Shani 2024 : अवघ्या 2 दिवसांत शनीची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Shani Gochar 2024 : शनीच्या परिणामांना प्रत्येक माणूस घाबरतो. शनीच्या चालीत बदल झाला की काहींना जास्त त्रासाला सामोरं जावं लागतं, तर काहींना राजासारखं जीवन लाभतं. यातच 3 ऑक्टोबरला होत असलेल्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींना सोन्याचे दिवस येणार आहेत.
Shani Nakshatra Parivartan 2024 : शनी सध्या कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहे. ऑक्टोबर महिन्यात शनि (Shani) आपलं नक्षत्र बदलत आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी शनि राहूच्या (Rahu) शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. शनीच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. शनि 27 डिसेंबर 2024 पर्यंत शतभिषा नक्षत्रात राहील.
शनि जवळपास 3 महिने राहूच्या नक्षत्रात असेल, हा काळ काही राशींसाठी लाभाचा ठरेल. शनि नक्षत्र परिवर्तनामुळे 3 राशीच्या लोकांना डिसेंबरपर्यंत सोन्याचे दिवस येतील, त्यांच्या सुखसोयीत वाढ होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
3 ऑक्टोबरपासून या राशींना सोन्याचे दिवस
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा पुरेपूर फायदा होईल. या काळात तुमची सर्व कामं यशस्वी होतील. तुमचं जे काही प्रलंबित काम होतं तेही या काळात पूर्ण होऊ शकतं. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून डिसेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. या काळात तुमचं आरोग्य चांगले राहील आणि व्यवसायातही फायदा होईल. नोकरीत तुम्हाला काही शुभवार्ता मिळू शकते, पैशाची आवक देखील चांगली राहील.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र बदलाचा अधिक फायदा होईल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये फायदे होतील. अनपेक्षित स्रोतांतून पैसे येतील. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि जोडीदारासोबत तुम्ही सुखात राहाल. घरातील सदस्यांमध्ये काही वाद सुरू असतील तर ते देखील या काळात संपतील. तुम्हाला अनपेक्षितरित्या धनलाभ होईल, उत्पन्नाचे स्रोत या काळात वाढतील.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र बदलामुळे खूप फायदा होईल. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकतं. तुमची सरकारी कामं लवकर पूर्ण होऊ शकतात. ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत होता, त्यांचं लग्न या काळात निश्चित होऊ शकतं. तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि उत्पन्नाचे अजून स्रोत देखील उपलब्ध होतील. या काळात मनात सकारात्मकता निर्माण होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: