(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Gochar : शनीने राशी बदलताच 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू; नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार, सर्व चिंता मिटणार
Shani Gochar 2025 : अवघ्या काही महिन्यांत शनि कुंभ राशीतून बाहेर निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे, ज्याचा चांगला परिणाम 3 राशींवर होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.
Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि (Shani) हा सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली ग्रहांपैकी एक आहे. सर्व 9 ग्रहांमध्ये शनीचा वेग सर्वात कमी आहे, तो एका राशीत तब्बल दीड वर्ष राहतो आणि यामुळेच शनीचा परिणाम दीर्घकाळ राहतो. शनीची साडेसाती सुरू झाल्यास ती देखील लवकर दूर होत नाही.
सध्या शनि कुंभ राशीत विराजमान आहे. 29 मार्च 2025 रोजी शनि कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषांच्या मते, शनीच्या राशी बदलामुळे 3 राशींच्या नशिबाचं कुलूप उघडू शकतं आणि या राशींच्या घरात पैशाचा पाऊस पडू शकतो. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.
कर्क रास (Cancer)
सध्या कर्क राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव आहे. शनीच्या महादशेच्या प्रभावामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत आहेत. शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत गेल्यावर या राशीच्या लोकांना शनीच्या तावडीतून मुक्तता मिळेल. यानंतर कर्क राशीच्या लोकांचं भाग्य उजळू शकतं. करिअर, व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रचंड यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील.
वृश्चिक रास (Scorpio)
कर्क राशीप्रमाणे वृश्चिक राशीवरही शनीचा वाईट प्रभाव आहे. जेव्हा शनि मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमच्यावरील महादशेचा प्रभाव संपेल. महादशेपासून मुक्ती मिळाल्यावर तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील. तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य या काळात वाढेल. तुमच्या कामाच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत विकसित केल्याने पैशाचा ओघ जास्त असेल. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या मदतीने तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांवर यावेळी शनीची साडेसाती आहे. मकर राशीचे लोक साडेसतीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात अडकले आहेत. त्यांची साडेसाती शनि कुंभातून मीन राशीत गेल्यानंतर संपेल. मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळाल्यावर त्यांची आर्थिक स्थिती काही काळाने सुधारू शकते. तुमच्या योग्य प्रयत्नांनी प्रत्येक क्षेत्रात यशाची नवीन दारं उघडू शकतात. तुमची आर्थिक समस्या लवकरच दूर होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. पैशांची आवक वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: