिम दिशेला डस्टबिन ठेवणे शुभ असते. कचरा विसर्जनासाठी हे निर्देश योग्य मानले गेले आहेत. वास्तूमध्ये या दिशेला डस्टबिन ठेवणे चांगले म्हटले आहे. याशिवाय डस्टबिन उत्तर-पश्चिम दिशेलाही ठेवता येईल. या दिशेला डस्टबिन ठेवल्याने वास्तुदोष होत नाहीत. त्यामुळे गस्टबिन कायम योग्य दिशेलाच ठेवा. यामुळे तुमच्या घरातील वातावरण चांगले आणि आनंदी राहील. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या